Fact Check: रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि भारताचे उद्योगपती रतन टाटा यांनी भारताला कोरोनमुक्त करण्यासाठी आपली संपूर्ण संपत्ती खर्च करण्याबद्दल सांगितले आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. रतन टाटा यांच्या  नावाने व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे.

खरे तर रतन टाटा ने मागील वर्षी देखील कोरोनाव्हायरस सोबत लढण्यास १५०० कोटींची मदत करण्याची घोषणा केली होती. तसेच नुकतेच देखील टाटा समूहाने सरकार ला ऑक्सिजन सप्लाय मध्ये सहयोग करण्याची घोषणा केली होती. पण रतन टाटा यांनी कोरोनाव्हायरस सोबत लढण्यास संपूर्ण संपत्ती देण्याची ची इच्छा व्यक्त नाही केली.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Piyush Yadav यांनी रतन टाटा चे एक छायाचित्र शेअर केले, ज्यात लिहले होते: रतन टाटा जी ने कहा—मेरी सारी संपत्ति चली गई तो भी चलेगा, लेकिन भारत कोरोना मुक्त होना चाहिए..इस महान देशभक्त के जज्बे को प्रणाम…आओ!लगाए पूरा यत्न..टाटा जी को मिले भारत—रत्न..

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट मध्ये केलेले दावे सगळ्यात आधी कीवर्ड सर्च च्या मदतीने इंटरनेट वर शोधून काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला अशी कुठलीच मीडिया रिपोर्ट मिळाली नाही, ज्यात व्हायरल दाव्याची पुष्टी केली जाईल. जर रतन टाटा यांनी असे वक्तव्य केले असते तर हि एक मोठी बातमी असती.

या नंतर आम्ही रतन टाटा यांचे अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल तपासले, पण आम्हाला असा कुठलाच पोस्ट मिळाला नाही. टाटा हे सोशल मीडिया वर बरेच ऍक्टिव्ह असतात.
अधिक माहिती साठी आम्ही टाटा समूहाचे कॉरपोरेट कम्युनिकेशन पर्सनल बॉब जॉन यांना इमेल द्वारे संपर्क केला. आम्हाला इमेल मध्ये बॉब यांनी स्पष्ट केले कि रतन टाटा यांनी असे कुठलेच वक्तकव्य केले नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे.

मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे, मागील वर्षी, मार्च मध्ये रतन टाटा आणि टाटा अँड सन्स ने १५०० कोटी रुपये कोविड सोबत लढण्यास देण्याचे ठरवले होते. यात टाटा ट्रस्ट ने ५०० कोटी आणि टाटा सन्स ने १००० कोटी देण्याचे सांगितले होते.

तसेच नुकतेच टाटा ग्रुप ने ट्विट करून मेडिकल ऑक्सिजन सप्लाय आणि प्रोडक्शन वाढवण्यास शासनाला मदत कार्याची घोषणा केली होती. तसेच टाटा समूहाने लिक्विड ऑक्सीजन ट्रांसपोर्ट करण्यास २४ क्रायोजेनिक कंटेनर्स इम्पोर्ट केले होते.

फेसबुक पोस्ट शेअर करणारे यूजर Piyush Yadav यांची प्रोफाइल आम्ही तपासली. प्रोफाइल ला स्कॅन केल्या नंतर आम्हाला कळले कि यूजर ग्राफिक देसाईनर आणि मोटिवेश्नल स्पीकर आहे. यूजर ने हि पोस्ट  positive soch नावाच्या ग्रुप वर शेअर केली होती. तपास पूर्ण होत पर्यंत त्याचे २५ लाख फॉलोवर्स होते.


False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट