Fact-Check: बांगलादेश मध्ये पकडले गेलेले बनावटी सॅनिटायझर विकणाऱ्यांचे छायाचित्र भारतचे म्हणून व्हायरल
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा ठरला. हे छायाचित्र बांगलादेश चे आहे, याचा भारतासोबत काही संबंध नाही.
- By: Pallavi Mishra
- Published: Jul 3, 2020 at 04:36 PM
विश्वास न्यूज, नवी दिल्ली: भारतात कोरोनाव्हायरस चे संक्रमण लक्षात घेता, लोकांना साबणाने हाथ धुण्यास तसेच नियमित हॅन्ड सॅनिटायझर वापरण्यास वारंवार सुचवले गेले आहे. मधल्या काळात सगळ्यांनाच हॅन्ड सॅनिटायझर चा तुटवडा जाणवला. असे असताना बनावटी हॅन्ड सॅनिटायझर बनवणाऱ्यांचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात २ लोकं जमिनीवर बसलेले दिसतात. तसेच या चित्रात मागे, ग्लोव्हस आणि मास्क घातलेले सुरक्षाकर्मी पण पहायला मिळतात ज्यांच्या समोर हॅन्ड सॅनिटायझर पडलेले दिसत आहेत.
या छायाचित्रांद्वारे असा दावा केला जात आहे कि या लोकांना बनावटी सॅनिटायझर बनवताना भारतात पकडले गेले. विश्वास न्यूज ने या पोस्ट चा तपास आधी पण केला आहे. त्यावेळी देखील आम्हाला ह्या पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा असल्याचे आढळले. हे छायाचित्र बांगलादेश चे आहे, याचा भारतासोबत काही संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?
व्हायरल पोस्ट मध्ये दोन व्यक्ती जमिनीवर बसलेले दिसतात. छायाचित्रात त्यांच्या मागे मास्क आणि ग्लोव्हस घातलेले सुरक्षाकर्मी पण उभे असलेले दिसतात. आणि तसेच त्यांच्या समोर बनावटी हॅन्ड सॅनिटायझर च्या बाटल्या पण पडलेल्या दिसतात.
ह्या छयाचित्रासोबत खालील मजकूर शेअर केला गेला आहे:
“नक्कली सेनेताईज़र बना के देश कि सेवा करते हुवे देश प्रेमी मोलवी ।।अब घिन आने लगी है इन हरामियो से”
या पोस्ट ची फेसबुक किंवा अर्काइव्ह लिंक बघा.
तपास:
या छायाचित्राचा तपास करताना आधी आम्ही त्याचे नीट निरीक्षण केले. या छायाचित्रातल्या सुरक्षाकर्मी च्या गणवेशावर RAB लिहलेला दिसत. आम्ही इंटरनेट वर याचा तपस केल्यानंतर आम्हाला दिसले कि RAB चा फुल फोर्म, ‘रॅपिड ऍक्शन बटालियन’ असा आहे आणि हे बांगलादेश चे पोलीस आहेत जे अपराध आणि आतंकवादाच्या विरोधात कार्यरत आहेत.
या घटनेशी संबंधित आम्हाला एक बातमी newsnarayanganj24.net वर देखील सापडली. त्या बातमी प्रमाणे, RAB टीम ने बांगलादेश च्या नारायणगंज मधल्या रूपगंज थंय अंतर्गत नोआगांव मधल्या एका कारखान्यात एका विशेष अभियानाअंतर्गत, २ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता फॅक्टरी मध्ये धाड टाकली आणि बनावटी हॅन्ड सॅनिटायझर च्या बाटल्या जप्त केल्या. तसेच जमाल मियां नामक इसमाला अटक केली.
या बातमीची पुष्टी करायला आम्ही newsnarayanganj24.net चे संपादक, शाहजहां शमीम यांच्या सोबत संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हे छायाचित्र बांगलादेशच्या नारायणगंज मध्ये बनावटी सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनी वर धड टाकल्यानंतरचे आहे. हि घटना ३ एप्रिल रोजी घडली.
या पोस्ट ला सोशल मीडिया वर बऱ्याच लोकांनी शेअर केले आहे. यातलाच एक म्हणजे, Ayush Medtiaya, या यूजर चे फेसबुक वर १८० फॉलोवर आहेत.
विश्वास न्यूज ने आधी पण या पोस्ट चे फॅक्ट-चेक केले होते.
निष्कर्ष: निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा ठरला. हे छायाचित्र बांगलादेश चे आहे, याचा भारतासोबत काही संबंध नाही.
- Claim Review : नक्कली सेनेताईज़र बना के देश कि सेवा करते हुवे देश प्रेमी मोलवी ।।अब घिन आने लगी है इन हरामियो से
- Claimed By : Ayush Medtiaya
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.