Fact Check: : कंगना राणौत च्या समर्थनार्थ राज ठाकरेंच्या नावाने व्हायरल ट्विट आणि ट्विटर हॅन्डल खोटे आहे
कंगना रणौत च्या समर्थनार्थ राज ठाकरे यांच्या नावावर व्हायरल झालेली ट्विट आणि तो अकाउंट दोन्ही पण खोटे आहे. ते अकाउंट अधिकृत नव्हते.
- By: Abhishek Parashar
- Published: Sep 9, 2020 at 06:45 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू चा तपास, त्याबाबतीतले राजकारण, त्यात शिवसेनेचे संजय राऊत यांनी कंगना राणौत वर केलेली टिपणी संदर्भात सोशल मीडिया वर एक ट्विट व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे कि हा ट्विट राज ठाकरे यांनी केला आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. कंगना राणौत आणि महाराष्ट्र सरकार मध्ये चालू असलेल्या शाब्दिक चकमकीच्या मध्ये कंगना ला समर्थन देणारे ट्विट ला राज ठाकरेंचे वक्तव्य सांगून व्हायरल केले जात आहे. राज ठाकरेंच्या नावाने व्हायरल झालेली ट्विट आणि ट्विटर अकाउंट दोन्ही खोटे आहे.
काय होत आहे व्हायरल?
‘Raj Thackeray @proudhindu29’ हैंडल (आर्काइव लिंक) वरून ट्विट करण्यात आले (आर्काइव लिंक) आणि त्यात लिहले होते, “आगामी 9 तारिख को हिन्दू शेरनी #कंगनारनोट का महाराष्ट्र की राजधानी मुंबई में भव्य स्वागत किया जायेगा। संजयराऊत हिम्मत हैं तो रोक के दिखाना।“
अर्थात: आगामी ९ तारखेला हिंदू शेरनी #कंगना_रनोट चा महाराष्ट्राच्या राजधानीत भव्य स्वागत केल्या जाईल. संजय राऊत हिम्मत असेल ता थांबवून दाखवा.
तपास करे पर्यंत या ट्विट ला ३००० पेक्षा जास्ती लोकांनी रिट्विट केले होते.
तपास:
‘Raj Thackeray’ च्या नावाने बनलेले ट्विटर प्रोफाइल हॅन्डल ‘@proudhindu29’ या नावावरूनच संशय येतो. ट्विटर प्रोफाइल च्या बायो मध्ये दावा केला आहे कि हा राज ठाकरे यांचा अधिकृत ट्विटर हॅन्डल आहे. या हॅन्डल ला जवळपास १४ हजार लोकं फोल्लो करतात.
राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पार्टी चे प्रमुख आहे. असे असल्यास त्यांचा प्रोफाइल वेरिफाइड असणे साहजिक आहे. पण वर नमूद केलेला ट्विटर हॅन्डल वेरिफाइड नाही.
ट्विटर सर्च मध्ये आम्ही, ‘Raj Thackeray’ असे कीवर्ड सर्च केले, त्यात आम्हाला सगळ्यात आधी राज ठाकरे यांच अधिकृत ट्विटर हॅन्डल मिळाल. राज ठाकरे यांच्या ट्विटर प्रोफाइल चे हॅन्डल, ‘@RajThackeray’ असे आहे, जेव्हा कि व्हायरल झालेली ट्विट, ‘@proudhindu29’ या हॅन्डल वरून शेअर करण्यात आली होती.
म्हणजे ज्या राज ठाकरे यांच्या प्रोफाइल वरून कंगना राणौत यांच्या समर्थनार्थ ट्विट केला गेला तो खोट्या प्रोफाइल वरून केला गेला आहे.
आमचे सहयोगी दैनिक जागरण चे मुंबई ब्यूरो प्रमुख ओम प्रकाश तिवारी यांनी म्हंटले कि हा राज ठाकरे यांचा अधिकृत ट्विटर प्रोफाइल नाही आहे आणि ट्विटर वर बरेच खोटे अकाउंट्स सक्रिय आहे.
न्यूज सर्च मध्ये आम्हाला ‘मुंबई मिरर’ च्या वेबसाईट वर चार सप्टेंबर ला प्रकाशित एक बातमी मिळाली, त्या प्रमाणे राज ठाकरे यांच्या पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी कंगना रणौत ला चेतावनी दिली होती.
बातमी प्रमाणे, “कंगना रणौत यांनी मुंबई पोलिसांवर केलेली टिपण्णी आणि मुंबई ची तुलना पाकिस्तान अधिकृत कश्मीर सोबत केल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे सिनेमा विंग के प्रेसिडेंट यांनी ट्विट करून म्हंटले होते कि मुंबई पोलिसांमुळे हे शहर सुरक्षित आहे आणि महिला अर्ध्यारात्री देखील एकट्या फिरू शकतात. आम्ही कुठल्या हि अनुचित प्रकारे मुंबई पोलिसांची बदनामी हू देणार नाही.”
राज ठाकरे च्या नावावर सक्रिय खोट्या ट्विटर अकाउंट चे जवळपास १४ हजार लोक फोल्लो करतात. हा प्रोफाइल ऑगस्ट २०२० पासून ट्विटर वर सक्रिय आहे, ज्याला आता डिलीट करण्यात आले आहे.
निष्कर्ष: कंगना रणौत च्या समर्थनार्थ राज ठाकरे यांच्या नावावर व्हायरल झालेली ट्विट आणि तो अकाउंट दोन्ही पण खोटे आहे. ते अकाउंट अधिकृत नव्हते.
- Claim Review : कंगना राणौत च्या समर्थनार्थ राज ठाकरेंचा ट्विट
- Claimed By : witter User-@proudhindu29
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.