विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे सिद्ध झाले आहे. व्हायरल झालेले चित्र उत्तरांचल विद्यापीठात आयोजित दीक्षांत समारंभातील 2020 चे आहे. दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांनी भगव्यासह विविध रंगांचे स्कार्फही परिधान केले होते. व्हायरल झालेल्या छायाचित्राचा कर्नाटकच्या हिजाब वादाशी काहीही संबंध नाही.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक पेहरावावरून विद्यार्थ्यांचे गट समोरासमोर आले आहेत. हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब बंदी विरोधात आंदोलन करत आहेत, तर भगवा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांचा एक गट शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक कपडे परिधान करण्यास विरोध करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रात भगवा स्कार्फ घातलेल्या काही मुली सेल्फी घेताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना दावा केला जात आहे की, हा फोटो कर्नाटकातील एका कॉलेजचा आहे. जिथे भगवे परिधान केलेल्या मुलांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक कपडे घालण्यास विरोध केला आहे.
विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे सिद्ध झाले आहे. व्हायरल झालेले चित्र उत्तरांचल विद्यापीठात आयोजित दीक्षांत समारंभातील 2020 चे आहे. दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांनी भगव्यासह विविध रंगांचे स्कार्फही परिधान केले होते. व्हायरल झालेल्या छायाचित्राचा कर्नाटकच्या हिजाब वादाशी काहीही संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Rahul Tyagi Ji ने व्हायरल चित्र शेअर केले आणि लिहले: कर्नाटक के बच्चों को देखकर अब लगता है कि नई पौध सनातन रक्षा के लिए हमसे ज्यादा सशक्त है, हमसे ज्यादा सचेत है, हमारी भूमिका केवल इतनी ही है कि हम धर्म रक्षा के लिए बच्चों को रोके नही बल्कि प्रेरित करें। हम लाएं हैं तूफान से कश्ती निकाल के इस देश को रखना मेरे बच्चों सम्भाल के। अब बच्चे देश सम्भालने के योग्य हो चुके हैं। जय श्री राम जय जय सनातन धर्म।
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. फेसबुक यूजर Deepak Shrivastava ने देखील ह्या दाव्यासह पोस्ट शेअर केली, तसेच ट्विटर वर देखील पोस्ट व्हायरल होत आहे.
तपास:
व्हायरल फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेजच्या माध्यमातून फोटोचा तपास केला. या दरम्यान आम्हाला 29 फेब्रुवारी 2020 रोजी उत्तरांचल विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला ब्लॉग आढळला. या ब्लॉगमध्ये उत्तरांचल विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाचा अहवाल देण्यात आला आहे. हा कार्यक्रम गेल्या वर्षी 29 फेब्रुवारी रोजी उत्तरांचल विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सर्व छायाचित्रे या ब्लॉग पोस्टमध्ये दिली आहेत. त्यात भगव्याशिवाय इतर रंगांचे उपरणे घातलेले दिसतात.
अधिक माहितीसाठी आम्ही देहरादून च्या दैनिक जागरणचे उपवृत्त संपादक देवेंद्र सती यांच्या मदतीने उत्तरांचल विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. राजेश बहुगुणा यांच्याशी संपर्क साधला. व्हायरल झालेला फोटो आम्ही त्यांना व्हाट्सअँप वर पाठवला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. दोन वर्षांपूर्वी उत्तरांचल विद्यापीठात झालेल्या दीक्षांत समारंभात हे छायाचित्र काढण्यात आले होते. जे लोक आता खोटे दावे करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
तपासाअंती, आम्ही दावा शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्या Rahul Tyagi Ji ह्यांच्या प्रोफाइल चे स्कॅनिंग केले. स्कॅनिंगवरून आम्हाला कळले की फेसबुक वापरकर्ता एका विचारसरणीने प्रभावित आहे. युजर हा उत्तराखंडमधील ज्वालापूर शहरातील रहिवासी आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे सिद्ध झाले आहे. व्हायरल झालेले चित्र उत्तरांचल विद्यापीठात आयोजित दीक्षांत समारंभातील 2020 चे आहे. दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांनी भगव्यासह विविध रंगांचे स्कार्फही परिधान केले होते. व्हायरल झालेल्या छायाचित्राचा कर्नाटकच्या हिजाब वादाशी काहीही संबंध नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923