X
X

Fact Check: बामियान च्या बुद्धाच्या नावाने व्हायरल होत असलेले चित्र कान्हेरी लेणी, मुंबई चे आहे

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने बामियानच्या बुद्धाची पुनर्स्थापना केल्याची व्हायरल होत असलेली प्रतिमा मुंबई, महाराष्ट्रातील कान्हेरी लेण्यांमधील आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने एका वर्षात बामियानच्या बुद्धाची जीर्णोद्धार केल्याचा दावा विश्वास न्यूजवर व्हायरल झाला. इसवी सन सहाव्या शतकात मध्य अफगाणिस्तानच्या बामियान खोऱ्यात बामियान बुद्ध दगडी चट्टानातून कोरले गेले होते आणि 1,400 वर्षे सुमारे 180 फूट उंच उभे होते, 2001 मध्ये अमेरिकेच्या आक्रमणाच्या अगदी आधी, तालिबानने त्यांना जोरदार स्फोटकांनी उडवले होते. अफगाणिस्तान वर.
विश्वास न्यूजने आपल्या तपासणीत असे आढळले की पोस्टमधील बुद्धाचे व्हायरल चित्र हे अफगाणिस्तानमधील बाम्यान खोऱ्यातील नसून मुंबईतील कान्हेरी लेण्यांमधील आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर, MauIana Fayaz Uf kani ह्यांनी दोन चित्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले आणि लिहले: “Twitter user MauIana Fayaz Uf kani shared two pictures and wrote, “Taliban govt of Afghanistan has restored Buddha of Bamiyan withing one year. When is Narendra Modi govt going restore Babri Masjid ?

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने साध्या गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून तपासाची सुरुवात केली.
पहिले चित्र हे बामियानच्या बुद्धाचे होते.

आम्हाला अफगाणिस्तानच्या बामियान बुद्धांच्या इतिहासावर एक लेख सापडला. लेखात म्हटले आहे: दोन प्रचंड बामियान बुद्ध हे अफगाणिस्तानातील सर्वात महत्त्वाचे पुरातत्व स्थळ म्हणून हजार वर्षांहून अधिक काळ उभे राहिले. ते जगातील सर्वात मोठे उभे बुद्ध आकृती होते. त्यानंतर, 2001 च्या वसंत ऋतूमध्ये काही दिवसांत, तालिबानच्या सदस्यांनी बामियान खोऱ्यात चट्टानमध्ये कोरलेल्या बुद्ध प्रतिमा नष्ट केल्या.

संयुक्त राष्ट्रांनीही तालिबानच्या या विध्वंसावर भाष्य केले होते.

आम्हाला गेटी इमेजस च्या वेबसाईट वर देखील हे चित्र सापडले.

आम्ही त्यानंतर दुसरे चित्र, गूगल रिव्हर्स इमेज सारंच च्या मदतीने शोधले.

आम्हाला हे चित्र अश्या वेबसाईट वर सापडले ज्यात कान्हेरी लेणी आणि संजय गांधी नेशनल पार्क चे चित्र होते.

हे आर्टिकल एप्रिल १०, २०१५ रोजी पब्लिश करण्यात आले होते.

आम्हाला एक Sanjay Gandhi National Park चा विकिपीडिया पेज सापडला ज्यात हे चित्र वापरण्यात आले होते. असे लिहण्यात आले होते कि हा बुद्ध ७ मीटर उंच असून कान्हेरी लेणी च्या सुरुवातीला आहे.

आम्हाला shutterstock.com वर देखील हे चित्र सापडले.

आता हे स्पष्ट झाले होते कि दुसरे चित्र हे कान्हेरी लेणी, मुंबई चे आहे.

त्यानंतर आम्ही तपासले की, अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने बामियानच्या बुद्धाचा जीर्णोद्धार केला आहे का. आम्हाला असे कोणतेही मीडिया रिपोर्ट सापडले नाहीत.

त्यानंतर आम्ही लोकेशन टॅग वापरून कान्हेरी लेणी, मुंबई चे इंस्टाग्राम वर चित्र शोधले.
आम्हाला असे बरेच लोक सापडले ज्यांनी बुद्ध मूर्ती समोर चित्र काढले होते.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार, मयूर पारीख यांच्याशी संपर्क साधला, ते कान्हेरी लेण्यांना वारंवार भेट देतात. त्यांनी पुष्टी केली की ही प्रतिमा कान्हेरी लेणी, मुंबईतील आहे.

मुंबईतील आणखी एक व्हिज्युअल आर्ट्सचे विद्यार्थी, नागेश कानडे यांनीही व्हायरल झालेली प्रतिमा मुंबईतील कान्हेरी लेणी येथील असल्याची पुष्टी केली.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, विश्वास न्यूजने व्हायरल चित्र पोस्ट करणाऱ्या ट्विटर वापरकर्त्याची सामाजिक पार्श्वभूमी तपासली.

आम्हाला कळले की मौलाना फयाज उफ कानी नोव्हेंबर 2020 मध्ये ट्विटरवर सामील झाले आणि त्यांना 5,022 लोक फॉलो करतात, तर ते कोणालाही फॉलो करत नाहीत.

निष्कर्ष: अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने बामियानच्या बुद्धाची पुनर्स्थापना केल्याची व्हायरल होत असलेली प्रतिमा मुंबई, महाराष्ट्रातील कान्हेरी लेण्यांमधील आहे.

  • Claim Review : अफगाणिस्तान ची बुद्ध मूर्ती
  • Claimed By : MauIana Fayaz Uf kani
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later