Fact-check: उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत व्हिडिओ कॉल चे छायाचित्र एडिट करून व्हायरल केले जात आहे

आमच्या तपासात आम्हाला कळले कि हे छायाचित्र बरोबर नाही. खऱ्या छायाचित्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राच्या जागी त्या टीव्ही चॅनेल चे छायाचित्र लावण्यात आले आहे. खरे छायाचित्र तेव्हाचे आहे जेव्हा, उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत संवाद साधला होता.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टीव्ही वर एक न्यूज चॅनेल बघत असल्याचे दिसतात. छायाचित्रात टीव्ही वर रिपब्लिक चॅनेल सुरु असल्याचे दिसते. या पोस्ट च्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहले आहे, “किस किस को 500 रुपये में खरीद लिया अर्णव ने।” (अर्थात: कोणाकोणाला ५०० रुपयात विकत घेतले अर्णव ने). विश्वास न्यूज च्या तपासात असे समोर आले कि हे छायाचित्र बरोबर नाही. खऱ्या छायाचित्राला एडिट करून नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राच्या जागी टीव्ही चॅनेल चे छायाचित्र एडिट करून जोडले गेले आहे. हे छायाचित्र तेव्हाचे आहे जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला होता.

काय होत आहे व्हायरल?
व्हायरल होत असलेल्या पोस्ट मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टीव्ही वर एक न्यूज चॅनेल बघताना दिसतात. छायाचित्रात टीव्ही वर रिपब्लिक टीव्ही न्यूज चॅनेल सुरु असल्याचे दिसते. या पोस्ट सोबत डिस्क्रिप्शन मध्ये लिहले आहे: कोणाकोणाला ५०० रुपयात अर्णव ने विकत घेतले आहे.

या पोस्ट ची अर्काइव्ह लिंक इथे बघा.

तपास:
आम्ही आमचा तपास सुरु केला तेव्हा सगळ्यात आधी या छायाचित्राला गूगल रिवर्स इमेज मध्ये सर्च केले. या सर्च मध्ये आम्हाला outlookindia.com च्या गॅलरी मध्ये हे छायाचित्र सापडले. खऱ्या छायाचित्रात आम्हाला उद्धव ठाकरे हे टीव्ही समोर बसून नरेंद्र मोदी यांना बघत असल्याचे दिसले. या छायाचित्रासोबत खालील मजकूर दिला होता:
Prime Minister Narendra Modi interacts with Maharashtra CM Uddhav Balasaheb Thackeray via video conference on COVID-19 preparedness, during the nationwide lockdown to curb the spread of coronavirus.
याचा मराठी अनुवाद आहे:
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे पंतप्रधान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे COVID-19 च्या तयारी बद्दल चर्चा करताना.

हेच छायाचित्र आम्हाला indiatoday.in च्या एका बातमीत देखील मिळाले. २७ एप्रिल २०२० रोजी प्रकाशित या बातमीत हे छायाचित्र वापरल्याचे आपण बघू शकतो, ज्यात उद्धव ठाकरे टीव्ही समोर बसून नरेंद्र मोदी यांना बघत आहे. या छायाचित्रासोबत खालील मजकूर लिहला होता: Prime Minister Narendra Modi interacts with Maharashtra CM Uddhav Thackeray via video conference on Covid-19 preparedness, during the nationwide lockdown to curb the spread of coronavirus. (PTI Photo)
अर्थात: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे Covid-19 च्या तयारी बाबत चर्चा करताना. (पीटीआई फोटो)

या छायाचित्रावरून आम्ही शिव सेना च्या नेता नीलम गोढ़े यांच्यासोबत संवाद साधला, त्यांनी सांगितले कि हे व्हायरल छायाचित्र फोटोशॉप्ड आहे.

या छायाचित्राला Baba Satyanarayan Mourya नावाच्या एका यूजर ने शेअर केले आहे. त्यांच्या प्रोफाइल प्रमाणे, यूजर महाराष्ट्राचे रहिवासी आहे.

निष्कर्ष: आमच्या तपासात आम्हाला कळले कि हे छायाचित्र बरोबर नाही. खऱ्या छायाचित्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राच्या जागी त्या टीव्ही चॅनेल चे छायाचित्र लावण्यात आले आहे. खरे छायाचित्र तेव्हाचे आहे जेव्हा, उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत संवाद साधला होता.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट