X
X

Fact Check: भारताला हिंदू राष्ट्र बाणावर ह्या दाव्यासह व्हायरल होणारे वक्तव्य बनावटी

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे. अमित शाह ने भारताला 2025 पर्यंत हिंदू राष्ट्र बनवण्याचे वक्तव्य केले नव्हते.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात कुठल्या टीव्ही ची ब्रेकिंग प्लेट वापरल्याचे दिसते. ह्यात एकीकडे अमित शाह ह्यांचे चित्र आहे आणि दुसरी कडे लिहले आहे, “2025 तक होगा भारत हिन्दू राष्ट्र घोषित।” पोस्ट मध्ये सांगण्यात आले कि हे वक्तव्य अमित शाह ह्यांनी केले. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे कळले.

काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे आणि सोबत दावा केला जात आहे, “सनातन धर्म से जुड़े सभी लोगों को बधाई हो. अपने मोटा भाई ने बोल दिया है अब तैयारी जोरदार होनी चाहिए, जिससे हिंदू राष्ट्र 2025 से पहले बन जाएगा।”

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट च्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी आधी किवर्ड सर्च केले. आम्हाला कुठल्याच ऑथेंटिक मीडिया हाऊस वर अशी कुठलीच बातमी नाही मिळाली ज्यात सांगितले असेल कि अमित शाह ह्यांनी 2025 पर्यंत भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचे सांगितले आहे.

व्हायरल स्क्रीनशॉट गूगल वर सर्च केल्यावर आम्हाला युट्युब वर एक व्हिडिओ मिळाला, ज्याचा हाच थंबनेल होता. ह्यात भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मागे जनतेचे विचार घेण्यात आले होते. व्हिडिओ मध्ये असे कुठेच लिहले नव्हते कि हे अमित शाह ह्यांचे विचार आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने BJP प्रवक्ता, प्रेम शुक्ला ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हि पोस्ट खोटी आहे आणि अमित शाह ह्यांनी हे वक्तव्य केले नाही.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने चित्र अपलोड करणारे यूजर Vinit Shukla ह्यांचा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि यूजर चे फेसबुक वर 4,325 फ्रेंड्स आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे. अमित शाह ने भारताला 2025 पर्यंत हिंदू राष्ट्र बनवण्याचे वक्तव्य केले नव्हते.

  • Claim Review : 2025 तक होगा भारत हिन्दू राष्ट्र घोषित।
  • Claimed By : Vinit Shukla
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later