X
X

Fact Check: बदामाने डोकेदुखी बरी होते, असा दावा करणारी पोस्ट दिशाभूल करणारी आहे

विश्वास न्यूजने तपास केला आणि हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले. बदाम एस्पिरिनची जागा घेऊ शकतात याची पुष्टी करणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

  • By: Urvashi Kapoor
  • Published: Mar 30, 2022 at 09:18 PM
  • Updated: Mar 30, 2022 at 09:30 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एक पोस्ट मध्ये असा दावा करण्यात येत आहे कि डोकेदुखी मध्ये बदाम एस्प्रिन पेक्षा जास्ती चांगल्याने काम करते. पोस्ट मध्ये असा दावा करण्यात येत आहे कि डोकेदुखी असल्यास दहा ते बारा बदाम खायला हवे. पोस्ट मध्ये पुढे दावा करण्यात येत आहे कि 10-12 बादाम दोन एस्प्रिन च्या बरोबरीचे आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?

एका सोशल मीडिया पोस्ट वर लिहले होते: “सिरदर्द का उपाय। अगली बार सिरदर्द होने पर दो एस्पिरिन के बजाये 10-12 बादाम खाएं।”
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि एस्पिरिन सैलिसिलेट्स नावाच्या औषधाच्या समूहात आहेत. हे औषध ताप, सर्दी, सूज कमी करते.

आम्हाला तपासाच्या पुढच्या टप्प्यात नेशनल लाइब्रेरी ऑफ मीडिया च्या वेबसाईट वर 2001 ची एक रिपोर्ट मिळाली. ह्यात सांगितले गेले होते कि एस्पिरिन एसिटिलेटेड सैलिसिलेट्स नावाच्या समूहाशी संबंधित एक सैलिसिलेट आहे, जी साइक्लोऑक्सीजिनेज (सीओएक्स) -1 किंवा -2 गतिविधी लक्षात घेत प्रोस्टाग्लैंडीन चे उत्पादन करते. ह्या माध्यमातून डोकेदुखीतुन आराम मिळतो.

एका अन्य रिपोर्ट प्रमाणे सैलिसिलेट च्या अति वापराने, डोकेदुखी हू शकते.

सिडनी लोकल हेल्थ डिस्ट्रिक्ट च्या एका रिपोर्ट प्रमाणे एनएसडब्ल्यू सरकार ने सुझाव दिले कि बदाम मध्ये देखील सैलिसिलेट असतो. कारण सैलिसिन प्राकृतिक रूपाने सापडला जाणारा सैलिसिलेट आहे. असे मानले जाते कि बदामाने डोकेदुखी आणि मायग्रेन पूर्णपणे ठीक होते.

काही अध्ययनात असे सुचवण्यात आले कि बदाम डोकेदुखी पासून प्रभावी आहे.

एका बायोमेडिकल अध्ययनात आहार आणि डोकेदुखी मध्ये विश्लेषण करण्यात आले. हे इथे वाचा.

पण, वर वर्णन केलेल्या अभ्यासांपैकी कोणताही अभ्यास ज्या पद्धतीद्वारे आहारामुळे डोकेदुखी कमी होतो ते स्पष्ट करत नाही. म्हणून, बदाम डोकेदुखीवर उपचार करू शकतात किंवा डोकेदुखीच्या उपचारांसाठी ऍस्पिरिनची जागा घेऊ शकतात हे स्थापित करण्यासाठी आणखी संशोधन करणे आवश्यक आहे.

विश्वास न्यूजने डॉ अभिषेक जुनेजा, सल्लागार न्यूरोलॉजिस्ट, महाराजा अग्रसेन हॉस्पिटल, डॉ जुनेजा न्यूरो सेंटर यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले “बदाम एस्पिरिनची जागा घेऊ शकतात याची पुष्टी करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. बदाम हे आरोग्यदायी अन्न मानले जात असले तरी, डोकेदुखीवर उपचार म्हणून त्यांचा वापर सिद्ध करणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.”

ही पोस्ट फेसबुकवर ‘न्यूट्रिशनिस्ट अलीजय खटक’ नावाच्या पेजने शेअर केली आहे. आम्ही पृष्ठ स्कॅन केले आणि आढळले की आहार आणि पोषण संबंधित अनेक पोस्ट आहेत. पेजचे 65 फॉलोअर्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने तपास केला आणि हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले. बदाम एस्पिरिनची जागा घेऊ शकतात याची पुष्टी करणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

  • Claim Review : सिरदर्द का उपाय। अगली बार सिरदर्द होने पर दो एस्पिरिन के बजाये 10-12 बादाम खाएं।
  • Claimed By : न्यूट्रिशनिस्ट अलीजय खटक
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later