X
X

Fact Check: शाहरुख खान च्या वाढदिवसाचे जुने चित्र खोट्या दाव्यासह होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा ठरला. शाहरुख चे खरे चित्र जुने आहे. हे चित्र शाहरुख़ च्या 49व्या वाढदिवसाचे आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक चित्र व्हायरल होत आहे .,ज्यात अभिनेता शाहरुख खान दिसतो. चित्रात शाहरुख खान एका गर्दी समोर नमन करताना दिसतात. पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे कि हे चित्र आर्यन खान ला बेल मिळाल्या नंतर आनंदात घराबाहेर जमलेल्या गर्दी चे आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. खरे चित्र खूप जुने आहे. हे चित्र शाहरुख च्या 49 व्या वाढदिवसाचे आहे, जेव्हा त्यांच्या घरासमोर गर्दी जमली.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर “अमन त्रिपाठी” ने 31 ऑक्टोबर रोजी हे चित्र शेअर केले ज्यात लिहले होते, ” जितनी भीड़ एक नशेड़ी की जमानत पर है इतनी भीड़ अगर नीरज चोपड़ा जैसे रियल हीरो के घर के सामने जमा हुई होती तो इस देश में खेल प्रतिभाओं का अकाल नहीं होता…… Sleepy face”
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज़ ने व्हायरल पोस्ट चा तपास केला त्यात आम्ही यांडेक्स टूल द्वारे चित्र शोधले. आम्हाला व्हायरल चित्र बऱ्याच वेबसाईट वर मिळाले. आम्हाला या संबंधी व्हिडिओ Bollywood News Villa नावाच्या युट्युब चॅनेल वर 3 नोव्हेंबर 2014 रोजी अपलोड केला होता. व्हिडिओ वर लिहले होते, “Shahrukh Khan’s 49th birthday EXCLUSIVE VIDEO from his house Mannat.”
पूर्ण व्हिडिओ इथे बघा.

आम्हाला हे चित्र masala.com वर 3 नोव्हेंबर 2014 रोजी प्रकाशित एका बातमीत देखील मिळाला. चित्रात लिहले होते, शाहरुख़ खान च्या 49व्या वाढदिवसाचे आहे. ndtv.com च्या वेबसाईट वर 3 नोव्हेंबर 2014 रोजी प्रकाशित बातमीत देखील हे चित्र होते.

शाहरुख खान ने 2 नोव्हेंबर 2014 रोजी हे चित्र आपल्या ट्विटर हॅन्डल वर देखील शेअर केले. हे चित्र इथे बघा.

हे पहिल्यांदा नाही कि फॅन्स ने शाहरुख चा वाढदिवस असा मानवाला असेल. दरवर्षी मन्नत बाहेर अशीच गर्दी असते. आमच्या तपासात हे कळले कि हे चित्र जुने आहे. आम्ही किवर्ड सर्च करून आर्यन खान बद्दल च्या बातम्यांचा तपास केला. मागील शनिवार आर्यन ला बेल मिळाली आणि त्याखुषीत फॅन्स ने मन्नत बाहेर ढोल वाजवून त्याचे स्वागत केले.

व्हायरल फोटो बद्दल अधिक माहिती साठी विश्वास न्यूज ने मुंबई मध्ये दैनिक जागरण चे एंटरटेनमेंट बीट कवर करणाऱ्या स्मिता श्रीवास्‍तव ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि चित्र आताचे नाही. हे शाहरुख खान चे 49व्या वाढदिवसाचे चित्र आहे.

तपासाच्या शेवटच्या टप्पयात फोटो शेअर करणाऱ्या यूजर चे सोशल स्कँनिंग केले. त्यात कळले यूजर चे ट्विटर वर 2,198 फॉलोवर आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा ठरला. शाहरुख चे खरे चित्र जुने आहे. हे चित्र शाहरुख़ च्या 49व्या वाढदिवसाचे आहे.

  • Claim Review : जितनी भीड़ एक नशेड़ी की जमानत पर है इतनी भीड़ अगर नीरज चोपड़ा जैसे रियल हीरो के घर के सामने जमा हुई होती तो इस देश में खेल प्रतिभाओं का अकाल नहीं होता
  • Claimed By : ट्विटर यूजर
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later