Fact Check: 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नाही द्यावे लागणार ओळखपत्र, व्हायरल दावा भ्रामक
- By: Abhishek Parashar
- Published: May 29, 2023 at 06:42 PM
- Updated: Jul 10, 2023 at 05:57 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). भारतीय रिझर्व्ह बँके (आरबीआय)द्वारे 2000 रुपयांच्या नोटा सर्क्युलेशन किंवा चलनातून मागे घेण्याच्या निर्णयानंतर, सोशल मीडिया वापरकर्त्यांचा दावा आहे की आता नोटाबंदीप्रमाणे नोटा बदलण्यासाठी लोकांना या वेळी देखील एक विशेष फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये ओळखपत्रसह इतर माहिती द्यावी लागेल. या दाव्याबरोबरच स्लिप फॉर एक्सचेंजची एक प्रत देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नोटांना बदलण्याच्या प्रक्रियेशी संबंधित तपशील नमूद केला आहे.
आम्हाला आढळले की, व्हायरल दावा भ्रामक आहे. 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांना बँकेत कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र देण्याची गरज पडणार नाही. भारतीय स्टेट बँक (एसबीआय)ने 2000 रुपयांच्या नोटांना बदलण्यासाठी एक्सचेंज स्लिप (ज्यामध्ये ओळखपत्राचा तपशील देणे अनिवार्य होते) अनिवार्य केले होते, जे तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात आले आहे. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत.
काय आहे व्हायरल?
सोशल मीडिया वापरकर्ता ‘मोहम्मद जकारिया खान’ याने व्हायरल पोस्ट (संग्रहित लिंक) शेअर करत लिहिले होते की , “बंधू आणि भगिनींनो, आला आहे तो फॉर्म, जो भरण्यासाठी तुम्हाला बँकेत रांगेमध्ये उभे राहावे लागणार आहे.”
इतर अनेक वापरकर्त्यांनीही या फॉर्मला तशाच आणि मिळत्या जुळत्या दाव्यासह शेअर केले आहे. ट्विटरवर देखील वापरकर्ते या दाव्याला शेअर करत आहेत.
तपास
भारतीय रिझर्व्ह बँके (आरबीआय)ने 19 मे, रोजी 2000 रुपयांच्या नोटांचे चलन मागे घेण्याची घोषणा केली होती. याच बरोबर, आरबीआयने स्पष्ट केले होते की, या नोटा सर्क्युलेशन किंवा चलनातून काढून घेतल्यानंतरही वैध राहतील.
आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ‘क्लीन नोट पॉलिसी’च्या अंतर्गत 2000 रुपयांच्या नोटांना सर्क्युलेशनमधून मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, या नोटा वैध राहतील. अधिसूचनेनुसार, “सामान्य प्रक्रियेचा एक भाग म्हणून लोक त्यांच्या बँक शाखेतील त्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांच्या नोटा जमा करू शकतात किंवा इतर नोटांसह अदला-बदली करू शकतात.” नोटा जमा करण्याची प्रक्रिया ही एक सामान्य प्रक्रिया असेल आणि कोणत्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया विद्यमान आणि इतर वैध वैधानिक तरतुदींनुसार असेल.”
आरबीआयच्या अधिसूचनेनुसार, “23 मे, 2023 पासून, 20,000 रुपयांपर्यंत 2,000 रुपयांच्या नोटा बँकांच्या सामान्य कामकाजासाठी आणि कामकाजाच्या सोयीसाठी एका वेळी बदलल्या जाऊ शकतात.”
नोटा बदलण्याची ही सुविधा, आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच बँकांमध्ये उपलब्ध असेल. त्याच बरोबर, आरबीआयने सर्व बँकांना तातडीने 2000 रुपयांच्या नोटा जारी करण्याचा सल्ला दिला आहे.
या संपूर्ण अधिसूचनेत 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लेख नाही, जसे की व्हायरल पोस्टमध्ये दावा केला आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँक खात्यात 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा त्यांना इतर नोटांमध्ये बदलण्याची प्रक्रिया सामान्य प्रक्रियेनुसार पूर्ण केली जाईल.
विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टमधील दाव्याबाबत आरबीआयच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला. 2000 रुपयांच्या नोटांना बदलण्यासाठी विशेष फॉर्म (स्लिप फॉर एक्सचेंज) भरण्याची आणि ओळखपत्र देण्याची गरज असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “यासाठी कोणत्याही आईडी प्रूफची किंवा ओळखपत्राची आवश्यकता नाही.” त्यांना सामान्य पद्धतीने जमा केले जाऊ शकते किंवा इतर नोटांमध्ये बदलले जाऊ शकते.”
बातम्यांच्या शोधात आम्हाला असे अनेक अहवाल सापडले आहेत, ज्यात एसबीआयच्या हवाल्याने सांगितले गेले आहे की, 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही फॉर्म किंवा आयडी कार्डची आवश्यकता नाही. न्यूज एजन्सी एएनआयनेही आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.
भारतीय स्टेट बँक (एसबीआय)ने 19 मे, 2023 रोजी ई-सर्क्युलरच्या परिशिष्ट IIIमध्ये 2000 रुपयांच्या नोटांच्या अदला-बदलीसाठी ओळखपत्र आवश्यक असल्याचे म्हटले होते. ‘द हिंदू’च्या अहवालानुसार, एसबीआयने हा निर्णय 21 मे रोजी मागे घेतला आहे. बँकेच्या शाखांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, अदला-बदलीसाठी ओळखपत्र देण्याची गरज पडणार नाही.”
“म्हणून, 19 मे, 2023 च्या ई-सर्क्युलरच्यापरिपत्रकात समाविष्ट संलग्नक तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात आले आहेत. ई-सर्कुलरमध्ये समाविष्ट केलेल्या इतर सूचनांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.”
आरबीआयच्या संकेतस्थळावर आम्हाला 22 मे रोजी अधिसूचना प्राप्त झाली, जिच्यात सर्व बँकांच्या अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संबोधित करत म्हटले आहे की, “19 मे, 2023 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सर्व काऊंटरवर सामान्य प्रक्रियेनुसार 2,000 रुपयांच्या नोटांची अदला-बदली करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून दिली जाईल.
यासोबतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी लोकांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, त्यांनी बँकेत गर्दी करण्याची गरज नाही, कारण 2000 रुपयांच्या नोटा वैध राहतील.
दास म्हणाले की, नोटाबंदीनंतर, ज्या उद्देशाने 2,000 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या, तो उद्देश पूर्ण झाला आहे आणि आता इतर मूल्यांच्या नोटा बँकिंग प्रणालीमध्ये पुरेशा प्रमाणात आहेत. त्याचबरोबर 2000 रुपयांच्या नोटेचे चलनही कमी झाले असून ते 6 लाख 73 हजार कोटींवरून 3 लाख 62 हजार कोटींवर आले आहे. यासोबतच या नोटेची छपाईही बंद करण्यात आली आहे.
खोट्या दाव्याने व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या वापरकर्त्याला फेसबुकवर सात हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. 2000 रुपयांच्या नोटांसह इतर बँक नोटांशी संबंधित व्हायरल दाव्यांच्या तपासाबाबत विश्वास न्यूजचे फॅक्ट चेक अहवाल येथे वाचता येतील.
निष्कर्षः रिझव्र्ह बँकेने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्यावर बदली करताना ‘स्लिप फॉर एक्स्चेंज’ फॉर्म भरावा लागेल आणि ओळखीचा पुरावा द्यावा लागेल हा दावा खोटा आहे. 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची किंवा कोणताही ओळखीचा पुरावा सादर करण्याची गरज नाही.
- Claim Review : 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी विशेष फॉर्म भरावा लागेल.
- Claimed By : फेसबुक वापरकर्ता-मोहम्मद जकारिया खान
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.