Fact Check: भाजप ने गांधी परिवाराची माफी मागितली असा दावा करणारा ट्विट खोटा आणि एडिटेड आहे
गांधी परिवाराविरुद्ध सीबीआई च्या तपासात कुठलाच पुरावा मिळाला नाही आणि त्यासंबंधी भाजप ने त्यांची कोर्टात माफी मागितली, असा दावा करणारा ट्विट खोटा आहे.
- By: Abhishek Parashar
- Published: Sep 2, 2021 at 04:06 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर हिंदी न्यूज चॅनेल आज तकच्या नावाने एक ट्विट चा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. ट्विट मध्ये दावा करण्यात येत आहे कि सीबीआई ला गांधी परिवाराच्या विरोधात कुठलाच पुरावा सापडला नाही म्हणून भाजप ने कोर्टात गांधी परिवाराला माफी मागितली.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. गांधी परिवाराच्या विरोधात कुठलाही पुरावा नाही सापडला आणि भाजप नि त्यांची कोर्टात माफी मागितली हा दावा करणारी पोस्ट खोटी आणि एडिटेड असल्याचे विश्वास न्यूज च्या तपासात समजले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Meer Aurangzeb Khan’ ने आपल्या प्रोफाइल वर (आर्काइव्ह लिंक) एक व्हायरल ट्विट शेअर करून लिहले: बहुत खूब।कोई बताये ये भी सत्य है क्या?
फेसबुक वर इतर यूजर्स देखील मिळत्या जुळत्या दाव्यासह हा ट्विट शेअर करत आहे.
तपास:
ट्विट मध्ये कुठल्याच सोर्स चा उल्लेख नाही केला गेला आहे, जेणेकरून हा दावा खोटा किंवा संदिग्ध असल्याचे सिद्ध होईल. असे काही घडले असते तर हि एक खूपच मोठी बातमी ठरली असती, पण विश्वास न्यूज ला अशी बातमी ना आज तक वर ना कुठल्याच वेरिफाइड सोशल मीडिया वेबसाईट वर सापडली. आम्हाला हि बातमी दुसऱ्या कुठल्या वेबसाईट वर देखील नाही मिळाली.
न्यूज सर्च मध्ये देखील आम्हाला अशी बातमी कुठेच आढळली नाही. सर्च च्या वेळी आम्हाला आज तक च्या वेरिफाइड प्रोफाइल वर एक ट्विट केलेला दिसला. ह्या ट्विट मध्ये फेक ट्विट चे खंडन करण्यात आले होते. आज तक च्या वेरिफाइड फेसबुक पेज वर 31 ऑगस्ट रोजी केलेल्या पोस्ट मध्ये हा ट्विट खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे.
ह्या ट्विट वरुन आम्ही आज तक च्या न्यूज रूम मध्ये काम करणारे पत्रकार यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले, “हा ट्विट फेक आणि एडिटेड आहे, ज्याला मुद्धाम चुकीच्या मजकुरासह बनवण्यात आले आहे. साधारणतः अशी कुठली बातमी असली तर त्यात एका स्रोत चा उल्लेख असतो ज्याच्या करून हि बातमी मिळाली. पण व्हायरल ट्विट मध्ये तसे केले गेले आहे.”
व्हायरल ट्विट शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केल्यावर असे लक्षात आले कि त्यांनी प्रोफाइल वर स्वतःला सीईओ असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या प्रोफाइल ला जवळपास तीन हजार पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: गांधी परिवाराविरुद्ध सीबीआई च्या तपासात कुठलाच पुरावा मिळाला नाही आणि त्यासंबंधी भाजप ने त्यांची कोर्टात माफी मागितली, असा दावा करणारा ट्विट खोटा आहे.
- Claim Review : भाजप ने गांधी परिवाराची माफी मागितली
- Claimed By : FB User-Meer Aurangzeb Khan
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.