Fact Check: मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावरील पुराचा हा व्हिडिओ दोन वर्षे जुना, अलीकडचा नाही
- By: Jyoti Kumari
- Published: Aug 5, 2023 at 02:21 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज)। देशाच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस आपत्ती बनला आहे. मुंबईतही मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, कोकणचा पट्टा, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. या दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे, ज्यात मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ पाण्याचा पूर आणि समुद्रातून उठणाऱ्या लाटा दिसत आहेत. काही वापरकर्ते हा व्हिडिओ मुंबईतील ताज्या परिस्थितीशी जोडून व्हायरल करत आहेत.
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात आढळून आले की, व्हायरल झालेला व्हिडिओ अलीकडचा नाही. हा व्हिडिओ 2021मध्ये मुंबईत आलेल्या तौक्ते वादळाच्या काळातील आहे, ज्यास आता वापरकर्त्यांद्वारे मुंबईतील अलीकडील परिस्थितीशी जोडून खोटा दावा करत शेअर केला जात आहे. या व्हिडिओचा मुंबईत नुकत्याच झालेल्या पावसाशी काहीही संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वापरकर्ता ‘Kishanchand Israney’ ने 28 जुलै 2023 रोजी व्हायरल व्हिडिओ (संग्रहित लिंक) शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “मुसळधार पावसामुळे मुंबईचे गेट वे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल पाण्यात बुडाले आहेत.”
या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे: मुंबई टुडे
तपास
व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम इनव्हिड टूलचा वापर केला. या माध्यमातून व्हायरल व्हिडिओच्या अनेक कीफ्रेम्स काढण्यात आल्या. त्यानंतर गुगलने रिव्हर्स सर्च इमेज टूलच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. ‘एनएस नाऊ’ नावाच्या युट्यूब चॅनेलवर आम्हाला हा व्हिडिओ सापडला. 19 मे 2021 रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओ सोबत दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ तौक्ते वादळादरम्यानचा आहे.
तपासाच्या दरम्यान ‘द व्हायरल न्यूज’ नावाच्या युट्यूब चॅनेलवर व्हायरल व्हिडिओशी संबंधित रिपोर्टही सापडला. 20 मे 2021 रोजी अपलोड केलेल्या अहवालासह दिलेल्या वर्णनानुसार, 2021मध्ये मुंबईत वादळादरम्यान असे भयानक दृश्य पाहायला मिळाले होते.
या व्हायरल व्हिडिओला ‘Indore wale/इंदूर वाले’ नावाच्या फेसबुक पेज ने देखील जुलै 2021 मध्ये आपल्या पेजवर शेअर केले होते.
मुंबईत आलेल्या तौक्ते वादळाशी संबंधित बातम्या आम्हाला अनेक न्यूज वेबसाईटवर मिळाल्या. स्क्रोलच्या वेबसाईटवर 17 मे 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमध्ये मुंबईत आलेल्या तौक्ते वादळाशी संबंधित अनेक व्हिडिओंचा वापर करण्यात आला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओही याच रिपोर्टमध्ये पाहायला मिळतो. यावरून व्हायरल झालेला व्हिडिओ जुना असून त्याचा नुकत्याच झालेल्या पाऊस आणि पुराशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आमच्या आता पर्यंतच्या तपासात हे तर सिद्ध झाले आहे की, व्हायरल झालेला व्हिडिओ जुना आहे. याबाबत ‘मिड डे’चे वरिष्ठ वार्ताहर समीउल्ला खान यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले, हा व्हिडिओ जुना आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या वेळी असे भयानक दृश्य पाहायला मिळाले होते. त्याचा मुंबईत नुकत्याच झालेल्या पावसाशी काहीही संबंध नाही.
यापूर्वी मुंबईतील नालासोपारा स्थानकाचा एक जुना व्हिडिओ मुंबईतील ताज्या परिस्थितीशी जोडून व्हायरल करण्यात आला होता. ज्याची फॅक्ट चेक विश्वास न्यूजने केली आहे. ती कथा तुम्ही इथे वाचू शकता.
तपासाअंती जुना व्हिडिओ शेअर करणाऱ्या ‘Kishanchand Israney’ या फेसबुक वापरकर्त्याचे अकाऊंट स्कॅन करण्यात आले. स्कॅनिंगमधून आम्हाला कळले की, फेसबुकवर वापरकर्त्याचे 237 मित्र आहेत. वापरकर्ता जयपूरचा रहिवासी आहे.
निष्कर्ष: मुंबईतील सद्यस्थितीशी जोडून व्हायरल करण्यात येत असलेला व्हिडिओ वर्ष 2021 मध्ये मुंबईत आलेल्या तौक्ते वादळाने असल्याचे विश्वास न्यूजने केलेल्या तपासात समोर आले आहे. त्यावेळी तौक्ते वादळाने मुंबईत प्रचंड नुकसान केले होते.
- Claim Review : हा व्हिडिओ मुंबईत नुकत्याच होत असलेल्या पावसाचा आहे.
- Claimed By : Kishanchand Israney
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.