Fact Check: अमिताभ बच्चन कुटुंबासह बागेश्वर धामला गेले नव्हते, जुन्या व्हिडिओला संपादित करून पसरवले जात आहे असत्य
- By: Jyoti Kumari
- Published: May 31, 2023 at 11:59 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम नेहमीच चर्चेत असते. बागेश्वर धामला भेट देणाऱ्या अनेक सेलिब्रिटींच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता एक व्हिडिओ व्हायरल करत अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबासह बागेश्वर धामला गेले असल्याचा दावा काही सोशल मीडिया वापरकर्ते करत आहेत. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता नंदा, आराध्या बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन दिसत आहेत.
विश्वास न्यूजने या दाव्याची चौकशी केली. मात्र, हा दावा खोटा आणि आधारहीन असल्याचे समोर आले आहे. व्हायरल व्हिडीओ 2016च्या दुर्गापूजेचा आहे, ज्यास आता बागेश्वर धामला जोडून व्हायरल केले जात आहे.
काय व्हायरल होत आहे?
फेसबुक पेज ज्ञान गंगा (GYAN GANGA)ने 12 मे, 2023 रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘बागेश्वर धामवर अमिताभ बच्चन कुटुंबीयांसोबत’.
या पोस्टची संग्रहित लिंक इथे पाहता येईल.
तपास
बागेश्वर धामला जाणाऱ्या बच्चन कुटुंबाचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी संबंधित कीवर्डच्या मदतीने विश्वास न्यूजने प्रथम गुगलवर ओपन सर्च केले. बच्चन कुटुंब कधी बागेश्वर धामला गेले होते याची पुष्टी करण्यासाठी आम्हाला कोणतीही बातमी मिळाली नाही.
तापास पुढे नेत असताना, आम्ही यूट्यूब (YouTube)वर संबंधित कीवर्डने शोध सुरू केला. या दरम्यान, आम्हाला मुव्ही टॉकीजच्या सत्यापित यूट्यूब (YouTube) चॅनलवर वास्तविक व्हिडिओ सापडला. 10 ऑक्टोबर, 2016 रोजी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. “हा व्हिडिओ दुर्गापूजाचा आहे.”
या व्हायरल व्हिडिओशी संबंधित व्हिडिओ रिपोर्ट जनसत्ताच्या सत्यापित यूट्यूब (YouTube) चॅनलवरही पाहता येईल. 10 ऑक्टोबर, 2016 रोजी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबासह दुर्गा पूजेत सहभागी झाले होते. अमिताभ बच्चन यांच्यासोबत पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, मुलगी श्वेता बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन हे देखील होते. मुंबईतील रामकृष्ण मिशन हॉस्पिटलमध्ये ही दुर्गापूजा आयोजित केली गेली होती.”
या व्हायरल व्हिडीओशी संबंधित बातम्या इतर अनेक न्यूज वेबसाईटवर पाहता येऊ शकतात. अधिक माहितीसाठी, आम्ही नई दुनियाच्या छतरपूरचे ब्युरो चीफ भारत यांच्याशी संपर्क साधला. “व्हायरल दावा चुकीचा आहे ,” त्यांनी आम्हाला सांगितले. बॉलिवूडचा कोणताही अभिनेता बागेश्वर धाममध्ये आलेला नाही.
यापूर्वी बागेश्वर धामला भेट देणाऱ्या अनेक सेलिब्रिटींबद्दलचे असे खोटे दावे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्याचा तपास विश्वास न्यूजने केला होता. तुम्ही आमची फॅक्ट चेक कथा येथे वाचू शकता.
तपासाच्या शेवटी, आम्ही चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याची तपासणी केली. फेसबुकवर या पेजला 7 हजारांहून अधिक लोकांनी फॉलो केल्याचे तपासात समोर आले आहे. 9 मार्च रोजी हे फेसबुक पेज बनवण्यात आले होते.
निष्कर्षः विश्वास न्यूजला बच्चन कुटुंबाचा बागेश्वर धामला जाण्याचा व्हायरल दावा चुकीचा आढळला आहे. व्हायरल व्हिडिओ 2016चा आहे, जेव्हा संपूर्ण बच्चन कुटुंब मुंबईतील रामकृष्ण मिशन हॉस्पिटलमध्ये आयोजित दुर्गा पूजेला उपस्थित होते. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
- Claim Review : अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबासह बागेश्वर धामला गेले आहेत.
- Claimed By : ज्ञान गंगा (GYAN GANGA)
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.