Fact Check: डॉन 2 चित्रपटातील दृश्य पठाण चे म्हणून शेअर केले जात आहे

डॉन 2 चित्रपटातील एक व्हिडिओ क्लिप आता पठाण चित्रपटातील असल्याचा खोटा दावा करून शेअर केला जात आहे. विश्वास न्यूजच्या तपासणीत व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले.

Fact Check: डॉन 2 चित्रपटातील दृश्य पठाण चे म्हणून शेअर केले जात आहे

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पठाण चित्रपटातील असल्याचा दावा करणारी १५ सेकंदांची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. विश्वास न्यूजने व्हायरल व्हिडिओ क्लिपची वस्तुस्थिती तपासली आणि हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समोर आले. व्हायरल व्हिडिओ क्लिप डॉन 2 चित्रपटातील एक दृश्य आहे, जे आता पठाण ह्या चित्रपटही असल्याचे सांगून लोकं शेअर करत आहेत.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर ‘शनि गुप्ता’ ने 16 डिसेंबर रोजी व्हायरल क्लिप शेअर केली ज्यात दावा करण्यात आला: ‘पठान फिल्म का सीन देखें हीरोइन ने पूछा जेल कैसा लग रहा है तो शाहरुख कहता है यहां ऐसा क्या है बस मैं इस कमीज के रंग से खुश नहीं हूं। कमीज भगवा रंग की है, ये लोग अपनी नफ़रत फिल्म से करोड़ो लोगो में भर देते हैं कि खान को भगवा रंग पसन्द नहीं। और चाहता है कि हिंदू समुदाय जो भगवा रंग को धारण करते हैं, यह उस भगवा रंग से नफरत कर्ता है, हिन्दू इसकी फिल्म को देखे, भाईयों जिन्हें भगवा रंग पसंद नहीं उसे आप भी नापसंद करो। बॉयकॉट करो शाहरुख खान की पठान फिल्म को Boycott_PATHAN

पुर्ण बहिष्कार पठान मूवी
अब इस रंग की ताकत हम तुझे दिखाऐंगे।

फेसबुक वर अन्य यूजर्स देखील हा दावा शेअर करत आहेत. ह्या पोस्ट ची आर्काइव्ह लिंक इथे बघा

तपास:

पठाण चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आहे, तर व्हायरल व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा दिसते आहे. व्हायरल क्लिप हे डॉन 2 चित्रपटातील एक दृश्य आहे, जे आम्हाला एक्सेल एंटरटेनमेंटच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर 12 फेब्रुवारी 2021 रोजी अपलोड केलेले दिसले. एक्सेल एंटरटेनमेंट ‘डॉन 2’ चित्रपटाची अधिकृत निर्माता आहे.

धमाका मुव्हीज या यूट्यूब चॅनलवरही हा व्हिडिओ पाहता येईल. 20 सप्टेंबर 2022 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ डॉन 2 चित्रपटाचा असल्याचे सांगण्यात आले.

पुढे तपास करत प्रियांका चोप्रा पठाण चित्रपटात दिसणार की नाही याचा शोध घेतला. आम्हाला अशी कोणतीही बातमी सापडली नाही, ज्यामध्ये प्रियांका चोप्रा पठाण चित्रपटात देखील दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

न्यूज18 च्या रिपोर्टनुसार, डॉन 2 चा हा सीन मलेशियातील मलाक्का जेलमध्ये शूट करण्यात आला आहे. मलेशियातील मलाक्का तुरुंगात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पकडलेल्या कैद्यांना केशरी रंगाचे कपडे घालायला लावले जातात. चित्रपटातील या दृश्याची पार्श्वभूमीही मलेशियाची आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबईतील ज्येष्ठ मनोरंजन पत्रकार पराग चाफेकर ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले की हा व्हिडिओ डॉन 2 चित्रपटाचा आहे, पठाण चित्रपटाचा नाही.

याआधीही शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाबाबत अनेक खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. विश्‍वास न्यूजने याची चौकशी केली होती. तथ्य तपासणी अहवाल येथे वाचता येईल.

निष्कर्ष: डॉन 2 चित्रपटातील एक व्हिडिओ क्लिप आता पठाण चित्रपटातील असल्याचा खोटा दावा करून शेअर केला जात आहे. विश्वास न्यूजच्या तपासणीत व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट