X
X

Fact Check: मुंबईतील लिफ्ट दुर्घटनेचा जुना व्हिडिओ भ्रामक दाव्यांसह केला जात आहे व्हायरल

'विश्वास न्यूज'ने केलेल्या त्यांच्या तपासात आढळले की, हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. खरे तर, हा व्हायरल व्हिडिओ हा नुकत्याच घडलेल्या घटनेचा नसून सुमारे चार वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा आहे. 2020 मध्ये, मुंबईतील धारावी येथील सोसायटीमध्ये पाच वर्षांच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला होता.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). लिफ्टचा अपघात नुकताच समोर आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. मुंबईतील धारावी येथील एका सोसायटीत लिफ्टचा अपघात होऊन पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. 

‘विश्वास न्यूज’ने केलेल्या त्यांच्या तपासात आढळले की, हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. खरे तर, हा व्हायरल व्हिडिओ हा नुकत्याच घडलेल्या घटनेचा नसून सुमारे चार वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा आहे. 2020 मध्ये, मुंबईतील धारावी येथील सोसायटीमध्ये पाच वर्षांच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला होता.

काय होत आहे व्हायरल?

व्हायरल व्हिडिओ शेअर करताना, फेसबुक वापरकर्ता साजिद चौधरीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अत्यंत दुःखद व्हिडिओ… ही दुःखद घटना 30 जुलै रोजी संध्याकाळी 6:59 वाजता घडली, फक्त दोन तासांपूर्वी!… मुंबईच्या धारावीमध्ये लिफ्ट अपघातात पाच वर्षांच्या मुलाचा चिरडून दुःखद मृत्यू!!… कृपया मुलांना लिफ्टमध्ये एकटे सोडू नका.”

पोस्टची संग्रहित लिंक येथे पहा.

तपास  

या व्हायरल दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही संबंधित कीवर्डने गुगलवर शोध घेतला. आम्हाला हा व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेश उत्तराखंडच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल, न्यूज 18 वर आढळला. 29 नोव्हेंबर 2020 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील धारावी येथील सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये काही मुले खेळत होती. याच दरम्यान, एक मुलगा लिफ्टमध्ये अडकला आणि तिथे अपघातात त्याचा मृत्यू झाला.

आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही संबंधित कीवर्डने पुन्हा गुगलवर शोध घेतला. आम्हाला दाव्याच्या संबधित एक बातमी आजतकच्या वेबसाइटवर आढळली. 29 नोव्हेंबर 2020 रोजी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. या अहवालानुसार, हा अपघात घोषी शेल्टर बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये घडला होता. खरे पाहता, खेळताना तीन भावंडे लिफ्टमध्ये चढली आणि चौथ्या मजल्यावर गेली आणि तिघेही लिफ्टमधून बाहेर आले. दोघी बहिणी पहिल्यांदी निघून गेल्या. मुलगा लिफ्टचा दरवाजा बंद करू लागला. त्यानंतर तो तिथेच अडकून पडला आणि या अपघातात त्याचा मृत्यू झाला. 

अधिक माहितीसाठी आम्ही मिडडेचे वरिष्ठ पत्रकार समिउल्ला खान यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की, हा व्हायरल व्हिडिओ सुमारे चार वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताचा आहे. 

अखेरीस, आम्ही दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे खाते स्कॅन केले. आम्हाला आढळले की, सुमारे 21,000 लोक या वापरकर्त्याला फॉलो करतात. वापरकर्त्याने प्रोफाइलवर सांगितले आहे की, तो रायबरेलीचा रहिवासी आहे. 

निष्कर्षः विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात असे आढळले की, लिफ्ट अपघाताच्या व्हायरल व्हिडिओबद्दल केलेला दावा दिशाभूल करणारा आहे. खरे तर, व्हायरल व्हिडिओ हा नुकत्याच घडलेल्या घटनेचा नसून चार वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा आहे. 2020 मध्ये, मुंबईतील धारावी येथील सोसायटीमध्ये पाच वर्षांच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला होता.

  • Claim Review : 30 जुलै रोजी मुंबईमध्ये झाली दुःखद लिफ्ट दुर्घटना. या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला.
  • Claimed By : FB User साजिद चौधरी
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later