Fact Check: उत्तराखंड मध्ये ढगफुटी च्या घटनेचा जुने छायाचित्र जम्मू च्या किश्तवाड च्या नावाने व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल छायाचित्रासोबत शेअर केलेला दावा दिशाभूल करणारा ठरला. व्हायरल चित्र 2016 मधील उत्तराखंड मध्ये झालेल्या जुन्या घटनेचे आहे. याचा आता जम्मू मधील त्रासदी सोबत काही संबंध नाही.
- By: ameesh rai
- Published: Aug 2, 2021 at 02:47 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एक पुराचे छायाचित्र व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स दावा करत आहेत कि व्हायरल चित्र जम्मू च्या किश्तवाड चे आहे आणि आताचे आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा दिशाभूल करणारा ठरला. व्हायरल छायाचित्र 2016 मध्ये उत्तराखंड मधील ढगफुटीच्या जुन्या घटनेचा आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Rj Aqib ने Kashmir News नावाच्या एका फेसबुक ग्रुप मध्ये हे छायाचित्र शेअर केले आणि इंग्लिश मध्ये लिहले: 40 People Reportedly #Missing After Cloudburst In #Kishtwar A cloud burst has occured in village Honjar Dacchan in Kistwar district of Jammu. Reportedly 40 people are missing. Rescue operation Underway. As per latest reports, 4 #dead #bodies have been recovered* in Honzar cloudburst in Dachan, Kishtwar Further details awaited
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल चित्रासोबत होत असलेल्या किश्तवाड च्या दाव्याचा तपास आम्ही इंटरनेट वर ओपन सर्च द्वारे केला. महत्वाच्या कीवर्डस च्या उपयोग करून शोधल्यावर आम्हाला आमची सहयोगी वेबसाईट दैनिक जागरण च्या वेबसाईट वर 28 जुलै 2021 रोजी प्रकाशित एक रिपोर्ट मिळाली. या रिपोर्ट मध्ये सांगितले गेले होते कि किश्तवाड च्या डच्चन तहसील मध्ये ढगफुटीच्या घटनेनंतर १४ लोकीचे बेपत्ता झाले. चौदा लोकांना वाचवण्यात आले, ज्यात पाच लोकं गंभीर स्वरूपात जखमी आहे आणि सात जणांचे शव मिळाले आहे. हि रिपोर्ट इथे क्लीक करून वाचा.
आम्हाला आमच्या तपासामध्ये कळले कि व्हायरल चित्र किश्तवाड च्या सध्या च्या घटनेचे नाही. आम्ही हे जाणून घेण्यासाठी गूगल रिव्हर्स इमेज सर्च टूल चा वापर केला. आम्हाला इंटरनेट वर ह्या छायाचित्राबद्दल बरेच निकाल मिळाले. आम्हाला डीएनए च्या वेबसाईट वर 2 जुलै 2016 रोजी अपलोड केलेली एक रिपोर्ट मिळाली. ह्या चित्रात न्यूज एजेन्सी एएनआय चा लोगो आम्हाला दिसला. ह्या रिपोर्ट मध्ये उत्तराखंड च्या ढगफुटी ची घटना झाल्यावर आलेल्या पुराची माहिती दिली गेली आहे. ह्या रिपोर्ट ला इथे क्लीक करून वाचा.
ह्यानंतर आम्ही उत्तराखंड मध्ये 2016 मध्ये आलेल्या त्रासदी बद्दल इंटरनेट वर सर्च केले. आम्हाला दैनिक जागरण च्या वेबसाईट वर 1 जुलै 2016 रोजी प्रकाशित रिपोर्ट मिळाली ज्यात व्हायरल छायाचित्राचा समावेश होता. ह्या रिपोर्ट मध्ये तेव्हाच्या ढगफुटीचे वर्णन केले गेले आहे. रिपोर्ट प्रमाणे, अलकनंदा जमिनीच्या वर पाणी आले आणि त्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. हि रिपोर्ट इथे वाचा.
आताप्रयंतच्या आमच्या तपासाप्रमाणे आम्ही ट्विटर वर ऍडव्हान्स सर्च टूल चा वापर करून अजून तपास केला. आम्हाला न्यूज एजेंसी एएनआय च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर, 1 जुलै 2016 रोजी केलेला एक ट्विट मिळाला. ह्या ट्विट मध्ये पोस्ट केलेल्या दोन छायाचित्रांपैकी एक चित्र हे व्हायरल झालेले चित्र आहेत. पाच वर्षापेक्षा जुन्या ह्या ट्विट मध्ये सांगितले गेले आहे कि चमोली जिल्ह्यात ढगफुटी नंतर अलकनंदा नदी ची पातळी वाढली. हा ट्विट खाली बघा.
आम्ही या बद्दल अधिक माहिती साठी दैनिक जागरण चे जम्मू चे प्रभारी रिपोर्टर राहुल शर्मा यांना संपर्क केला. आम्ही त्यांच्यासोबत व्हायरल चित्र आणि त्यासोबत व्हायरल होत असलेला दावा देखील शेअर केला. शर्मा यांनी सांगितले कि हे छायाचित्र किश्तवाड मधील आताचे छायाचित्र नाही आहे. त्यांनी आमच्या सोबत किश्तवाड मधील रेस्क्यू ऑपरेशन चे काही छायाचित्र देखील शेअर केले जे तुम्ही खाली बघू शकता.
विश्वास न्यूज ने व्हायरल दावा शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर Rj Aqib चा प्रोफाइल तपासाला. यूजर बारामुल्ला चा रहिवासी आहे, त्यांच्या प्रोफाइल ला 1035 लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल छायाचित्रासोबत शेअर केलेला दावा दिशाभूल करणारा ठरला. व्हायरल चित्र 2016 मधील उत्तराखंड मध्ये झालेल्या जुन्या घटनेचे आहे. याचा आता जम्मू मधील त्रासदी सोबत काही संबंध नाही.
- Claim Review : किश्तवाड मध्ये ढगफुटीचे छायाचित्र
- Claimed By : Rj Aqib
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.