बंधन बँकेत नोकरीचा दावा करणारी व्हायरल पोस्ट बनावट आहे. त्यात एक फिशिंग लिंक देण्यात आली आहे, ज्यावर क्लिक केल्यास यूजरचा डेटा हॅक होऊ शकतो. बँकेच्या संपर्क प्रमुखांनीही हे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): बंधन बँकेत नोकरीच्या नावाखाली सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यातच बंधन बँकेत परीक्षा न घेता थेट भरती होणार असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये 5500 स्त्री-पुरुष अर्ज करू शकतात. तंत्रज्ञ, अभियंता, लिपिक, सहाय्यक आणि पर्यवेक्षक या पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्जासाठी पोस्टमध्ये लिंक दिली आहे. वापरकर्त्यांना या लिंकवर क्लिक करून अर्ज करण्यास सांगितले आहे.
विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले. बंधन बँकेने अशी कोणतीही नौकरी भरती सुरु नाही. पोस्टसोबत फिशिंग लिंक दिली आहे. बँकेच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन हेडनेही ते टाळण्याचा सल्ला दिला आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Bharti Koli (आर्काइव्ह लिंक) ने 30 जानेवारी रोजी एक ग्राफिक शेअर करून लिहले,
Bandhan Bank Recruitment 2023
Qualification : – 12th / Graduation Pass
Salary : – 26,000 / –
Fill the form from here => https://bit.ly/3ClUz84
पदांची नावे, वेतन आणि पात्रता ग्राफिक्समध्ये दिलेली आहे. सोबत परीक्षा न घेता थेट भरती होईल, असे लिहिले आहे. 5500 स्त्री-पुरुषांना ही संधी मिळणार आहे.
फेसबुक यूजर Sheetal Malviya (आर्काइव्ह लिंक) ने 23 जानेवारी रोजी अशीच पोस्ट शेअर केली होती.
तपास:
व्हायरल दाव्याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही प्रथम पोस्ट काळजीपूर्वक पाहिली. त्यात दिलेली लिंक छोटी URL आहे. यामुळे आम्हाला याबद्दल शंका आली, कारण जर कोणतीही बँक किंवा मोठी संस्था भरती करते तर त्यांच्या अधिकृत वेबसाइटची लिंक दिली जाते आणि अशी छोटी URL नाही.
याबाबत अधिक माहितीसाठी आम्ही बंधन बँकेच्या वेबसाइटवर शोध घेतला. यामध्ये करिअर विभागात अगदी सुरुवातीला एक विंडो उघडते. त्यावर लिहिले आहे की, काही व्यक्ती/एजन्सी बोगस रोजगार ऑफरसह बंधन बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांशी संपर्क साधत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. या व्यक्ती/एजन्सी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी वैयक्तिक माहिती किंवा पैसे मागू शकतात. तथापि, आम्हाला वेबसाइटवर अशा कोणत्याही भरतीबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
25 ऑगस्ट 2022 रोजी बंधन बँकेच्या सत्यापित फेसबुक पेजवर एक व्हिडिओ (आर्काइव्ह लिंक) पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये बनावट भरतीच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आम्हाला फेसबुक पेजवर व्हायरल रिक्रूटमेंटशी संबंधित कोणतीही पोस्ट आढळली नाही. बँकेच्या ट्विटर खात्यावरही अशी कोणतीही भरती माहिती ट्विट केलेली नाही.
अधिक पुष्टीकरणासाठी, आम्ही बंधन बँकेचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स हेड रितेश मेहता यांच्याशी मेलद्वारे संपर्क साधला आणि त्यांना व्हायरल पोस्टची लिंक पाठवली. ते म्हणतात, ‘या भरती आमच्या बँकेच्या नाहीत. नोकरी शोधणाऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने हे पोस्ट करण्यात आले आहेत.
यासंदर्भात सायबर तज्ज्ञ अतुल अग्रवाल म्हणाले, ‘हे फिशिंग लिक आहेत. यावर क्लिक करून युजरचा डेटा हॅक केला जाऊ शकतो. त्यावर क्लिक करू नये.
आम्ही फेक पोस्ट करणाऱ्या भारती कोळी या फेसबुक युजरचे प्रोफाईल स्कॅन केले. त्यानुसार, यूजर भोपाळच्या रहिवासी आहेत. त्याचे जवळपास 1100 मित्र आहेत.
निष्कर्ष: बंधन बँकेत नोकरीचा दावा करणारी व्हायरल पोस्ट बनावट आहे. त्यात एक फिशिंग लिंक देण्यात आली आहे, ज्यावर क्लिक केल्यास यूजरचा डेटा हॅक होऊ शकतो. बँकेच्या संपर्क प्रमुखांनीही हे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923