विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि मुकेश अंबानी यांच्या नावावर व्हायरल होत असलेला मेसेज पूर्णपणे खोटा आहे. रिलायन्स ने व्हाट्सअँप ला विकत घेतले नाही आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): व्हाट्सअँप वर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे कि रिलायन्स ने व्हाट्सअँप ला विकत घेतले आहे. या मेसेज ला आम्हाला आमच्या यूजर ने विश्वास न्यूज च्या चॅटबोट (+91 95992 99372) वर वेरीफिकेशन साठी पाठवला होता. हा मेसेज सोशल मीडिया च्या बाकी प्लॅटफॉर्म वर पण व्हायरल होत आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि मुकेश अंबानी च्या नावावर व्हायरल होत असलेला मेसेज पूर्णपणे खोटा आहे. रिलायन्स ने व्हाट्सअँप ला विकत घेतले नाही आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने देखील या मेसेज ला फेक असल्याचे सांगितले आहे.
काय होत आहे व्हायरल?
व्हायरल मेसेज मध्ये लिहले आहे:
“Dont ignore please read it carefully” Hello, I. Am VARUN PULYANI director of whatsapp, this message is to inform all of our users that we have sold whatsapp to Mukesh Ambani . Reliance for 19 billion $. WhatsApp is now controlled by mukesh Ambani . If you have at least 10 contacts send this sms and logo of your whatsapp will change to a new icon with facebook’s “f” within 24 hours.Forward this message to more than 10 people to activate your new whatsapp with facebook services or else your account will be deleted from new servers.”
या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
या पोस्ट मध्ये मुख्यातः २ दावे केले गेले आहे:
१. वरुण पुलानी नावाचा एक व्यक्ती व्हाट्सअँप चा निर्देशक आहे.
२. व्हाट्सअँप ला मुकेश अंबानी यांना विकले आहे.
आम्ही एक एक करून या दाव्यांना फॅक्ट-चेक केले.
दावा १:
शोध घेतल्यास आम्हाला कळले कि व्हाट्सअँप चे संस्थापक ब्रायन एक्टन हे आहेत आणि सह-संस्थापक जान कौम हे आहेत. त्यांनी २०१४ मध्ये $19bn (£ 11.4bn) मध्ये फेसबुक ला व्हाट्सअँप विकले आहे.
दावा २:
आम्ही गूगल वर पण शोधले कि सध्या व्हाट्सअँप वर कोणाचा हक्क आहे. त्यात आम्हाला असे कळले कि फेसबुक ने व्हाट्सअँप ला विकत घेतले आहे आणि साईट प्रमाणे, व्हाट्सअँप फ्री आहे आणि जगातील सगळ्या फोनवर उपलब्ध असून त्यावरून सरल, सुरक्षित आणि विश्वसनीय कॅल्लिंग आणि मेसेज सेवा प्रदान करतं.
तपासाच्या शेवटच्या त्यापायात विश्वास न्यूज ने रिलायन्स चे प्रवक्ता यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हा मेसेज खोटा आहे. रिलायन्स ने व्हाट्सअँप ला विकत घेतले नाही.
अजून शोधल्यावर आम्हाला असे कळले कि हि खोटी बातमी सोशल मीडिया वर २०१४ पासून शेअर केली जात आहे. आणि बऱ्याच वेळा हा मेसेज व्हायरल होतो.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि मुकेश अंबानी यांच्या नावावर व्हायरल होत असलेला मेसेज पूर्णपणे खोटा आहे. रिलायन्स ने व्हाट्सअँप ला विकत घेतले नाही आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923