X
X

Fact Check: रंजन गोगोई ने व्हाट्सअँप ग्रुप वर नमाज वाचण्यावरून ट्विट नाही केले, व्हायरल पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हा ट्विट खोटा आहे, रंजन गोगोई ने असे कुठलेच ट्विट केले नाही.

  • By: Umam Noor
  • Published: Aug 19, 2021 at 03:45 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): चीफ जस्टीस पदावरून रिटायर झालेले आणि राज्यसभा सांसद रंजन गोगोई यांच्या नावावर एक ट्विट  चा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. स्क्रीनशॉट च्या ट्विटर हॅन्डल वर रंजन गोगोई यांचे चित्र लागले आहे आणि ट्विट मध्ये मुसलमानांचे व्हाट्सअँप ग्रुप द्वारे नमाज वाचायचे सांगितले गेले होते. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात हि ट्विट खोटी असल्याचे समजले. रंजन गोगोई यांनी असे कुठलेच ट्विट केले नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Sk Khuntwal ने व्हायरल स्क्रीनशॉट शेअर केले, ज्यात लिहले होते: ”अगर तलाक फ़ोन पर दे सकते हो। तो नमाज़ व्हाट्सप्प ग्रुप पर क्यों नहीं पढ़ लेते।”
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
आपला तपास सुरु करत आम्ही रंजन गोगोई यांचे व्हायरल ट्विट ट्विटर वर शोधण्यास सुरु केले. सर्च मध्ये आम्हाला रंजन गोगोई तर्फे केलेला अधिकृत ट्विट मिळाला नाही. आम्ही व्हायरल स्क्रीनशॉट मध्ये दिलेला ट्विटर हॅन्डल @SGBJP ट्विटर वर शोधण्यास सुरु केला. त्यानावाने आम्हाला सस्पेंडेड अकाउंट मिळाला. म्हणजे या ट्विटर अकाउंट ला पहिलेच ट्विटर कडून सस्पेंड करण्यात आले आहे.

आपल्या तपासात आम्ही पुढे गूगल सर्च ची मदत घेतली आणि हे जाणून घेण्यास प्रयत्न केला कि गोगोई यांनी खरंच व्हायरल होत असलेले ट्विट केले का. सर्च मध्ये आम्हाला असे कुठलेच आर्टिकल नाही मिळाले जे याची पुष्टी करतील. जर खरंच गोगोई यांनी हा ट्विट केला असता तर हे नक्कीच बातमीत आले असते.

आता आम्ही गूगल रिव्हर्स इमेज द्वारे व्हायरल स्क्रीनशॉट चा तपास केला. सर्च मध्ये आम्हाला स्क्रीनशॉट कुठल्याच विश्वसनीय वेबसाईट वर मिळाले नाही.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट च्या पुष्टी साठी दैनिक जागरण च्या विशेष संवाददाता माला दीक्षित यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि रंजन गोगोई यांचा हा खोटा अकाउंट आहे, त्यांनी असा कुठलाच ट्विट केला नाही.

रंजन गोगोई यांच्या नावाचे ट्विटर वर बरेच पेरोडी अकाउंट बनले आहे, ज्याद्वारे नेहमीच असे स्क्रीनशॉट व्हायरल होतात. विश्वास न्यूज ने याआधी देखील गोगोई यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या ट्विट चा तपास केला होता. ह्या फॅक्ट चेक स्टोरीस इथे वाचा.
आता आम्ही व्हायरल स्क्रीनशॉट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर चा सोशल स्कॅनिंग केले. आम्हाला कळले कि फेसबुक यूजर Sk Khuntwal मध्य प्रदेश च्या इंदोर चे रहिवासी आहेत. ह्या प्रोफाइल ने आधी देखील फेक पोस्ट शेअर केल्या आहेत.


निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हा ट्विट खोटा आहे, रंजन गोगोई ने असे कुठलेच ट्विट केले नाही.

  • Claim Review : रंजन गोगोई यांनी व्हाट्सअँप ग्रुप वर नमाज वाचण्यावरून ट्विट केले
  • Claimed By : Sk Khuntwal
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later