Fact Check: सानी देओल च्या मृत्यू ची अफवा व्हायरल

अभिनेता आणि खासदार सनी देओल जिवंत आणि बरा आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी ही अफवा आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर अनेक व्यक्तिमत्त्वांबद्दल अफवा खूप वेगाने पसरतात. आता सनी देओलची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांचे निधन झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध होत आहे.

विश्वास न्यूजने तपासात सनी देओलच्या मृत्यूची पोस्ट ही अफवा असल्याचे आढळून आले आहे. तो पूर्णपणे कुशल आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Diljeet Kumar Yadav (आर्काइव लिंक) ने 14 सेकंड चा व्हिडिओ पोस्ट केला ज्यात धर्मेंद्र आणि बॉबी देओल चे चित्र लावून लिहले होते:

सनी देओल अब इस दुनिया में नही रहे
भगवान उनकी आत्मा को शांति दे

तपास:

व्हायरल दावा तपासण्यासाठी, आम्ही Google वर एक कीवर्ड शोध केला, परंतु कोणत्याही विश्वसनीय बातम्या वेबसाइटवर अशी कोणतीही माहिती सापडली नाही. असे काही घडले असते तर प्रिंट आणि डिजिटल मध्ये बातम्या आल्या असत्या.

‘चुप’ चित्रपटाचे पोस्टर 25 ऑगस्ट रोजी सनी देओलच्या सत्यापित ट्विटर अकाउंट @iamsunnydeol वरून पोस्ट करण्यात आले आहे. व्हेरिफाईड फेसबुक पेजवरही चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करण्यात आले आहे.

https://twitter.com/iamsunnydeol/status/1563982379953569792?s=20&t=6pNUyyRYIDdwDL7MDQ7OmQ

याबाबत आम्ही सनी देओलचे पीए पंकज जोशी यांच्याशी बोललो. ते म्हणाले, ‘ ते कुशल आहे. सोशल मीडियावर अफवा व्हायरल होत आहेत.’ त्याचवेळी दैनिक जागरणचे गुरुदासपूरचे रिपोर्टर सुनील यांनीही ही पोस्ट फेक असल्याचे म्हटले आहे.

आम्ही फेक पोस्ट करणाऱ्या ‘दिलजीत कुमार यादव‘ या फेसबुक युजरचे प्रोफाईल स्कॅन केले. त्यानुसार तो मोतिहारी येथे राहतो. जानेवारी 2016 मध्ये त्यांनी फेसबुक जॉईन केले.

निष्कर्ष: अभिनेता आणि खासदार सनी देओल जिवंत आणि बरा आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी ही अफवा आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट