Fact Check: वीर सावरकरांना श्रद्धांजली देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र चुकीच्या दाव्यांसह गोडसे चे सांगून व्हायरल

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात केलेला दावा खोटा ठरला. पंतप्रधा नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्या समोर नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समोर हाथ जोडून बसले आहेत. हे छायाचित्र पोर्ट ब्लेअर चे आहे जेव्हा मोदींनी २०१८ च्या आपल्या यात्रेच्या वेळी सेल्युलर जेल ला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली होती.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक पोस्ट व्हायरल व्हायरल होत आहे, ज्यात मोदी एका छायाचित्रासमोर हाथ जोडून बसलेले दिसतात. पोस्ट सोबत एक दावा व्हायरल होत आहे, कि पीएम मोदी गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांना श्रद्धांजली देत आहेत.

विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. पंतप्रधान मोदी हे गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्या समोर बसलेले नसून वीर सावरकर यांच्या छायाचित्रासमोर हाथ जोडून बसले आहे. हे छायाचित्र तेव्हाचे आहे जेव्हा २०१८ च्या यात्रेच्या वेळी ते पोर्ट ब्लेअर च्या सेल्युलर जेल मध्ये सावरकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यास केले होते.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर R V Sundar Raj ने १८ ऑगस्ट रोजी दोन छायाचित्र अपलोड केले. या कोलाज मध्ये वरच्या छायाचित्रात नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली देताना दिसतात तसेच, दुसऱ्या छायाचित्रात खाली वीर सावरकरांसमोर हाथ जोडून बसलेले दिसतात.

पोस्ट सोबत दावा करण्यात आला आहे (तामिळ मधून मराठीत अनुवादित),”आता सांगा, आमच्या शहरात लोकांना काय नाव द्यावे? एकी कडे महात्मा गांधींना प्रार्थना करतात तर दुसरी कडे त्यांचे मारेकरी गोडसे यांच्या समोर हाथ जोडतात. भारत पुढे जात आहे.”

या पोस्ट ची अर्काइव्ह लिंक इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ला सगळ्यात आधी तपास लावायचा होता कि व्हायरल छायाचित्रात ज्या छायाचित्र समोर नरेंद्र मोदी बसले होते. सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही व्हायरल पोस्ट मध्ये दिलेल्या छायाचित्राच्या कोलाज ला क्रॉप केले आणि गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड केले. आम्हाला अशे बरेच छायाचित्र मिळाले ज्यात नरेंद्र मोदी एका छायाचित्रासमोर नमन करताना दिसतात.

आम्हाला हे छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर अपलोड केलेला मिळाला. हे छायाचित्र ३० डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर अपलोड केले. पोस्ट मध्ये त्यांनी कॅप्शन मध्ये लिहले होते, “Among those imprisoned at Cellular Jail was the great Veer Savarkar. I visited the cell where the indomitable Veer Savarkar was lodged. Rigorous imprisonment did not dampen Veer Savarkar’s spirits and he continued to speak and write about a free India from jail too.”

अर्थात: सेल्ल्युलर जेल मध्ये तुरुंगात असलेल्या अनेकांमधले एक म्हणजे महान वीर सावरकर. मी त्या सेल ला भेट दिली जिथे वीर सावरकरांना बंदी म्हणून ठेवल्या गेले होते. कठोर शिक्षा घेऊन सुद्धा सावरकरांचा आत्मविश्वास नाही डगमगला आणि स्वतंत्र भारताबद्दल ते तुरुंगातून लिहू तसेच बोलू लागले.

आम्हाला नरेंद्र मोदी यांच्या अंदमान आणि निकोबार च्या यात्रेबद्दल आणि तिथल्या सेल्ल्युलर जेल च्या भेटीबद्दल अनेक मीडिया रिपोर्ट मिळाल्या. या जेल मध्ये सावरकरांनी १० वर्ष कैदेत काढले होते.

विश्वास न्यूज ने या नंतर बीजेपी चे प्रवक्ता तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हा दावा खोटा आहे. हे छायाचित्र २०१८ साल चे आहे, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनि सावरकरांना हाथ जोडले होते.

व्हायरल झालेल्या पोस्ट मधील छायाचित्र कुठलॆ आहे हे आम्ही गूगल रिवर्स इमेज सर्च वापरून जाणून घ्यायचा प्रयत्न केला, आम्हाला हे छायाचित्र indianexpress.com च्या संकेतस्थळावर सापडले. व्हायरल पोस्ट मधले गांधींसमोर नतमस्तक होतानाचे मोदींचे छायाचित्र राजकोट मधले आहे, जेव्हा ३० सप्टेंबर २०१८ रोजी ते महात्मा गांधी म्यूज़ियम येथे गेले होते.

शेवटी आम्ही त्या यूजर ची सोशल सकॅनिंग केली ज्याने हि पोस्ट शेअर केली. R V Sundar Raj नावाच्या फेसबुक यूजर ला १४२ लोकं फोल्लो करतात आणि यूजर विशाखापट्टणम चा रहिवासी आहे.

निष्कर्ष: निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात केलेला दावा खोटा ठरला. पंतप्रधा नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्या समोर नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समोर हाथ जोडून बसले आहेत. हे छायाचित्र पोर्ट ब्लेअर चे आहे जेव्हा मोदींनी २०१८ च्या आपल्या यात्रेच्या वेळी सेल्युलर जेल ला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली होती.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट