विश्वास न्यूजने तपास केला आणि आढळले की बागेश्वर धाम येथे पीएम मोदींच्या नावाने व्हायरल दावा खोटा आहे. पीएम मोदी कधीही बागेश्वर धामला गेले नाहीत. व्हायरल व्हिडीओमध्ये पीएम मोदी आणि त्यांच्या जुन्या फोटोचा वापर करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री सध्या मीडियाच्या चर्चेत आहेत. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बागेश्वर धामला पोहोचल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टची सत्यता तपासली आणि हा दावा खोटा असल्याचे आढळले. पीएम मोदी कधीही बागेश्वर धामला गेले नाहीत. व्हायरल व्हिडिओमध्ये पीएम मोदींचे नाव आणि फोटो वापरून खोटेपणा पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे विश्वास न्यूज च्या तपासात समोर आले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर पंकज पंचाल ने 27 जानेवारी रोजी एक व्हिडिओ पोस्ट करून दावा केला, ‘बागेश्वर धाम गए थे मोदी जी।’
व्हायरल दावा खरा असल्याचे समजून बाकी यूजर्स देखील याला शेअर करत आहेत. या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूजने गुगल ओपन सर्च टूलद्वारे तपास सुरू केला. प्रथम व्हायरल व्हिडिओच्या आधारे कीवर्ड टाइप करून शोध घेण्यात आला. पीएम मोदींनी बागेश्वर धामला भेट दिल्याची पुष्टी करणारी एकही बातमी आम्हाला सापडली नाही. जर पीएम मोदी तिथे गेले असते तर ही बातमी नक्कीच मीडिया द्वारे कव्हर करण्यात आली असती.
व्हिडिओच्या थंबनेलमध्ये वापरण्यात आलेले पीएम मोदींचे छायाचित्र कुठले आहे हे आम्ही तपासात शोधून काढले. गुगल लेन्स आणि गुगल रिव्हर्स इमेज वापरून आम्ही नरेंद्र मोदींच्या अधिकृत YouTube चॅनेलवर पोहोचलो. येथे आठ वर्षांपूर्वी अपलोड केलेला एक व्हिडिओ सापडला. यामध्ये पीएम मोदींची हेअर स्टाइल, जॅकेट आणि हातात काळ्या दोरा बांधलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा मोदी 24 सप्टेंबर 2014 रोजी कर्नाटकातील तुमकूर येथील सिद्धगंगा मठात श्री शिवकुमार स्वामींना भेटायला गेले होते.
तपास पुढे नेत विश्वास न्यूजने धीरेंद्र शास्त्री यांचे सहकारी सुंदरलाल रायकर यांच्याशी संपर्क साधला. माहिती देताना त्यांनी सांगितले की, व्हायरल झालेला व्हिडिओ खोटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बागेश्वर धामवर आलेले नाहीत.
तपासाअंती बनावट पोस्ट टाकणाऱ्या युजरची चौकशी करण्यात आली. फेसबुक वापरकर्ता पंकज पांचाळ यांच्या खात्यावरून आम्हाला कोणतीही विशिष्ट माहिती मिळू शकली नाही.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने तपास केला आणि आढळले की बागेश्वर धाम येथे पीएम मोदींच्या नावाने व्हायरल दावा खोटा आहे. पीएम मोदी कधीही बागेश्वर धामला गेले नाहीत. व्हायरल व्हिडीओमध्ये पीएम मोदी आणि त्यांच्या जुन्या फोटोचा वापर करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923