नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सुब्रमण्यम स्वामी यांचा मुस्लिम महिलांसोबत उभा असलेला एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यांच्या सोबत उभ्या असलेल्या बुरखा घातलेल्या महिला, हजला जाणार्या त्यांची मुलगी आणि नात असल्याचा दावा करत, हा फोटो शेअर केला जात आहे. त्यांना विमानतळावर सोडण्यासाठी ते तिथे पोहोचले होते.
विश्वास न्यूजने केलेल्या तपासात असे आढळून आले की, व्हायरल झालेल्या छायाचित्राबाबत करण्यात येत असलेला दावा खोटा आणि अपप्रचार आहे. व्हायरल झालेला फोटो जवळपास 5 वर्षे जुना आहे. 2018 मध्ये, सुब्रमण्यम स्वामी विमानतळावर काही महिलांना भेटले होते, ज्या तिहेरी तलाकवरील त्यांच्या मतांनी खूप प्रभावित होत्या. त्यामुळेच त्यांनी त्यांचे चाहते म्हणून एकत्र फोटो काढला होता.
फेसबुक वापरकर्ता, कुलदीप वर्माने हा व्हायरल फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘देशाचे कट्टर हिंदू नेते सुब्रमण्यम स्वामी, त्यांच्या मुलीला आणि नातीला हैदराबाद विमानतळावरून हजसाठी निरोप देताना. दंगेखोरांनो, तुम्हाला सुब्रमण्यमजींकडून शिकण्याची गरज आहे, या नेत्यांच्या नादाला लागून तुम्ही स्वतःला जातीयवादाच्या भट्टीत झोकत आहात आणि हे नेते त्यांच्या कुटुंबात सुखी जीवन जगत आहेत. देश अशा नेत्यांच्या तोंडातील अन्नाचा घास बनाला आहे.
पोस्टच्या संग्रहित दुव्याला येथे पहिले जाऊ शकते.
व्हायरल फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेजद्वारे फोटो शोधला. दरम्यान, आम्हाला 4 मे, 2018 रोजी सुब्रमण्यम स्वामींचे चाहते विकास काटेवा यांच्या ट्विटर खात्यावर पोस्ट केलेले व्हायरल चित्र आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला फोटो बेंगळुरू विमानतळाचा आहे. जिथे सुब्रमण्यम स्वामींना पाहताच काही मुस्लिम महिला त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तिथे आल्या होत्या.
तपासादरम्यान, आम्हाला सुब्रमण्यम स्वामी यांनी सुरू केलेल्या ‘विराट हिंदुस्थान संगम’ या संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस जगदीश शेट्टी यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर व्हायरल झालेले चित्र देखील आढळले. जगदीश शेट्टी यांनी 4 मे, 2018 रोजी व्हायरल झालेला फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बेंगळुरू विमानतळाचा फोटो. काही मुस्लिम महिलांनी डॉ.सुब्रमण्यम यांचे कौतुक केले आहे. एवढेच नाही, तर त्याच्यासोबत छायाचित्रेही काढण्यात आली आहेत. हे त्याच्या भूमिकेबद्दल बरेच काही सांगते आणि तिहेरी तलाकवर बंदी घालावी अशी त्यांची इच्छा आहे.
अधिक माहितीसाठी आम्ही जगदीश शेट्टी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की, व्हायरल फोटोबाबत करण्यात येत असलेला दावा खोटा आहे. मी हा फोटो घेतला आहे. हे चित्र सुमारे 5 वर्षे जुने असून बेंगळुरू विमानतळाचे आहे. काही महिला विमानतळावर सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडे आल्या आणि फोटो काढण्याची विनंती करू लागल्या. सुब्रमण्यम स्वामींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. फोटोतील एकही महिला त्याच्या कुटुंबातील नाही.
सुब्रमण्यम स्वामींच्या मुलींबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर सर्च करायला सुरुवात केली. आम्हाला आढळले की सुब्रमण्यम स्वामींना दोन मुली आहेत – डॉ. गीतांजली स्वामी आणि सुहासिनी हैदर. त्यांची मोठी मुलगी व्यवसायात पारंगत आहे. त्यांची धाकटी मुलगी सुहासिनी हैदर, ज्या एक पत्रकार आहेत, त्यांचा विवाह माजी भारतीय डिप्लोमॅट सलमान हैदर यांचा मुलगा नदीम हैदरशी झाला आहे.
तपासाअंती, आम्ही खोट्या दाव्यासह व्हायरल चित्र शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे प्रोफाइल स्कॅन केले. आम्हाला आढळले की, वापरकर्ता एक विचारधारेने प्रभावित आहे. फेसबुकवर युजरचे 2,624 मित्र आहेत. प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, वापरकर्ता वाराणसीचा रहिवासी आहे. डिसेंबर 2012 पासून कुलदीप वर्मा फेसबुकवर सक्रिय आहे.
निष्कर्ष: आमच्या तपासात आम्हाला असे आढळून आले की, सुब्रमण्यम स्वामी यांचा मुस्लिम महिलांबाबत व्हायरल झालेला दावा पूर्णपणे खोटा आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये, सुब्रमण्यम स्वामी त्यांच्या मुली आणि नातीसोबत नाही, तर काही मुस्लिम प्रशंसकांसोब सोबत उभे आहेत.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923