Fact Check: भटिंडा मधला थर्मल पॉवर प्लांट नाही पाडला, व्हायरल पोस्ट खोटी आहे
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल आव खोटा ठरला. उहवस्ता केलेल्या पवार प्लांट चा व्हिडिओ पानिपत चा आहे भटिंडा चा नाही.
- By: Jyoti Kumari
- Published: Sep 10, 2021 at 09:49 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्ये एका थर्मल प्लांट ला पडताना बघितले जाऊ शकते. सोशल मीडिया वर व्हायरल पोस्ट मध्ये दावा काण्यात येत आहे कि भटिंडा च्या एका थर्मल प्लांट ला उडवण्यात आले. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समोर आहे. हा व्हिडिओ भटिंडा चा नसून पानिपत चा आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर “Satwant Singh Bhullar Director” ने व्हायरल व्हिडिओ अपलोड केला आणि लिहले: “बठिंडा वाला थर्मल प्लांट बम से उड़ा दिया गया 17,000 करोड़ की मशीनरी 165 करोड़ रुपये में बेच दी? निकाल दिया धुंआ”
व्हायरल पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ चा तपास सुरु केला आणि सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओ ला Invid टूल मध्ये अपलोड करून सर्च केले, त्यानंतर किफ्रेम्स वर गूगल सर्च चा वापर केला. आम्हाला संबंधित व्हिडिओ Voice of panipat नावाच्या युट्युब चॅनेल वर 5 ऑगस्ट 2019 रोजी अपलोड केलेला मिळाला. व्हिडिओ सोबत लिहले होते: #पानीपत थर्मल प्लांट विस्फोट के बाद गिराने की लाइव तस्वीर
हा पूर्ण व्हिडिओ इथे बघा.
आम्हाला अजून एक व्हिडिओ 6 ऑगस्ट 2019 रोजी kaushal patel नावाच्या युट्युब चॅनेल वर अपलोड केलेला मिळाला. व्हिडिओ अपलोड करून लिहले: Demolition of cooling tower in panipat thermal plant. व्हिडिओ इथे बघा.
तपासावेळी आम्हाला 6 ऑगस्ट 2019 रोजी दैनिक जागरण च्या वेबसाईट वर प्रकाशित एक रिपोर्ट मिळाली. रिपोर्ट प्रमाणे, देशात पहिल्यांदा आधुनिक पद्धतीने थर्मल पावर प्लांट मध्ये विस्फोट करून, दहा सेकंदात कूलिंग टॉवर उध्वस्त करण्यात आला. आम्हाला त्याच संबंधी एक रिपोर्ट 26 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित झाल्याचे दिसले. रिपोर्ट चे शिर्शक होते “पानीपत Thermal plant में Blast कर गिराए गए तीन Cooling tower, जानें क्यों उठाया गया ऐसा कदम.” पूर्ण बातमी इथे वाचा.
आता आम्ही भटिंडा च्या पवार प्लांट च्या मागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला tribuneindia ची एक रिपोर्ट मिळाली ज्यात सांगितले होते कि आतापर्यंत फक्त चिमण्या उध्वस्त केल्या आहेत.
पंजाब सरकार ने थर्मल प्लांट च्या जागी एक औद्योगिक पार्क स्थापित कररायची घोषणा केली आहे, आणि त्या साईट वर अन्य काही योजना दखल आखल्या आहेत.
आम्ही तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, दैनिक जागरण चे भटिंडा चे रिपोर्टर गुरप्रेम लहरी यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हिडिओ भटिंडा चा नाही. त्यांनी आम्हाला हे पण सांगितले कि फक्त चिमण्या उध्वस्त करण्यात येणार आहे. व्हिडिओ सोबत चा दावा खोटा आहे. आम्ही अधिक पुष्टी साठी दैनिक जागरण चे पानीपत रिपोर्टर रवि धवन ह्यांना देखील संपर्क केला. त्यांनी सांगितले कि व्हिडिओ पानिपत चा आहे, भटिंडा चा नाही.
तपासाच्या श्वानाच्या टप्प्यात आम्ही व्हायरल दावा शेअर कररणाऱ्या यूजर चा तपास केला. फेसबुक यूजर Satwant Singh Bhullar Director चे 982 फॉलोवर्स आहेमी त्यांनी फेसबुक अकाउंट 28 जानेवारी 2015 रोजी बनवला. यूजर स्वतःला फिल्म आणि व्हीडिओ डाइरेक्टर असल्याचे सांगतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल आव खोटा ठरला. उहवस्ता केलेल्या पवार प्लांट चा व्हिडिओ पानिपत चा आहे भटिंडा चा नाही.
- Claim Review : टिंडा मधला थर्मल पॉवर प्लांट स्फोट करून पाडला
- Claimed By : Satwant Singh Bhullar Director
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.