Fact Check: रशियन नाणे निर्मात्याची निर्मिती, 1921 मधील यूएस चे नाणे म्हणून व्हायरल

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे नाणे प्रत्यक्षात रशियन नाणे निर्मात्याने केलेली कलात्मक निर्मिती आहे, व्हायरल दावे खोटे आहेत.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओंमध्ये एक नाणे दिसत आहे आणि त्याच नाण्यावर एक तलवार कोरलेली आहे जी त्यावर कोरलेली तिजोरी उघडण्यासाठी वापरली जात आहे. हे 1921 मधील अमेरिकेचे नाणे असल्याचे सांगितले जात आहे.
विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे हे नाणे रशियन नाणे निर्माता रोमन बुटीनची निर्मिती आहे.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर, ‘World Of History’ ने व्हायरल दावा शेअर केला आणि लिहले: A coin of US 1 dollar with a sword that unlocks the secret vault from 1921.

भाषांतर: तलवारीसह US 1 डॉलरचे नाणे जे 1921 पासून गुप्त तिजोरी उघडते.

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

आम्हाला हा दावा फेसबुक वर देखील व्हायरल होत असल्याचे लक्षात आले.

तपास:

विश्वास न्यूजने व्हायरल व्हिडिओवरील कमेंट वाचण्यापासून तपासाची सुरुवात केली. अनेकांनी असा दावा केला की ही रशियन नाणे निर्माता रोमन बुटीनची निर्मिती आहे.

ह्या कमेंट वरून आम्ही, गूगल वर ‘Russian Coin maker’ हे किवर्डस वापरून तपास केला.
ह्या किवर्ड सर्च वरून आम्हाला ह्या नाणे बनवणाऱ्याची वेबसाईट सापडली.

ह्या कलाकाराचे नाणे विक्री करीत देखील ठेवले होते.

आम्हाला युट्युब वर बरेच व्हिडिओ मिळाले, ज्यात रोमन बुटीन नि बनवलेले नाणे दाखवले होते.
व्हायरल व्हिडिओ मधील नाणे देखील ह्या व्हिडिओ मध्ये होते.

आम्हाला ‘Roman Booteen‘ चे अधिकृत इंस्टाग्राम हॅन्डल मिळाले, जिथे हाच व्हिडिओ अपलोड केला होता.

विश्वास न्यूजच्या पुढील चरणात आम्ही इंस्टाग्राम मेसेंजरद्वारे रोमन बुटीनशी संपर्क साधला आणि व्हायरल दाव्याबद्दल विचारले. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल व्हिडिओमधील नाणे 1921 चे मॉर्गन डॉलरचे नाणे आहे, ज्याला त्यांनी बनवले. नाण्यावर कोरलेली तलवार तिजोरी उघडेल अशा पद्धतीने त्यांनी यंत्रणा तयार केली. रोमनने आमच्यासोबत एक व्हिडिओही शेअर केला, ज्यात नाणे बनवत असतानाचे दृश्य होते.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही व्हायरल व्हिडिओ शेअर केलेल्या प्रोफाइल चे बॅकग्राउंड चेक केले. ‘World of History’ या Twitter यूजरचे 155.9K फॉलोअर्स आहेत आणि ते एप्रिल 2022 मध्ये बनवण्यात आले होते.

निष्कर्ष: व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे नाणे प्रत्यक्षात रशियन नाणे निर्मात्याने केलेली कलात्मक निर्मिती आहे, व्हायरल दावे खोटे आहेत.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट