Fact Check: काँग्रेसच्या समर्थनार्थ प्रचारात रवीना टंडनचा 2012 चा व्हिडीओ सध्याचा सांगून केला जात आहे व्हायरल

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). लोकसभा निवडणूक 2024  च्या दरम्यान सोशल मीडिया वर रवीना टंडनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ती काँग्रेसचे समर्थन करताना दिसून येत आहे. या व्हिडिओला सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकीशी जोडून शेअर करत असताना वापरकर्ते दावा करत आहेत की, रवीना टंडनने सांगितले की, या वेळी काँग्रेस जिंकेल.

विश्वास न्यूजला तिच्या तपासात व्हायरल होत असलेला व्हिडिओ 2012 सालचा असल्याचा आढळले आहे. वडोदरा येथे झालेल्या रॅलीत रवीना टंडन काँग्रेसच्या प्रचारक म्हणून सहभागी झाली होती. बारा वर्ष जुना हा व्हिडिओ 2024 च्या लोकसभा निवडणुकीशी जोडून खोटा दावा केला जात आहे.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

व्हायरल पोस्ट शेअर करत एका फेसबुक वापरकर्त्याने लिहिले आहे की, “रवीना टंडन म्हणाली की, यावेळी काँग्रेस जिंकेल.”

पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.

तपास 

आमचा तपास सुरू करताना आम्ही सर्वप्रथम गुगल लेन्सच्या माध्यमातून व्हायरल व्हिडिओच्या कीफ्रेम्स शोधल्या. सर्चमध्ये आम्हाला डेली मोशनच्या वेबसाईटवर 8 वर्षांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ सापडला. व्हिडिओची दीर्घ आवृत्ती येथे पाहता येईल आणि येथे दिलेल्या माहितीनुसार, “रवीना टंडनने वडोदरा येथे काँग्रेससाठी प्रचार करताना रोड शो केला.”

त्या आधारे आम्ही आमचा तपास पुढे नेला आणि 12 डिसेंबर 20122 रोजी एबीपी न्यूजच्या युट्यूब चॅनेलवरही अपलोड केलेला व्हायरल व्हिडिओ आम्हाला सापडला. येथे दिलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीच्या फ्रेममध्ये रवीना टंडनला रोड शो करताना देखील पाहिले जाऊ शकते. दिल्या गेलेल्या माहितीच्या आधारे, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अभिनेत्री रवीना टंडनने वडोदरा येथे काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि गुजरातमधील मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याची विनंती केली.

12 डिसेंबर 2012 रोजी देश गुजरात HD च्या यूट्यूब चॅनेलवर देखील अपलोड केलेला व्हायरल व्हिडिओ आम्हाला सापडला.

व्हायरल पोस्टशी संबंधित पुष्टीसाठी आम्ही उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अभिमन्यू त्यागी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला सांगितले की, “रवीना टंडनने यापूर्वी काँग्रेससाठी प्रचार केला होता. चालू 20244 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराबाबत पक्षपातळीवर कोणतीही माहिती उपलब्ध नाही.” 

व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक पेजच्या सोशल स्कॅनिंगमध्ये आम्हाला दोन हजारांहून अधिक लोक या पेजला फॉलो करत असल्याचे आढळून आले.

निष्कर्ष: विश्वास न्यूजला तिच्या तपासात व्हायरल होत असलेला व्हिडिओ 2012 सालचा असल्याचे आढळले आहे. वडोदरा येथे झालेल्या रॅलीत रवीना टंडन काँग्रेसच्या प्रचारक म्हणून सहभागी झाली होती. 12 वर्ष जुना हा व्हिडिओ 2024 च्या लोकसभा निवडणुकीशी जोडून खोटा दावा केला जात आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट