X
X

Fact Check: रिलायन्स ने राम मंदिर ला नाही दिले सौर ऊर्जा पावर प्लांट, व्हायरल दावा खोटा आहे

रिलायन्स ने राम मंदिर ला सौर ऊर्जा पावर प्लांट डोनेट केले नाही. सोशल मीडिया वर चुकीचा दावा व्हायरल होत आहे.

  • By: ameesh rai
  • Published: Jan 16, 2021 at 03:44 PM
  • Updated: Jan 18, 2021 at 03:46 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर राम मंदिर आणि रिलायन्स ला घेऊन एक पोस्ट व्हायरल  होत आहे. या पोस्ट मध्ये दावा केला जात आहे कि रिलायन्स ने राम मंदिर ला सौर ऊर्जा पावर प्लांट भेट केला आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?


विश्वास न्यूज ला आपल्या फॅक्ट चेकिंग व्हाट्सअँप चॅट-बोट वर फॅक्ट चेक करण्यास एक पोस्ट मिळाली. या पोस्ट मध्ये लिहले होते, “रिलायंस ने राम मंदिर को सौर ऊर्जा कम्प्लीट प्लांट भेंट किया है। जनरेटर की जरूरत नहीं पड़ेगी मंदिर को। जय श्री राम।” हि पोस्ट इथे जशी च्या तशी पोस्ट केली आहे.

कीवर्ड सर्च केल्यावर विश्वास न्यूज ला हा दावा फेसबुक आणि ट्विटर वर देखील व्हायरल होत असताना दिसला. या दाव्याला फेसबुक वर शेअर केल्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे क्लिक करून बघू शकता.

तपास:


विश्वास न्यूज ने या दाव्याला इंटरनेट वर सर्च करून शोधण्यास सुरु केले. हा दावा ट्विटर आणि फेसबुक वर व्हायरल होत असल्याचे कळले. याला तुम्ही खाली बघू शकता.

विश्वास न्यूज ला ऑनलाईन अशी कुठलीच अधिकृत मीडिया रिपोर्ट मिळाली नाही, जी रिलायन्स आणि अयोध्येच्या या दाव्याची खात्री करेल.

इंटरनेट वर तपास करताना आम्हाला 28 दिसंबर 2020 रोजी हिंदुस्थान टाइम्स वर प्रकाशित एक रिपोर्ट मिळाली. या रिपोर्ट मध्ये ‘राम जन्मभूमि तीरथ क्षेत्र न्यास’ चे ट्रस्टी स्वामी गोविंद देव गिरी महाराजांच्या हवाले सांगितले कि राम मंदिर निर्माण साठी एक महिन्याचे डोनेशन ड्राइव्ह १५ जानेवारी पासून सुरु केले जाईल. हि रिपोर्ट इथे क्लिक करून वाचा.

विश्वास न्यूज ने या दाव्याचे सत्य जाणून घेण्यास, ‘राम जन्मभूमि तीरथ क्षेत्र न्यास’ चे ट्रस्टी कमिशनर विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांना संपर्क केला. त्यांनी व्हायरल दावा खोटा असल्याचे सांगितले.

Sanjeev Bansal नावाच्या प्रोफाइल वरून हा व्हायरल दावा फेसबुक वर केला गेला. विश्वास न्यूज ने प्रोफाइल ला स्कॅन केला. हा प्रोफाइल डिसेंबर २०१८ मध्ये बनवला गेला, आणि यूजर नाजीबाबाद, उत्तर प्रदेश चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: रिलायन्स ने राम मंदिर ला सौर ऊर्जा पावर प्लांट डोनेट केले नाही. सोशल मीडिया वर चुकीचा दावा व्हायरल होत आहे.

  • Claim Review : रिलायंस ने राम मंदिर को सौर ऊर्जा कम्प्लीट प्लांट भेंट किया है। जनरेटर की जरूरत नहीं पड़ेगी मंदिर को। जय श्री राम।
  • Claimed By : Sanjeev Bansal
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later