X
X

Fact Check: दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झाली होती जेसीबीने एटीएम चोरीची घटना, दिशाभूल करणारा दावा व्हायरल

विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात असे आढळले की, चोरट्यांनी एप्रिल 2022 मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथे जेसीबीने एटीएम खोदून नेले होते. या घटनेच्या व्हिडिओला काही वापरकर्ते अलीकडचा समजून त्यास उत्तर प्रदेशशी लिंक करून शेअर करत आहेत.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). जेसीबीने एटीएम खोदून काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही वापरकर्ते या घटनेला उत्तर प्रदेशशी जोडत आहेत, तर काही त्याला अलीकडील समजून पोस्ट करत आहेत.

विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात असे आढळले की, चोरट्यांनी एप्रिल 2022 मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथे जेसीबीने एटीएम खोदून नेले होते. या घटनेच्या व्हिडिओला काही वापरकर्ते अलीकडचा समजून त्यास उत्तर प्रदेशशी लिंक करून शेअर करत आहेत.

काय आहे व्हायरल पोस्ट

इंस्टाग्राम वापरकर्ता jagritidubey_ journalist यांनी 17 ऑगस्ट रोजी हा व्हिडिओ पोस्ट (संग्रहित लिंक) करताना लिहिले की,

“JCB ने खोदून टाकले ATM, CCTV मध्ये पकडली गेली चोरी”

या व्हिडिओमध्ये अँकर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगत आहे.

फेसबुक वापरकर्ता Suneel Samaajwaadi यांनी हा व्हिडिओ यूपीशी जोडून पोस्ट (संग्रहित लिंक) केला आहे.

तपास

या व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी आम्ही कीवर्डसह त्याचा शोध घेतला. 27 एप्रिल 2022 रोजी क्राइम तक च्या फेसबुक पेजवर या घटनेचा एक दीर्घ व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. यात लोकेशन सांगली महाराष्ट्रात देण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजवर 23 एप्रिल 2020 तारीख पडली आहे. या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम उखडले होते. एटीएममध्ये 27 लाख रुपयांची रोकड होती. चोरट्यांनी एटीएम उखडून त्यास त्यांच्या सोबत घेऊन गेले होते.

25 एप्रिल 2022 रोजी दैनिक भास्करच्या वेबसाइटवर प्रकाशित बातमीमध्ये या घटनेचा व्हिडिओ देखील अपलोड करण्यात आला होता. बातमीमध्ये लिहिले आहे की, ही घटना सांगलीतील आग्रा चौकात घडली आहे. तिथे चोरट्यांनी अॅक्सिस बँकेचे एटीएम उखडून घेऊन गेले होते. चोरट्यांनी जेसीबीही पेट्रोल पंपावरून चोरले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना एटीएम रस्त्यावर पडलेले असल्याचे आढळले.

अमर उजालाच्या वेबसाइटवर 26 एप्रिल 20222 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे की, हे कृत्य एका दरोडेखोराने केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मशीन उखडल्यानंतर चोर त्याला काही अंतरावर घेऊन गेला. कॅश बॉक्स फोडण्यात अपयश आल्याने त्याने एटीएम आणि जेसीबी टाकून पळ काढला. कॅश बॉक्समध्ये 27 लाख रुपये सापडले आहेत.

याबाबत महाराष्ट्राचे पत्रकार वरुण सिंग सांगतात की, व्हायरल झालेले सीसीटीव्ही फुटेज सांगलीत घडलेल्या घटनेचे आहे. ही सुमारे दोन वर्षे जुनी घटना आहे.

आम्ही दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडिओ शेअर करणाऱ्या इन्स्टाग्राम वापरकर्त्याचे प्रोफाइल स्कॅन केले. त्यानुसार, वापरकर्त्याचे 980 फॉलोअर्स आहेत.

निष्कर्ष: एप्रिल 2022 मध्ये, महाराष्ट्रातील सांगली येथे चोरट्यांनी जेसीबीने एटीएम उखडून नेले होते. त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज यूपीशी जोडून दिशाभूल करणारा दावा केला जात आहे.

  • Claim Review : उत्तर प्रदेशात चोरट्यांनी जेसीबीने एटीएम चोरून नेले.
  • Claimed By : Insta User- jagritidubey_journalist
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later