Fact Check: दिल्ली मध्ये मागच्या लागलेल्या लोकडाऊन चा व्हिडिओ आताच सांगून होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात दिल्ली मध्ये लोकडाऊन लागणार या नावावर व्हायरल होत असलेलं पोस्ट खोटी असल्याचे समजले. मागच्या वर्षीचा व्हिडिओ आताच सांगून व्हायरल करण्यात येत आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर दिल्ली सरकार च्या प्रेस कॉन्फरेन्स चा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल करून दावा करण्यात येत आहे कि दिल्ली मध्ये लोकडाऊन लावण्यात आला आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. आम्हाला कळले कि २२ मार्च २०२० चा व्हिडिओ आता काही लोकं मुद्दाम व्हायरल करत आहे. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर राजा भैया JDP ने २९ मार्च रोजी एक व्हिडिओ अपलोड करून लिहले: ‘दिल्ली मे लॉकडाउन’
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओ च्या आधारावर युट्युब वर ओरिजिनल व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली. आम्ही ‘दिल्ली मध्ये लोकडाऊन’ असे कीवर्डस टाईप करून सर्च करण्यास सुरुवात केली. आम्हाला आयबीपी न्यूज हिंदी वर ओरिजिनल व्हिडिओ मिळाला. हा २२ मार्च २०२० रोजी अपलोड करण्यात आले होते.

विडिओ च्या तिसऱ्या मिनिटाला आम्हाला तोच फुटेज मिळाला, जो आताच सांगून व्हायरल करण्यात येत आहे. या व्हिडिओ मध्ये दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मागच्या वर्षी दिल्ली मध्ये लावण्यात आलेल्या लोकडाऊन घोषणा करताना दिसतात. हा व्हिडिओ काही लोकं आताच सांगून व्हायरल करत आहेत.
व्हायरल व्हिडिओ वरून विश्वास न्यूज ने एबीपी न्यूज च्या सिनियर एडिटर ला संपर्क केला. त्यांनी सांगितले कि व्हायरल व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे. हा आता मुद्दाम व्हायरल करण्यात येत आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने आम आदमी पार्टी च्या नेत्या आतिशी सोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि दिल्ली मध्ये लोकडाऊन ची बातमी खोटी आहे. हा व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे.

तपासाच्या शेवटी आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्याची सोशल स्कँनिंग केली. आम्हाला कळले कि यूजर राजा भैया जीडीपी चे १३ हजार पेक्षा जास्ती फॉलोवर्स आहेत. हा अकाउंट ९ फेब्रुवारी २०१८ रोजी बनवला गेला आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात दिल्ली मध्ये लोकडाऊन लागणार या नावावर व्हायरल होत असलेलं पोस्ट खोटी असल्याचे समजले. मागच्या वर्षीचा व्हिडिओ आताच सांगून व्हायरल करण्यात येत आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट