Fact Check: २५ सप्टेंबर पासून संपूर्ण देशात नाही लागत आहे लोकडाऊन, NDMA च्या नावानी व्हायरल होत असलेले पत्र खोटे आहे

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): कोरोनाव्हायरस च्या वाढत्या संक्रमणामुळे संक्रमितांची संखया ४९ लाख यापेक्षा पण जास्ती झाली आहे. असे असताना सोशल मीडिया वर परत संपूर्ण देशात लौकरच लोकडाऊन लागण्याचे संदेश परत फिरू लागले आहे. नुकताच, केंद्र सर्जरी २५ सप्टेंबर पासून संपूर्ण देशात लोकडाऊन जाहीर करणार असल्याचे एक पत्रक सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.

विश्वास न्यूज च्या तपासात हि फक्त एक अफवा असल्याचे समजले. २५ सप्टेंबर पासून संपूर्ण देशात लोकडाऊन लागण्याची घोषणा करणारा दावा खोटा ठरला.

काय होत आहे व्हायरल:
२५ सप्टेंबर पासून संपूर्ण देशात लोकडाऊन लागणार असल्याचा दावा करणारे एक पत्रक व्हायरल होत आहे. असा दावा करण्यात येत आहे कि हे पत्रक, नेशनल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी (NDMA) कडून जाहीर करण्यात आले आहे, आणि असे सांगण्यात येत आहे कि पंतप्रधान कार्यालयातून २५ सप्टेंबर च्या अर्ध्या रात्री पासून ४६ दिवस परत लोकडाऊन लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

तपास:
व्हायरल पोस्ट मध्ये असे सांगण्यात येत आहे कि हे पत्रक, NDMA कडून लिहले गेले आहे आणि देशात परत संपूर्ण लोकडाऊन ची मागणी करण्यात येत आहे, म्हणून आम्ही सगळ्यात आधी NDMA चे संकेतस्थळ तपासले. NDMA च्या वेबसाईट वर एडवाइजरी वाल्या सेक्शन मध्ये एक मे २०२० मध्ये अपलोड केलेल्या ऑर्डर ची प्रत मिळाली. ह्या ऑर्डर मध्ये, ४ मे नंतर दोन आठवड्यांकरिता लोकडाऊन वाढवण्यासंदर्भात निर्देश दिले गेले होते. या आदेशात आम्हाला
NDMA कडून दिलेल्या पत्राचा स्वरूप मिळाला ज्याची नकल करून NDMA च्या नावानी व्हायरल झालेले पत्र बनवण्यात आले आहे.

सर्च मध्ये आम्हाला सध्याची एडवाइजरी किंवा प्रेस रिलीज नाही मिळाली, ज्यात NDMA तर्फे लोकडाऊन वाढवण्याची मागणी केली गेली असेल.

विश्वास न्यूज ने एनडीएमए चे डायरेक्टर (पीआर एंड एजी) भूपिंदर सिंह यांच्या सोबत संपर्क साधला, सिंह यांनी आम्हाला सांगितले, “एनडीएमए तर्फे असे कुठलेच पत्रक काढले गेलेले नाही. आम्ही लोकडाऊन लावण्यासंदर्भात किंवा वाढवण्यासंदर्भात शासनाला कुठल्याच प्रकारचा सल्ला दिलेला नाही आणि आम्ही तो देत पण नाही.

त्यानंतर आम्ही न्यूज सर्च च्या मदतीने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला कि, अश्या काही बातम्या आहेत का ज्यात परत एकदा भारतात देशव्यापी लोकडाऊन लावण्याबद्दल सांगण्यात आले असेल. आम्हाला अशी कुठलीच रिपोर्ट मिळाली नाही, पण आम्हाला एक बातमी मिळाली ज्यात, इजराइल सरकारने तीन आठवड्यांसाठी देशव्यापी लोकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हायरल होत असेलेल्या पत्रात लिहले आहे कि कोरोनाव्हायरस च्या वाढत्या संक्रमणाला थांबवण्यासाठी आणि मृत्युदर कमी करण्यासाठी २५ सप्टेंबर २०२० च्या अर्ध्या रात्रीपासून येत्या ४६ दिवसांकरिता लोकडाऊन लावण्याची आवश्यकता आहे.
स्वास्थ्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहिती प्रमाणे, भारतात संक्रमण वाढत आहे पण रिकवरी रेट आत 78.27 टक्के इतका वाढला आहे. एकूण रुग्णांची संख्या ६० टक्के, पाच सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये आहे आणि तिथे रिकवरी रेट पण ६० टक्केच आहे.

COVID19 India Tracker प्रमाणे, (१५ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकड्यानुसार) भारतात एकूण रुग्णांची संख्या ४९ लाख च्या पुढे गेली आहे, या रोगामुळे आतापर्यंत भारतात ८०,७७६ लोकांची मृत्यू झाली आहे.

https://twitter.com/COVIDNewsByMIB/status/1305742370877530113

Disclaimer: विश्वास न्यूजच्या कोरोनाव्हायरस (COVID-19) संबंधित फॅक्ट-चेक स्टोरी वाचताना किंवा शेअर करताना, आम्ही वापरलेला डेटा किंवा संशोधन डेटा बदलू शकतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाव्हायरस संबंधित डेटा (संक्रमित असलेले, बरे झालेले रुग्ण आणि मृत्युमुखी पडलेले रुग्ण यांची संख्या) सतत बदलत राहते. तसेच लस (व्हॅक्सिन) शोधण्याच्या दिशेने संशोधनाचे ठोस परिणाम यायचे आहेत आणि त्यामुळे, उपचार आणि प्रतिबंधासाठी उपलब्ध असलेला डेटा देखील बदलू शकतो. म्हणून जेव्हा तुम्ही फॅक्ट-चेक वाचाल तेव्हा त्याची तारीख पडताळणे आवश्यक आहे.

Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट