नवी दिल्ली (विश्वास न्यूज) अलीकडे, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाशी संबंधित बातम्या चर्चेत राहिल्या.याच दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सानिया मिर्झा भावूक होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणताना दिसत आहे की मला रडायचे नाही, परंतु मी म्हणेन की आई, बाबा आणि विशेषतः इझान तुम्हाला खूप मिस करेल. व्हायरल व्हिडिओ शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की सानिया मिर्झाने घटस्फोटानंतर शोएब मलिकबाबत हे विधान केले आहे.
विश्वास न्यूजला तपासात असे आढळून आले की व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा 2019 चा आहे, जेव्हा त्याची बहीण अनमचे लग्न झाले होते. लग्नसोहळ्याच्या दरम्यान सानियाने बहिणीसाठी हा भावनिक संदेश सांगितला होता. या व्हिडिओचा शोएब मलिक किंवा त्याच्या घटस्फोटाशी काहीही संबंध नाही.
फेसबुक यूजरने व्हायरल पोस्ट शेअर करताना, लिहिले, “भावनिक व्हिडिओ” # सानिया मिर्झा # शोएब मलिक #सनाजावेद
पोस्टची अर्काइव्ह आवृत्ती येथे पहा.
आमची तपासणी सुरू करून, आम्ही सर्वप्रथम व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. हा व्हिडिओ सानिया मिर्झाच्या बहिणीच्या लग्नाचा आहे हे दिसून आले. या आधारावर, आम्ही आमचा तपास पुढे नेला आणि Daaemi Films नावाच्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हायरल व्हिडिओची एक मोठी आवृत्ती सापडली. 27 डिसेंबर 2019 रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा अनम मिर्झा आणि असद यांच्या हैदराबादमधील लग्नाचा व्हिडिओ आहे.
डिसेंबर 2019 मध्ये न्यूज18 च्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या व्हायरल व्हिडिओशी संबंधित बातम्या आम्हाला आढळल्या. इथे मिळालेल्या माहितीनुसार, अनमने तिच्या लग्नाच्या काही झलक इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. सानिया मिर्झाचा एक व्हिडिओ शॉट देखील आहे, ज्यामध्ये ती स्टेजवरून अनमला म्हणताना दिसत आहे, “मी अनम आणि असदला खरोखर प्रेमात पडलेले आणि त्यांच्या आयुष्यात या टप्प्यावर पोहोचताना पाहिले आहे. मी, आई, बाबा आणि विशेषतः इझान तुझी खूप आठवण येईल.”
यही वीडियो हमें अनम मिर्जा की इंस्टाग्राम हैंडल पर भी 27 दिसंबर 2019 को शेयर हुआ मिला। यहां भी दी गई जानकारी के मुताबिक, यह उनकी शादी का वीडियो है।
व्हायरल विडिओ च्या बाबतीत पुष्टी करण्यासाठी आम्ही अभिषेक त्रिपाठीशी संपर्क साधला आणि त्याने आम्हाला सांगितले की, शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाने असे कोणतेही भावनिक विधान केलेले नाही.
व्हिडिओ शेअर करणाऱ्या इन्स्टाग्राम यूजर च्या सोशल स्कॅनिंगदरम्यान, आम्हाला असे आढळले की यूजर ला १४ शे पेक्षा अधिक लोक फॉलो करत आहेत. त्याच वेळी, या प्रोफाइलवरून बहुतेक सानिया मिर्झाशी संबंधित पोस्ट शेअर केल्या जातात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत असे आढळून आले की व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा 2019 सालचा आहे, जेव्हा सानिया मिर्झाची बहीण अनमचे लग्न झाले होते. लग्नाच्या सोहळ्या दरम्यान सानियाने बहिणीसाठी हा भावनिक संदेश दिला होता. या व्हिडिओचा शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटाशी काहीही संबंध नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923