Fact Check: सारा अली खान चा ट्विटर अकाउंट नाही, व्हायरल होत आहे खोटे ट्विट
विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि अभिनेत्री सारा अली खान यांचे ट्विटर वर अकाउंट नाही, त्यांच्या नावावर व्हायरल होत असलेली ट्विट खोटी आहे.
- By: Umam Noor
- Published: Mar 16, 2021 at 09:26 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान यांच्या नावाने सध्या एक ट्विट व्हायरल होत आहे, ज्यात त्यांच्या नावाने मुस्लिम मुलींबद्दल एक दावा करण्यात येत आहे. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि व्हायरल होत असलेला ट्विट हा सारा अली खान यांनी केला नाही. त्यांच्या ट्विटर वर अकाउंटच नाही, व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर मधुलिका सनातनी ने एक ट्विट चा स्क्रिनशॉट शेअर केला, ज्यात यूजर हॅन्डल @WhoSaraAli वर सारा अली खान चे छायाचित्र लागलेले दिसते. ट्विट मध्ये लिहले आहे, “हिन्दू बहुल इलाकों में मुस्लिम लड़की बुरका नहीं पहनती, क्योंकि उनको पता है कि वहाँ उनको कोई खतरा नहीं है। जबकि मुस्लिम बहुल क्षेत्र में 95% लड़कियां हिजाब पहनती हैं, क्योंकि लड़की के चाचा, भाई, मामा, फूफा, जीजा, ताऊ ही उसको हवस का शिकार बना देंगे।” या स्क्रिनशॉट ला शेअर करून यूजर ने लिहले, ‘अब तो भरोसा कर लीजिए क्योंकि ये तो आपकी चहेती सैफ अली खान की बेटी फ़िल्मकारा है।’
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.
तपास:
आमच्या तपासाची सुरुवात आम्ही @WhoSaraAli हा ट्विटर हॅन्डल शोधण्यापासून केली. सर्च च्या वेळी आम्हाला या नावाचे कुठलेच ट्विटर हॅन्डल सापडले नाही.
आम्हाला कळले कि सारा अली खान यांच्या नावाने बरेच पेरोडी अकाउंट आणि फॅन पेज बनलेले आहे, यातला कुठलाच अकाउंट खरा नाही आणि एक पण हॅन्डल वेरिफाइड अर्थात अधिकृत नाही.
आम्हाला आता हे कळले होते कि, व्हायरल होत असलेले ट्विट हे सारा अली खान यांनी केले नाही. आता आम्ही हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला कि व्हायरल ट्विट मध्ये करण्यात आलेला दावा हा सारा अली खान यांनी कुठे म्हंटले आहे का. न्यूज सर्च मध्ये देखील आम्हाला अशी कुठलीच बातमी मिळाली नाही.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही मुंबई चे दैनिक जागरण चे बॉलीवूड कव्हर करणाऱ्या पत्रकार स्मिता श्रीवास्तव यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल होत असलेले ट्विट खोटे आहे. सारा अली खान यांच्या ट्विटर हॅन्डल बद्दल अधिक माहिती साठी आम्ही त्यांच्या टीम सोबत संपर्क केला, त्यांनी आम्हाला सांगितले कि सारा अली खान यांचे ट्विटर वर अकाउंट नाही.
विश्वास न्यूज ने खोटी पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला, यूजर मधुलिका सनातनी यांनी या आधी देकील बऱ्याच खोट्या पोस्ट शेअर केल्या आहेत. यूजर ला २७४६ लोकं फोल्लो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि अभिनेत्री सारा अली खान यांचे ट्विटर वर अकाउंट नाही, त्यांच्या नावावर व्हायरल होत असलेली ट्विट खोटी आहे.
- Claim Review : सारा अली खान चे व्हायरल ट्विट
- Claimed By : मधुलिका सनातनी
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.