विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे आढळले. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती हिंदू खासदार नाही. तारिक मसिह गिल असे त्याचे नाव आहे. ते पंजाब प्रांतीय असेंब्लीचे सदस्य आहेत. गिल हा ख्रिश्चन आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक नेता पाकिस्तानात होत असलेल्या धर्मांतरावर बोलताना दिसतो. सोशल मीडियावर काही युजर्स दावा करत आहेत की व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती पाकिस्तानमधील हिंदू खासदार आहे. विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टचा तपास केला. हा दावा दिशाभूल करणारा ठरला. व्हिडिओमध्ये हिंदू खासदार नाही. तारिक मसिह गिल हे पंजाब विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांनी हे भाषण ऑगस्ट 2022 मध्ये दिले होते.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर सत्य मोहन गुप्ता ने 16 नव्हेंबर रोजी एक वीडियो अपलोड करून दावा केला: ‘गाँधीजी का पाप सह रहे हैं पाकिस्तान के अल्पसंख्यक…देखें कैसे एक हिंदू सांसद हाथ जोड़ के पाक संसद में दया की भीख माँग रहा है… कि हमपे रहम करो हमारी बेटियों को बख़्श दो…ये वीडिओ उन धर्मनिरपेक्ष लोगों को समर्पित है जो हमें धर्म पर ज्ञान देते हैं।’
पोस्ट ला खरे समजून इतर यूजर्स देखील शेअर करत आहेत. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूजने प्रथम पाकिस्तानच्या आज टीव्हीचे पत्रकार आदिल अली ह्यांना संपर्क साधून तपास सुरू केला. व्हायरल झालेला व्हिडिओ त्याच्यासोबत शेअर केला. माहिती देताना त्यांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती हिंदू खासदार नाही. तारिक मसिह गिल असे त्याचे नाव आहे. ते ख्रिश्चन आहेत. ते पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेत पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे सदस्य आहेत. 11 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी हे भाषण दिले होते.
तपास पुढे नेत त्यांनी मूळ व्हिडिओचा शोध सुरू केला. संबंधित कीवर्डसह शोधल्यावर, आम्हाला 11 ऑगस्ट 2022 रोजी अपलोड केलेला मूळ व्हिडिओ आढळला. पीटीव्ही संसदेच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले की हा क्वामी विधानसभेच्या अधिवेशनाशी संबंधित व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये स्पीकर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला तारिक मसिह गिल या नावाने हाक मारताना दिसत आहे. तारिक मसिह गिल पाकिस्तानमध्ये मुलीला जबरदस्तीने इस्लाम धर्मात आणल्याचा मुद्दा उपस्थित करत होते. व्हिडिओमध्ये तारिक मसिह गिल 37 मिनिटांनंतर बोलताना दिसत आहेत.
तपासाअंती दिशाभूल करणारी पोस्ट टाकणाऱ्या युजरची चौकशी करण्यात आली. फेसबुक यूजर सत्य मोहन गुप्ता यांचे दोन हजारांहून अधिक मित्र आहेत. मेरठचे हे युजर सध्या रायपूरमध्ये राहतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे आढळले. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती हिंदू खासदार नाही. तारिक मसिह गिल असे त्याचे नाव आहे. ते पंजाब प्रांतीय असेंब्लीचे सदस्य आहेत. गिल हा ख्रिश्चन आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923