Fact Check: सुनिधी चौहान चा आठ महिने जुना व्हिडिओ ‘भारत जोडो’ च्या नावाने व्हायरल

विश्वास न्यूजच्या तपासात ‘भारत जोडो’ यात्रेच्या नावाने व्हायरल होत असलेला सुनिधी चौहानचा व्हिडिओ आठ महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा जयपूरमधील कॉन्सर्टशी काहीही संबंध नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सुरूच आहे. सोबतच यासंदर्भात सोशल मीडियावर दिशाभूल करणारे आणि चुकीचे पोस्टही व्हायरल होत आहेत. आता बॉलिवूड गायिका सुनिधी चौहानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्या ‘बीड़ी जलइले’ हे गाणे गाताना दिसत आहे. सोशल मीडियावर काही यूजर्स दावा करत आहेत की, हा व्हिडिओ सुनिधीच्या जयपूरमधील ‘भारत जोडो’ टूरमधील कॉन्सर्टचा आहे. विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टचा तपास केला. हि माहिती दिशाभूल करणारूई असल्याचे समोर आले. प्रत्यक्षात हा व्हिडिओ आठ महिने जुना आहे. जयपूरमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयआयटी दिल्लीच्या फेस्टचा व्हिडिओ काही लोक व्हायरल करत आहेत.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर आरती भाकरे ने एक व्हिडिओ अपलोड करून लिहले, ‘सुनिधी चौहान..भारत जोडो यात्रा अल्बर्ट हॉल,जयपुर।’

फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअँप वर देखील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागचे सत्य जाणून घेण्यासाठी, विश्वास न्यूजने प्रथम संबंधित कीवर्ड टाइप करून यूट्यूबवर शोध घेतला. आम्हाला लाइव्ह आर्टिस्ट नावाच्या YouTube चॅनेलवर मूळ व्हिडिओ सापडला. तपासात हा व्हिडिओ आयआयटी दिल्लीच्या कार्यक्रमाचा असल्याचे आढळून आले. 25 एप्रिल 2022 रोजी अपलोड केलेल्या या व्हिडीओमध्ये असे सांगण्यात आले आहे की हा व्हिडिओ दिल्ली IIT च्या कल्चर फेस्ट दरम्यानचा आहे. यामध्ये सुनिधी चौहानने ‘बिडी जलाईले’ हे गाणे गायले आहे.

तपास पुढे नेत विश्वास न्यूजने सुनिधी चौहानचे सोशल मीडिया अकाउंट स्कॅन केले. 25 एप्रिल 2022 रोजी त्यांच्या फेसबुक पेजवर अपलोड केलेली काही छायाचित्रे आम्हाला आढळली. या फोटोंमध्ये सुनिधी चौहान ज्या कपड्यांमध्ये आहे त्याच कपड्यांमध्ये तिने व्हायरल व्हिडिओ आणि आयआयटी दिल्ली व्हिडिओमध्ये पाहिले आहे. सुनिधी चौहानने या पोस्टसह आयआयटी दिल्लीबद्दल लिहिले आहे.

‘भारत जोडो’ यात्रेला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 16 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचेही तपासादरम्यान समोर आले आहे. यामध्ये सुनिधी चौहानला बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमाला राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशिवाय काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूजने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ओएसडी (कम्युनिकेशन) लोकेश शर्मा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, व्हायरल झालेला व्हिडिओ सुनिधी चौहानच्या अल्बर्ट हॉलमध्ये झालेल्या कॉन्सर्टचा नाही.

यापूर्वीही सुनिधी चौहानचा एक व्हिडिओ एडिट करून व्हायरल झाला होता. याचाही तपास विश्वास न्यूज ने केला.

तपासाअंती फेसबुक यूजर आरती भाकरेचे सोशल स्कॅनिंग करण्यात आले. तपासात उघड झाले की युजरने जुलै 2012 रोजी प्रोफाइल तयार केले होते. सहा हजारांहून अधिक लोक या अकाऊंटला फॉलो करतात. यूजर हैदराबादचा रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात ‘भारत जोडो’ यात्रेच्या नावाने व्हायरल होत असलेला सुनिधी चौहानचा व्हिडिओ आठ महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा जयपूरमधील कॉन्सर्टशी काहीही संबंध नाही.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट