X
X

Fact Check: या जुन्या छायाचित्राचा लोकडाऊन विरोधी प्रदर्शनासोबत काही संबंध नाही, व्हायरल दावा खोटा आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल छायाचित्राबद्दलचा दावा खोटा असल्याचे समजले. २०१९ मध्ये अल्जीरिया चे तात्कालीन राष्ट्रपती यांच्या विरुद्ध झालेले प्रदर्शन आता कोरोनाव्हायरस च्या लोकडाऊन विरूद्ध झालेल्या प्रदर्शनाच्या दाव्यासह होत आहे व्हायरल.

  • By: ameesh rai
  • Published: Apr 26, 2021 at 12:35 PM

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात दावा केला जात आहे कि हे छायाचित्र विदेशातील लोकडाऊन विरोधी प्रदर्शनाचे आहे. या फोटो च्या माध्यमातून भारताच्या परिस्थितीवर वक्तव्य देखील करण्यात येत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा ठरला. २०१९ मध्ये झालेल्या अल्जेरिया च्या तत्कालीन राष्ट्रपतीच्या विरुद्ध झालेले प्रदर्शन आता चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

भारतात कोरोनाव्हायरस चे केसेस वाढतच आहे. त्यातच पब्लिक मोव्हमेन्ट वर देखील रॉक लावल्या गेली आहे आणि त्यात संक्रमणाची चेन तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर आशिष सिंह ने व्हायरल छायाचित्र २३ एप्रिल २०२१ रोजी शेअर केले आणि लिहले: ‘विदेशों में इस तरह लॉकडाउन का बहिष्कार हो रहा है और यहां तो लॉकडाउन का इंतजार हो रहा है,भगवान मालिक है सब राम भरोसे चल रहा है।’
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल छायाचित्र सगळ्यात आधी गूगल रिव्हर्स इमेज च्या मदतीने इंटरनेट वर शोधले. आम्हाला इंटरनेट वर असे बरेच छायाचित्र सापडले. आम्हाला dubawa.org वर २० नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशित एक रिपोर्ट मिळाली. या रिपोर्ट मध्ये सांगितले गेले होते कि हे छायाचित्र अल्जीरिया मध्ये तत्कालीन राष्ट्रपती यांच्या सत्तेच्या विरोधात फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रदर्शन झाले, त्याचे हे छायाचित्र. हि रिपोर्ट इथे क्लीक करून वाचा.

या रिपोर्ट वर मिळालेल्या क्लूज च्या आधारावर आम्ही या छायाचित्राबद्दल इंटरनेट वर सर्च केले. आम्हाला हे छायाचित्र islam21c.com वर १३ मार्च २०१९ रोजी प्रकाशित एका रिपोर्ट मध्ये मिळाले. या जुन्या रिपोर्ट मध्ये फेब्रुवारी २०१९ मध्ये अल्जीरिया मध्ये आंदोलन सुरु झाले त्याबद्दल सांगण्यात येत होते. हि रिपोर्ट तुम्ही इथे वाचू शकता.

विश्वास न्यूज च्या आतापर्यंतच्या तपासात हे सिद्ध झाले होते कि हे छायाचित्र कोरोनाव्हायरस संक्रमणाची सुरुवात होण्याच्या आधीचे आहे. पहिला केस डिसेंबर २०१९ मध्ये आला होता. याचा कोरोनाव्हायरस सोबत काहीच संबंध नाही. हे अल्जीरिया मधले राजनेतिक आंदोलन आहे. विश्वास न्यूज ने या संबंधी पुष्टी करण्यासाठी अल्जीरिया बद्दल रिपोर्ट करणाऱ्या न्यूज ऑर्गनायझेशन अल्जीरिया टुडे सोबत हा दावा शेअर केला. त्यांनी देखील स्पष्ट केले कि हे छायाचित्र अल्जीरिया मध्ये २०१९ मध्ये झालेल्या हीरक आंदोलन (सत्ता परिवर्तन आंदोलन) चे आहे. त्याचा कोरोनाव्हायरस सोबत काहीच संबंध नाही.

विश्वास न्यूज ने व्हायरल छायाचित्र शेअर करणारे फेसबुक यूजर आशिष सिंह यांचे प्रोफाइल स्कॅन केले. यूजर ने आपले प्रोफाइल पब्लिक नाही केले.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल छायाचित्राबद्दलचा दावा खोटा असल्याचे समजले. २०१९ मध्ये अल्जीरिया चे तात्कालीन राष्ट्रपती यांच्या विरुद्ध झालेले प्रदर्शन आता कोरोनाव्हायरस च्या लोकडाऊन विरूद्ध झालेल्या प्रदर्शनाच्या दाव्यासह होत आहे व्हायरल.

  • Claim Review : लोकडाऊन विरोधी प्रदर्शन
  • Claimed By : Ashish Singh
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later