Fact Check: खुपवेळ मोबाईल फोनवर गेम खेळल्यामुळं डोळ्यामध्ये पॅरासाईट नावाचा किडा तयार होत नाही, व्हायरल पोस्ट खोटीआहे
व्हायरल पोस्ट ज्यात दिले आहे कि जास्ती मोबाईल फोन चा वापर केल्याने किंवा जास्ती खेळल्याने डोळ्यात पॅरासाईट ची निर्मिती होत नाही. व्हायरल पोस्ट खोटी आहे.
- By: Ankita Deshkar
- Published: Aug 6, 2021 at 07:21 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला मराठी मध्ये एक पोस्ट व्हायरल होताना दिसला. पोस्ट मध्ये असे सांगण्यात येत होते कि जर का मोबाइल फोन वर जास्ती वेळ गेम खेळले तर डोळ्यात पैरासाईट नावाचा किडा तयार होतो. या पोस्ट सोबत एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला होता.
विश्वास न्यूज च्या तपासात ह्या पोस्ट सोबत केलेला दावा खोटा असल्याचे कळले.
काय होत आहेत व्हायरल?
विश्वास न्यूज ला मराठी मध्ये एक पोस्ट खूप लोकं इंटरनेट वर विविध प्लॅटफॉर्म वर शेअर करत असल्याचे दिसले.
फेसबुक यूजर Ankita PatilShelke Aps ने एक ३० सेकंदाचा व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला आणि लिहले:
खुपवेळ मोबाईल फोनवर गेम खेळल्यामुळं डोळ्यामध्ये पैरासाईट नावाचा किडा तयार होतो, त्याला ऑपरेशन करून काढताना बघा?. कृपया हे सर्व ग्रुपवर पाठवा.
हे आपल्या मुलांना दाखवा त्यांना समजवा पुढे पाठवणाराला धन्यवाद.
हि पोस्ट आणि ह्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात हा व्हिडिओ इन्व्हिड (InVid) टूल मध्ये अपलोड करून शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला ह्या व्हिडिओ च्या काही किफ्रेम्स मिळाल्या. ह्या किफ्रेम्स वर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला. आम्हाला व्हायरल व्हिडिओ पेक्षा जास्ती लांब असलेले व्हिडिओ काही ठिकाणी मिळालेत.
आम्हाला एक ११ मिनिटांचा व्हिडिओ मिळाला. व्हायरल होत असलेला व्हिडिओ, ह्या indiavideodotorg युट्युब चॅनेल वरचा भाग होता. हा व्हिडिओ २० एप्रिल, २०१३ रोजी पोस्ट करण्यात आला होता.
यात दिलेल्या माहिती प्रमाणे, हि एक २० सेंटीमीटर लांबीची अळी आहे जी पहिल्यांदा व्हिडिओ वर रेकॉर्ड करण्यात आली आहे. ह्या व्हिडिओ मध्ये सर्जीकल पद्धतीचा वापर करून हि अळी कशी काढण्यात येते ते दर्शविले आहे. ह्या अळी ला लोआ लोआ असे म्हणतात.
हा व्हिडिओ खाली बघा.
त्यानंतर आम्ही इंटरनेट वर लोआ लोआ अळी बद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली, हे किवर्डस वापरताच आम्हाला, सीडीसी ची वेबसाईट दिसली. त्या वेबसाईट वर दिले होते: लोअसीस, ज्याला बहुतेक लोक आफ्रिकन नेत्र किडा म्हणतात, परजीवी अळी लोआ लोआमुळे होतो. हे क्रायसॉप्स वंशाच्या डियर माशांच्या वारंवार चावण्याद्वारे मानवांना होते. ह्या माश्या ज्यांच्यामुळे हा रोग होतो त्या पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या काही पर्जन्य जंगलांमध्ये सापडतात.
ह्या संपूर्ण आर्टिकल मध्ये कुठेच असे लिहले नव्हते कि मोबाइल फोन च्या अति वापरामुळे असा रोग हू शकतो.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने डॉ पूनम हरकुट (एमबीबीएस, सीपीएस, एफसीपीएस, एमएस ऑप्थअलमॉलॉजी), नागपूर यांना संपर्क केला. त्यांनी व्हायरल दावा खोटा असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या जास्ती मोबाईल फोन खेळल्याने किंवा त्याचा जास्ती वापर केल्याने डोळ्यांत अळ्यांची निर्मिती किंवा पेरासाईट होत नाही.
शेवटी आम्ही व्हायरल दावा शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला. Ankita PatilShelke Aps या ऑकलंड, न्यू झीलंड च्या रहिवासी आहेत, मुळात त्या कोल्हापूर च्या आहेत. त्यांना 10,335 लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: व्हायरल पोस्ट ज्यात दिले आहे कि जास्ती मोबाईल फोन चा वापर केल्याने किंवा जास्ती खेळल्याने डोळ्यात पॅरासाईट ची निर्मिती होत नाही. व्हायरल पोस्ट खोटी आहे.
- Claim Review : खुपवेळ मोबाईल फोनवर गेम खेळल्यामुळं डोळ्यामध्ये पैरासाईट नावाचा किडा तयार होतो
- Claimed By : Ankita PatilShelke Aps
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.