नवी दिल्ली (विश्वास न्यूज). पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी जागतिक हवामान कृती शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दुबईत दाखल झाले होते. याच्याच संदर्भात, बुर्ज खलिफाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओला शेअर करून दावा केले जात आहे की, त्यांचे स्वागत बुर्ज खलिफावर फोटो प्रदर्शित करून करण्यात आले आहे.
या व्हायरल व्हिडिओबाबत करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे विश्वास न्यूजला आपल्या तपासात आढळून आले. खरे तर हा व्हायरल व्हिडिओ जवळपास 6 महिने जुना आहे. खरे पाहता, फ्रान्सचा दौरा संपल्यानंतर पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल झाले होते. यादरम्यान, तेथे त्यांचे स्वागत बुर्ज खलिफावर त्यांचा आणि तिरंग्याचा एक फोटो प्रदर्शित करण्यात आला होता.
फेसबुकचा वापरकर्ता ‘इस्लाम शेरा इस्लाम शेरा‘ याने व्हायरल व्हिडिओला शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “दुबई, जगातील सर्वात खंबीर नेते, PMO India श्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.”
पोस्टची संग्रहित लिंक येथे पहा.
जगातील सर्वात खंबीर नेते, श्री @narendramodi जी चे दुबईमध्ये भव्य स्वागत… pic.twitter.com/pukdSM78gC
— Brijesh Rai (@BrijeshRai4bjp) December 1, 2023
या व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही संबंधित कीवर्डसह गुगलवर शोध सुरू केला. आम्हाला दाव्याच्या संबंधित एक अहवाल नवभारत टाइम्सच्या वेबसाइटवर सापडला. 15 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपला फ्रान्सचा दौरा संपवून एक दिवसीय दौऱ्यासाठी संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे दाखल झाले. या दरम्यान, त्यांच्या स्वागतार्थ बुर्ज खलिफावर त्यांचा आणि तिरंग्याचा फोटो प्रदर्शित करण्यात आला होता.
तपासादरम्यान, आम्हाला, व्हायरल दाव्याशी संबंधित इज व्हिडिओ अहवाल, 15 जुलै 2023 रोजी इकॉनॉमिक टाइम्सच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर अपलोड केलेला आढळला. वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संयुक्त अरब अमिराती (यूएई – UAE)मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. दुबईतील सर्वात उंच इमारत, बुर्ज खलिफावर भारतीय राष्ट्रध्वजाला रोषण करण्यात आले. बुर्जमधील लाइट-अँड-साउंड शोचा एक भाग म्हणून, त्यांचा फोटो देखील प्रदर्शित करण्यात आले. यानंतर एक वाक्य देखील दाखविले जात होते, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपले स्वागत आहे.”
इतर बातम्या येथे पहा.
अधिक माहितीसाठी आम्ही दैनिक जागरणच्या राष्ट्रीय ब्युरोचे पत्रकार, नीलू रंजन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की, व्हायरल व्हिडिओ, जेव्हा ते युएई (UAE)ला गेले होते, तेव्हाचा सुमारे सहा महिने जुना आहे.
आम्ही बुर्ज खलिफाशी संपर्क साधला आहे. जेव्हा ते उत्तर देतील, तेव्हा अहवाल अपडेट केला जाईल.
शेवटी, खोट्या दाव्यासह व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे खाते आम्ही स्कॅन केले. आम्हाला आढळले की, वापरकर्त्याने एक विचारधारेशी सबंधित पोस्ट शेअर केली आहे. या वापरकर्त्याला 7.4 हजार फॉलोअर्स आहेत.
निष्कर्षः विश्वास न्यूजला आपल्या तपासणीत असे आढळले की, बुर्ज खलिफावरील पंतप्रधान मोदींच्या फोटोचा व्हायरल व्हिडिओ सुमारे 6 महिने जुना आहे. फ्रान्सचा दौरा संपल्यानंतर पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल झाले होते. यादरम्यान, बुर्ज खलिफावर त्यांचा आणि तिरंग्याचा एक फोटो प्रदर्शित करण्यात आला होता.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923