Fact Check: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी नाही वाचत आहे राहुल गांधी चे शेड्युल
विश्वास न्यूजच्या तपासात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या छायाचित्राबाबत करण्यात आलेला दावा खोटा ठरला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे छायाचित्र संपादित करण्यात आले आहे. मूळ चित्रात ती पीएम मोदींशी संबंधित पुस्तक वाचताना दिसत आहे.
- By: Pragya Shukla
- Published: Nov 3, 2022 at 11:43 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर एक चित्र व्हायरल होत आहे, ज्यात स्मृती इराणी राहुल गांधी ह्यांचे चित्र असलेले एक पुस्तक वाचताना दिसतात. राहुल गांधी ह्यांचे चित्र पुस्तकावर दिसते, त्यावर लिहले होते: राहुल गांधी के हर दिन की दिनचर्या 2022-2023. सोशल मीडिया यूजर्स हा दावा खरा समजून शेअर करत आहेत. सोशल मीडिया यूजर्स भारत जोडो यात्रेसोबत जोडून हा दावा शेअर करत आहेत.
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्यांचे हे छायाचित्र एडिटेड आहे. खऱ्या चित्रात त्या पीएम मोदी ह्यांचे पुस्तक वाचताना दिसतात. व्हायरल दावा खोटा आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर कन्हैयालाल मेघवाल ने व्हायरल चित्र शेअर करून दावा केला: “कर्म बड़ा होता है दुश्मन भी उस शख्सियत को पढ़ने लगते हैं !”
सोशल मीडिया यूजर्स ह्यासोबत मिळता जुळता दावा करून हि पोस्ट व्हायरल करत आहेत. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेजद्वारे फोटो शोधला. या दरम्यान, आम्हाला मूळ चित्र 18 सप्टेंबर 2022 रोजी मोरंग एक्सप्रेसच्या अहवालात प्रकाशित झाले. मूळ चित्रात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुस्तक वाचताना दिसत आहेत. त्यावर पीएम मोदींचा फोटो छापण्यात आला असून मोदी @२० असे लिहिले आहे.
तपास पुढे नेत आम्ही केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे सोशल मीडिया अकाउंट स्कॅन करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, आम्हाला अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेले मूळ चित्र देखील आढळले. मूळ चित्र 18 सप्टेंबर 2022 रोजी शेअर केले होते.
आम्ही राहुल गांधींच्या दैनंदिन वेळापत्रक 2022-2023, व्हायरल इमेजमध्ये दिसणाऱ्या पुस्तकाचे शीर्षक शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला असे कोणतेही पुस्तक सापडले नाही. मग आम्ही मोदी @ 20 चा शोध सुरू केला. या दरम्यान, आम्हाला १५ मार्च २०२२ रोजी हिंदुस्तान टाइम्सच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या या पुस्तकाशी संबंधित एक अहवाल मिळाला. रिपोर्टनुसार, या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 20 वर्षांची माहिती देण्यात आली आहे. हे पुस्तक Amazon वर देखील उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी आम्ही उत्तर प्रदेश भाजपचे प्रवक्ते अवनीश त्यागी ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. व्हायरल होत असलेले चित्र एडिट केले आहे आणि चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
आम्ही फेसबुक वापरकर्त्या कन्हैयालाल मेघवालचे प्रोफाइल स्कॅन केले, ज्याने दिशाभूल करणारा दावा असलेली प्रतिमा शेअर केली. फेसबुकवर युजरचे 869 फॉलोअर्स आणि सुमारे 5 हजार मित्र आहेत. प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, युजर राजस्थानचा रहिवासी आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या छायाचित्राबाबत करण्यात आलेला दावा खोटा ठरला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे छायाचित्र संपादित करण्यात आले आहे. मूळ चित्रात ती पीएम मोदींशी संबंधित पुस्तक वाचताना दिसत आहे.
- Claim Review : स्मृति ईरानी, राहुल गांधी के हर दिन की दिनचर्या की किताब पढ़ रही हैं।
- Claimed By : कन्हैयालाल मेघवाल
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.