Fact Check: बनारस घाटावरचे हे छायाचित्र २००८ चे आहे, याचा कोविड सोबत काहीच संबंध नाही
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल छायाचित्र जुने असल्याचे समजले. हे छायाचित्र ज्या संदर्भासह व्हायरल करण्यात येत आहे ते खोटे आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: May 20, 2021 at 08:31 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): कोरोनाव्हायरस चे संक्रमण वाढत असताना गंगेत बरेच मृतदेह सापडल्याचे छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहेत. आणि त्यात असे बरेच यूजर्स आहेत जे जुने छायाचित्र आताचे समजून व्हायरल करत आहेत. असेच एक छायाचित्र यूजर्स पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधून व्हायरल करत आहे आणि छायाचित्र आताचे असल्याचा दावा करत आहेत. व्हायरल छायाचित्रात एक कुत्रा एक मृतदेह खाताना दिसत आहे. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी ठरली.
आमच्या तपासात कळले कि २००८ चे छायाचित्र काही लोकं आताचे सांगून व्हायरल करत आहेत. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर कारनेहर सिंह ने १९ मे रोजी एक छायाचित्र पोस्ट केले. त्यावर लिहले होते: उसके मन की बकवास क्या सुनना जो गंगा में बहती लाशों पर खामोश है।
या छायाचित्राला काही लोकं आताचे समजून व्हायरल करत आहेत. ह्या फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड करून शोधले. आम्हाला हे छायाचित्र agefotostock.com नावाच्या वेबसाईट वर मिळाले. ह्या छायाचित्रात सांगितले गेले होते कि हे रंजीत सेन यांनी काढले आहे. याचे कलेक्शन डिंडोडिया फोटो पाशी आहेत. कॅप्शन मध्ये सांगितले गेले होते कि हे छायाचित्र वाराणसी घाटावरचे आहे.
छायाचित्रावर alamy लिहले असल्यामुळे आम्ही alamy च्या वेबसाईट वर पोहोचलो. त्याच कीवर्ड सह आम्ही जेव्हा हे छायाचित्र आहे शोधले तेव्हा आम्हाला इथे देखील हे छायाचित्र मिळाले. हे छायाचित्र २० फेब्रुवारी २००८ मध्ये काढले गेले होते.
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाच्या पुढच्या टप्प्यात फोटोग्राफर रंजीत सेन यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल छायाचित्र बरेच जुने आहे. याचा कोविड सोबत काहीच संबंध नाही. सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे.
विश्वास न्यूज ने हे छायाचित्र शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला, फेसबुक यूजर कारनेहर सिंह यांचे प्रोफाइल स्कॅन केले, त्यात कळले कि यूजर लुधियाना चे रहिवासी आहेत. फॅक्ट चेक होत पर्यंत त्यांचे १३०० पेक्षा जास्ती फ्रेंड्स होते.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल छायाचित्र जुने असल्याचे समजले. हे छायाचित्र ज्या संदर्भासह व्हायरल करण्यात येत आहे ते खोटे आहे.
- Claim Review : व्हायरल छायाचित्र बानारस चे आहे
- Claimed By : कारनेहर सिंह
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.