X
X

Fact Check: व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत असलेली व्यक्ती जगातील सगळ्यात लांब व्यक्ती नाही

विश्वास न्यूजने आपल्या तपासणीत असे आढळले की चित्रातील माणूस जगातील सर्वात उंच माणूस नाही. सध्या जगातील सर्वात उंच व्यक्ती पाकिस्तानी नसून तुर्की आहे.

  • By: Pallavi Mishra
  • Published: Oct 31, 2022 at 01:12 PM
  • Updated: Oct 31, 2022 at 01:14 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका उंच माणसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हा पाकिस्तानी माणूस जगातील सर्वात उंच व्यक्ती असल्याचा दावा केला जात आहे. हा दावा खोटा असल्याचे विश्वास न्यूजला आढळले. चित्रातील माणूस जगातील सर्वात उंच माणूस नाही. सध्या जगातील सर्वात उंच व्यक्ती पाकिस्तानी नसून तुर्की आहे.

काय होत आहे व्हायरल?
एका उंच व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वर्णनात असे लिहिले आहे की, “जगातील सर्वात उंच व्यक्ती हा पाकिस्तानचा मुस्लिम बांधव आहे.”

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

व्हिडिओ नीट पाहिल्यावर अनेक ठिकाणी व्हिडिओमध्ये व्यक्तीची लांबी वर-खाली होताना दिसते. बर्‍याच ठिकाणी ही व्यक्ती साधारण उंचीची तर अनेक ठिकाणी बऱ्यापैकी उंच दिसते. हा व्हिडीओ एडिट करण्यात आला असून या व्यक्तीला एडिटिंग टूल्सच्या मदतीने खेचण्यात आल्याचे समजते.

पोस्ट एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही कीवर्डसह शोधले. आम्हाला guinnessworldrecords.com वर सर्वात उंच माणसाबद्दल एक लेख सापडला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, 251 सेमी (8 फूट 2.8 इंच) उंचीचे तुर्कीचे सुलतान कोसेन हे जगातील सर्वात उंच व्यक्ती आहेत.

सुलतान कोसेनचा फोटो आणि व्हायरल झालेल्या व्हिडीओतील व्यक्तीच्या छायाचित्रात काहीही साम्य नाही.

त्यानंतर आम्ही गेल्या 100 वर्षांतील सर्वात उंच लोकांसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलो. या यादीत पाकिस्तानच्या आलम चन्ना यांचे नाव होते, ज्यांना 1981 मध्ये जगातील सर्वात उंच व्यक्तीचा किताब मिळाला होता. 1998 मध्ये त्यांचे निधन झाले. आलम चन्ना यांच्याबद्दल अधिक माहिती dawn.com1215250 च्या या बातमीत वाचता येईल.

याबाबत आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड लि.च्या पीआर एक्झिक्युटिव्ह अलिना पोलिंस्काया यांनी आमच्या मेलला उत्तर दिले की “जगातील सर्वात उंच जिवंत व्यक्ती तुर्कीचा सुलतान कोसेन आहे (, b.10 डिसेंबर 1982), ज्यांची उंची 8 फेब्रुवारी 2011 रोजी अंकारा, तुर्की येथे 251 सेमी होती. (8 फूट 2.8 इंच) मोजले होते.”

ही पोस्ट ‘নানু দেওয়ান‎’ नावाच्या युजरने फेसबुकवर शेअर केली होती. वापरकर्ता बांगलादेशचा रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने आपल्या तपासणीत असे आढळले की चित्रातील माणूस जगातील सर्वात उंच माणूस नाही. सध्या जगातील सर्वात उंच व्यक्ती पाकिस्तानी नसून तुर्की आहे.

  • Claim Review : दुनिया का सबसे लंबा आदमी पाकिस्तान का एक मुस्लिम भाई है
  • Claimed By : Facebook user ভালবাসার রাজাপুর ও কাউখালী
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later