Fact Check: पीएम मोदींनी एकनाथ शिंदेंना कॅमेऱ्यासाठी मागे हटवले नाही, अर्धी अपूर्ण क्लिप व्हायरल
विश्वास न्यूजच्या तपासणीत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हिडिओबाबत करण्यात आलेला दावा खोटा आणि अपप्रचार असल्याचे आढळून आले. व्हायरल व्हिडिओ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन उद्घाटन कार्यक्रमाची एक छोटी व्हिडिओ क्लिप आहे, जी पीएम मोदींविरोधात अपप्रचार पसरवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. संपूर्ण व्हिडीओचा एक भाग अशा प्रकारे उभा करण्यात आला आहे की, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागे ढकलत असल्याचे दिसून येत आहे, प्रत्यक्षात ते स्वत: मागे गेले होते.
- By: Pragya Shukla
- Published: Dec 16, 2022 at 02:53 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचा पाच सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहता, पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात धरून मागे खेचत असल्याचे दिसत आहे. पीएम मोदींनी एकनाथ शिंदे यांना कॅमेऱ्यासमोर येण्यास भाग पाडल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
विश्वास न्यूजने तपास केला असता हा दावा खोटा आणि अपप्रचार असल्याचे आढळून आले. व्हायरल व्हिडिओ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन उद्घाटन कार्यक्रमाची एक छोटी व्हिडिओ क्लिप आहे, जी पीएम मोदींविरोधात अपप्रचार पसरवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. संपूर्ण व्हिडीओचा एक भाग अशा प्रकारे उभा करण्यात आला आहे की, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागे ढकलत असल्याचे दिसून येत आहे, प्रत्यक्षात ते स्वत: मागे गेले होते.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर शशि प्रकाश सिंह ने वायरल व्हिडिओ शेअर करत लिहले, “ये फोटोजीवी ही आगे रहेगा घनघोर बेइज्जत….प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने एकनाथ शिंदें को बेईज्जत कर दिया।”
ह्या व्हिडिओ सारखाच दावा बाकी लोक करत आहे. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही संबंधित कीवर्डसह Google वर शोधण्यास सुरुवात केली. दरम्यान, आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओची मोठी आवृत्ती सापडली. हा व्हिडिओ 11 डिसेंबर 2022 रोजी शेअर करण्यात आला. आम्ही हा 6 मिनिटे 25 सेकंदांचा व्हिडिओ पूर्ण पाहिला. सीएम एकनाथ शिंदे संपूर्ण कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसोबत असल्याचे आम्हाला आढळले.
4 मिनिटे 46 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की पीएम मोदी प्रथम ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतात, नंतर ते लोकांना अभिवादन करण्यासाठी हात हलवतात. त्यानंतरच सीएम एकनाथ शिंदे मागे पडले, त्यानंतर लगेचच पीएम मोदी मागे वळून त्यांच्याशी हस्तांदोलन करतात.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक न्यूज चॅनेलच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेला हा व्हिडिओ आम्हाला आढळला.
नवभारत टाइम्सवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींनी 11 डिसेंबर रोजी नागपुरात देशातील 6व्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते. इतर अनेक वृत्त संकेतस्थळांनीही ही बातमी प्रसिद्ध केली.
अधिक माहितीसाठी आम्ही या कार्यक्रमाचे कव्हरेज करणारे नागपूरचे पत्रकार रजत देशमुख यांच्याशी संपर्क साधला. आम्ही त्याच्यासोबत व्हायरल दावा शेअर केला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.
तपासाअंती, विश्वास न्यूजने खोटा दावा शेअर करणार्या शशी प्रकाश सिंग या वापरकर्त्याच्या हँडलचे सोशल स्कॅनिंग केले. स्कॅनिंगवरून आम्हाला कळले की वापरकर्त्याचे 4,300 पेक्षा जास्त मित्र आहेत. प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, युजर फरीदाबादचा रहिवासी आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासणीत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हिडिओबाबत करण्यात आलेला दावा खोटा आणि अपप्रचार असल्याचे आढळून आले. व्हायरल व्हिडिओ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन उद्घाटन कार्यक्रमाची एक छोटी व्हिडिओ क्लिप आहे, जी पीएम मोदींविरोधात अपप्रचार पसरवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. संपूर्ण व्हिडीओचा एक भाग अशा प्रकारे उभा करण्यात आला आहे की, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागे ढकलत असल्याचे दिसून येत आहे, प्रत्यक्षात ते स्वत: मागे गेले होते.
- Claim Review : ये फोटोजीवी ही आगे रहेगा घनघोर बेइज्जत….प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने एकनाथ शिंदें को बेईज्जत कर दिया।
- Claimed By : फेसबुक यूजर शशि प्रकाश सिंह
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.