Fact Check: तेलंगणात भाजप-टीआरएस कार्यकर्त्यांमधील भांडणाचा जुना व्हिडिओ गुजरातचा अलीकडचा सांगून व्हायरल

गुजरातमधील राजकीय कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा व्हायरल व्हिडिओ तेलंगणातील जनगाव शहरातील जुना व्हिडिओ आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक व्हिडिओ विश्वास न्यूजच्या समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दोन राजकीय गटांमध्ये हाणामारी होताना दिसत आहे. सोशल मीडिया यूजर्स दावा करत आहेत की हा व्हिडिओ गुजरातचा आहे आणि तो अलीकडचा आहे.
विश्वास न्यूजला मात्र तपासात असे आढळून आले की हा व्हिडिओ तेलंगणातील भाजप आणि टीआरएस कार्यकर्त्यांमधील संघर्षाचा जुना व्हिडिओ आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Dharmendra Vavliya ने त्यांच्या प्रोफाइलवर एक व्हिडिओ शेअर केला आणि गुजरातीमध्ये लिहिले: પહેલા બીજા રાજ્યોમાં ભાજપ વાળા ને મેથીપાક ચખાડવાની પ્રથા હતી તે હવે ગુજરાતમાં પણ ચાલુ થઈ ગઈ છે. @AAPGujarat @AAP4Surat @AAPAmdavad

भाषांतर: पूर्वी भाजप सदस्यांना मेथीची चव द्यायची पद्धत इतर राज्यांमध्ये होती, आता गुजरातमध्येही ती सुरू झाली आहे. @AAPGujarat @AAP4Surat @AAPAmdavad

पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टवरील कमेंट्स सगळ्यात पहिले बघण्यापासून तपास सुरु केला.

अनेक युजर्सनी हा व्हिडिओ गुजरातचा नसल्याची प्रतिक्रिया दिली होती.

विश्वास न्यूजने नंतर इनव्हिड टूलमध्ये व्हिडिओ अपलोड केला आणि स्क्रीनग्रेब काढले.

आम्ही काही स्क्रीनग्राबमध्ये झूम केले आणि काही गोष्टींचे निरीक्षण केले. दुकानांवरील फलक दक्षिण भारतीय भाषेत होते आणि पोलिस थांब्यावर व्हिडिओमध्ये ‘जनगाव वाहतूक पोलिस‘ हे स्पष्टपणे वाचता येत होते.

व्हिडिओमधील गुलाबी रंगाचे झेंडे घेतलेले लोक तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) कार्यकर्ते असल्याचे सूचित करतात. त्यामुळे हा व्हिडिओ तेलंगणातील असल्याचे स्पष्ट झाले.

योग्य कीवर्ड वापरून शोधल्यानंतर, आम्हाला 10 फेब्रुवारी 2022 रोजी OneIndia News वर अपलोड केलेला YouTube व्हिडिओ सापडला. वर्णनात म्हटले आहे की, “तेलंगणा राज्यात TRS आणि BJP यांच्यात मोदीविरोधी आंदोलन पुकारल्यानंतर संघर्ष झाला.

हा यूट्यूब व्हिडिओ व्हायरल व्हिडिओसारखाच होता.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात, विश्वास न्यूजने तेलंगणा कव्हर करणार्‍या पत्रकार राहुल देवुलपल्लीशी संपर्क साधला. त्यांनी पुष्टी केली की व्हायरल व्हिडिओ जुना असून तो तेलंगणातील जानगाव शहरातील आहे.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूजने व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या सोशल मीडिया यूजर चा सोशल बॅकग्राउंड चेक केला. धर्मेंद्र वावलिया हे गुजरातमधील सुरत येथील असून एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे आम्हाला आढळून आले. ते जानेवारी २०२१ मध्ये ट्विटरवर सक्रिय झाले.

निष्कर्ष: गुजरातमधील राजकीय कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा व्हायरल व्हिडिओ तेलंगणातील जनगाव शहरातील जुना व्हिडिओ आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट