X
X

Fact-check: चीन च्या पुराचे जुने छायाचित्र आत्ताचे सांगून व्हायरल

चीन च्या आत्ताचे पुराचे छायाचित्र असल्याचा दावा करत व्हायरल होत असलेले छायाचित्र, २०२० मधील आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): चीन मधल्या महापुरामध्ये आतापर्यंत ५६ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि जवळपास १० बिलियन डॉलर चे नुकसान देखील झाले आहे. या सगळ्यात पुराचे एक छायाचित्र विविध प्लॅटफॉर्म वर व्हायरल होताना दिसत आहे. ह्या छायाचित्रात पुराचा ऐरिअल व्यू म्हणजेच वरून घेतलेले छायाचित्र आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हे छायाचित्र जुने असल्याचे समोर आले.  

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर M Jala Tidjany Diala यांनी काही छायाचित्रांसोबत व्हायरल छायाचित्र शेअर केले आणि लिहले:
China: Floods, several deaths
Deaths in Zhengzhou metro, nearly 200,000 evacuated
The flooding in central China’s Henan Province has been called “extremely serious” by Chinese President Xi Jinping.
With scenes of chaos Tuesday, July 20 in the city of Zhengzhou, which saw the equivalent of a year of rain fall in three days. A provincial capital where the army was called in to reinforce it.

अर्थात: हे दृश्य चीन मढी वास्तव्य दाखवतात, जवळपास २ लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे आणि चीन च्या राष्ट्रपतींनी देखील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले आहे. लोकांच्या मदतकार्यासाठी सैन्य देखील बोलावण्यात आले.

हि पोस्ट आणि याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने या चित्राचा तपास के साध्या गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून केली. विश्वास न्यूज ला हे छायाचित्र बऱ्याच पेजेस वर मिळाले.

आम्हाला व्हायरल छायाचित्र, jagran.com च्या वेबसाईट वर मिळाले. हे चित्र १४ जुलै २०२० रोजी या वेबसाईट वर पब्लिश करण्यात आले होते.

या पोस्ट ची लिंक इथे बघा.

आम्हाला हेच छायाचित्र अल-जझीरा च्या वेबसाईट वर एका आर्टिकल मध्ये अपलोड केलेले देखील दिसले. हे आर्टिकल १४ जुलै २०२० रोजी अपलोड करण्यात आलेले होते. व्हायरल छायाचित्र या आर्टिकल मध्ये देखील होते.
ह्या छायाचित्राच्या कॅप्शन मध्ये लिहले होते: Submerged streets and inundated buildings after a dam was breached due to flooding in Jiujiang in China’s central Jiangxi province. [AFP]

यातून कळले कि हे छायाचित्र एएफपी ह्या न्यूज एजेन्सी चे आहे आणि २०२० साली पब्लिश करण्यात आले होते.

आम्हाला हे छायाचित्र गेटी इमेजस च्या वेबसाईट वर देखील मिळाले. कॅप्शन मध्ये लिहले होते:
This aerial view shows submerged streets and inundated buildings after a dam was breached due to flooding in Jiujiang in China’s central Jiangxi province on July 13, 2020. – Floods across central and eastern China have left more than 140 people dead or missing and are swelling major rivers and lakes to record-high levels, with authorities warning that the worst was yet to come. (Photo by STR / AFP) / China OUT (Photo by STR/AFP via Getty Images)

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने एएफपी ला इमेल द्वारे संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हे छायाचित्र एएफपी च्या आर्काइव्ह मधले आहे.

व्हायरल छायाचित्र पोस्ट करणाऱ्या यूजर चा सोशल बॅकग्राऊंड चेक केल्यावर कळले कि यूजर बांजूल, गामिबिया चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: चीन च्या आत्ताचे पुराचे छायाचित्र असल्याचा दावा करत व्हायरल होत असलेले छायाचित्र, २०२० मधील आहे.

  • Claim Review : चीन चे पुराचे छायाचित्र
  • Claimed By : M Jala Tidjany Diala
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later