Fact Check: व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत असलेली व्यक्ती ऋषी सुनक नसून, पूर्व क्रिकेटर आशिष नेहरा आहे

विश्वास न्यूजला त्याच्या तपासणीत व्हायरल दावा दिशाभूल करणारा आढळला. व्हायरल व्हिडिओमध्ये डान्स करताना दिसणारा माणूस ऋषी सुनक नसून माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधानपद भूषवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक टाळ्या वाजवताना आणि एक व्यक्ती नाचताना दिसत आहे. ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर नाचत असल्याचा व्हिडीओ शेअर करून समोर येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये Sony Ten 3 चा लोगो आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हायरल दावा खोटा निघाला. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती ऋषी सुनक नसून माजी क्रिकेटर आशिष नेहरा आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Maha Vinash Aghadi ने व्हायरल व्हिडिओ शेअर करून इंग्लिश मध्ये लिहले, “ #RishiSunak dances after becoming Prime Minister of United Kingdom.”
सोशल मीडिया वर अन्य यूजर्स देखील हा दावा शेअर करत आहेत. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, आम्ही प्रथम व्हिडिओमधील काही कीफ्रेम काढल्या आणि त्यांना गूगल रिव्हर्स इमेजने शोधले. यादरम्यान स्पोर्ट्सकीडा या स्पोर्ट्स वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीत आम्हाला हा व्हिडिओ सापडला. 7 ऑगस्ट 2021 रोजी प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताच सुनील गावस्कर आणि आशिष नेहरा आनंदाने नाचू लागले. बातमी इथे वाचता येईल.

8 ऑगस्ट 2021 रोजी व्हायरल झालेल्या व्हिडिओशी संबंधित बातम्या insidesport.in या वेबसाइटवर देखील वाचता येतील. बातम्यांनुसार, व्हिडिओमध्ये ऋषी सुनक नाही तर माजी क्रिकेटर आशिष नेहरा आहे.

व्हायरल व्हिडिओ 7 ऑगस्ट 2021 रोजी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर शेअर केला होता. यामध्ये गावस्कर आणि आशिष नेहरा आपल्या सहकाऱ्यांसोबत नीरजच्या सामन्याचा आनंद घेत आहेत.

https://twitter.com/SonySportsNetwk/status/1424009729714524162?s=20&t=I14x8AG6oR6Uj0XMcjECCA

याशी संबंधित इतर बातम्या येथे वाचता येतील. अधिक माहितीसाठी क्रीडा पत्रकार विप्लव कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ जुना आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती क्रिकेटर आशिष नेहरा आहे, ऋषी सुनक नाही.

तपासाअंती, आम्ही खोट्या दाव्यासह व्हिडिओ सामायिक करणारे पृष्ठ तपासले. 10.6K लोक या पेजला फॉलो करतात आणि हे पेज सप्टेंबर 2020 रोजी तयार करण्यात आले असल्याचे तपासात समोर आले आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजला त्याच्या तपासणीत व्हायरल दावा दिशाभूल करणारा आढळला. व्हायरल व्हिडिओमध्ये डान्स करताना दिसणारा माणूस ऋषी सुनक नसून माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट