विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. ह्या व्हिडिओ ला बोरिवली चा आताचा सांगून व्हायरल करण्यात येत आहे. हा व्हिडिओ पाच वर्षांपासून इंटरनेट वर आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर मुंबई च्या लोकल ट्रेन मध्ये खूप अनियंत्रित गर्दी चढत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यूजर्स दावा करत आहे कि कोरोनाव्हायरस च्या काळात पहिल्यांदा लोकांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इतकी गर्दी ट्रेन मध्ये चढली.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, आम्हाला आमच्या तपासात कळले कि जो व्हिडिओ आताचा सांगून व्हायरल केला जात आहे त्याचा सध्याच्या मुंबई च्या लोकल सेवेसोबत काहीच संबंध नाही. हा व्हिडिओ कमीत कमी पाच वर्षांपासून इंटरनेट वर आहे. आमच्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Sharad Salian (शरद सालियान) ने ३ फेब्रुवारी रोजी एक मुंबई लोकल चे जुने व्हिडिओ अपलोड केले आणि दावा केला: ‘Today morning at Borivali railway station’
हाच व्हिडिओ बाकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर देखील व्हायरल होत आहे. याला ट्विटर वर देखील व्हायरल केले जात आहे.
या फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी मुंबई च्या लोकल ट्रेन बद्दल गोळा करण्यास सुरुवात केली. आम्हाला दैनिक जागरण वर प्रकाशित एका बातमीत असे कळले कि १ फेब्रुवारी पासून लोकल ट्रेन मुंबई च्या लोकांसाठी सुरु झाली. कोरोनाव्हायरस मुळे मागील दहा महिन्यांपासून लोकल ट्रेन सेवा बंद होती आणि आता काही नियम शरतांसह लोकांसाठी सुरु करण्यात आली आहे. संपूर्ण बातमी इथे वाचा.
विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ ला InVID टूल मध्ये अपलोड करून त्यातून बरेच स्क्रिनशॉट्स घेतले. या स्क्रीनशॉट्स ला आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड करून सर्च करण्यास सुरु केले. हा व्हिडिओ आम्हाला वेग-वेगळ्या तारखांवर अपलोड केलेला इंटरनेट वर बऱ्याच वेबसाईट्स वर मिळाला. सगळ्यात जुना व्हिडिओ आम्हाला नवीन पांडेय नावाच्या एका युट्युब चॅनेल वर अपलोड केलेला सापडला. २१ मार्च २०१६ रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओ मध्ये सांगितले गेले आहे कि मुंबई लोकल मध्ये भयंकर गर्दी दिसली. हा संपूर्ण व्हिडिओ इथे बघा.
तपासादरम्यान आम्हाला वेस्टर्न रेलवे मुंबई च्या सेंट्रल डिव्हिजन च्या ट्विटर हॅन्डल वर व्हायरल व्हिडिओ बदल काही माहिती मिळाली. २ फेब्रुवारी रोजी एका ट्विट च्या उत्तरात व्हायरल व्हिडिओ ला फेक सांगितले गेले.
विश्वास न्यूज ने स्वतंत्र स्वरूपात या गोष्टीची पुष्टी केली नाही कि व्हिडिओ कधीचा आहे पण हे मात्र खरं कि हा व्हिडिओ आताचा नाही. हा व्हिडिओ बराच जुना आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ संदर्भात वेस्टर्न रेलवे च्या जनसंपर्क अधिकारी यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि मुंबई सेंट्रल-डीआरएम ने या व्हिडिओ चे खंडन केले आहे. हा व्हिडिओ जुना आहे.
या नंतर आम्ही मुंबई सेंट्रल-डीआरएम चे अधिकृत ट्विटर हॅन्डल तपासले. आम्हाला व्हायरल व्हिडिओ च्या संदर्भात आम्हाला डीआरएम यांचे उत्तर मिळाले. यात त्यांनी व्हिडिओ जुना असल्याचे स्पष्ट करून या व्हिडिओ ला शेअर करण्यास मनाई केली आहे.
तपासाच्या शेवटी आम्ही त्या यूजर चा तपास केला, ज्यांनी जुना व्हिडिओ आताच सांगून शेअर केला आहे. आम्हाला कळले कि फेसबुक यूजर Sharad Salian (शरद सालियान) यांनी हा अकाउंट जून २०१९ मध्ये बनवला आहे. या प्रोफाइल ला एक हजार पेक्षा जास्ती लोकं फोल्लो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. ह्या व्हिडिओ ला बोरिवली चा आताचा सांगून व्हायरल करण्यात येत आहे. हा व्हिडिओ पाच वर्षांपासून इंटरनेट वर आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923