Fact Check: विजय रूपांनी यांचा 2017 चा व्हिडिओ आता होत आहे व्हायरल, फेसबुक पोस्ट दिशाभूल करणारी आहे
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट झाले.
- By: Ashish Maharishi
- Published: Sep 21, 2021 at 03:51 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): गुजरात मध्ये विजय रूपाणी ह्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे. ह्यात ते आपल्या गाडीवरचा लाल दिवा काढताना दिसतात. यूजर्स दावा करत आहेत कि, गुजरात च्या पूर्व मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच हातानी आपल्या कारचा लाल दिवा काढला. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समजले. हा व्हिडिओ 2017 मध्ये मुख्यमंत्री असून सुद्धा त्यांनी आपल्या गाडीचा दिवा काढला त्याचे आहे. त्यावेळचा व्हिडिओ काही लोकं आता व्हायरल करत आहेत.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर चंद्राकार संजू ने 13 सप्टेंबर रोजी विजय रूपांनी ह्यांचा व्हिडिओ अपलोड केला आणि लिहले: गुजरात के पूर्व मुख्यमंत्री विजय रूपाणी जी अपने कार से खुद लाल बत्ती निकाल दिये। ऐसे दृश्य लोकतंत्र को महान बनाते हैं।
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता. बाकी यूजर्स देखील हा व्हिडिओ खरे समजून ह्याला शेअर करत आहेत.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास सगळ्यात आधी गूगल सर्च पासून केला. गूगल मध्ये संबंधित किवर्ड टाईप करून आम्हाला बऱ्याच अश्या बातम्या मिळाल्या, ज्यात सांगितले गेले होते कि विजय रूपांनी ह्यांनी पंतप्रधान मोदी ह्यांच्या निर्णयाचे स्वागत करून स्वतः आपल्या गाडीचा लाल दिवा काढला. हि बातमी आम्हाला जागरण डॉट कॉम च्या वेबसाईट वर देखील मिळाली. 20 एप्रिल 2017 रोजी पब्लिश झालेली पूर्ण बातमी इथे वाचा.
तपासाच्या वेळी आम्हाला हा व्हिडिओ विजय रूपांनी ह्यांच्या ट्विटर हॅन्डल वर देखील मिळाला. हा व्हिडिओ 20 एप्रिल 2017 रोजी अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ तुम्ही खाली बघू शकता.
आम्हाला हा व्हिडिओ देश गुजरात नावाच्या एका युट्युब चॅनेल वर देखील मिळाला, जो 20 एप्रिल 2017 रोजी अपलोड करण्यात आला होता. ह्यात विजय रूपांनी आपल्या गाडीवरचा लाल दिवा काढताना स्पष्ट दिसत आहेत.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने दैनिक जागरण, गुजरात चे वरिष्ठ संवाददाता शत्रुघ्न शर्मा ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि विजय रूपांनी ह्यांचा व्हायरल व्हिडिओ जवळपास चार वर्ष जुना आहे. त्यांनी मुख्यमंत्री असतानाच स्वतःच्या गाडीवरील लाल दिवा काढला होता. व्हिडिओ चा सध्याच्या स्तिथी सोबत काही संबंध नाही.
विजय रूपांनी ह्यांचा व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूजर चा आम्ही तपास केला. त्यात आम्हाला कळले कि फेसबुक यूजर चंद्राकार संजू एका विशिष्ट विचारधारेपासून प्रभावित आहेत. त्यांना फेसबुक वर 2825 लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट झाले.
- Claim Review : विजय रूपांनी ह्यांनी गाडी वरचा लाल दिवा काढला
- Claimed By : फेसबुक यूजर चंद्राकार संजू
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.