Fact Check: हरियाणातील हिंसाचाराच्या संदर्भात व्हायरल होत असलेला हा फोटो जुना आहे

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). हरियाणातील मेवाट जिल्ह्यात नूंह येथे झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने अतिक्रमण मोहीम राबवली होती. मात्र, हायकोर्टाने सोमवारी हरियाणा सरकारला फटकारले आणि बुलडोजरवर बंदी आणली आहे. या दरम्यान, एक फोटो शेअर केला जात आहे आणि त्यास नूंहमधील अतिक्रमणाचा असल्याचा म्हणून व्हायरल केले जात आहे.

विश्वास न्यूजने या व्हायरल पोस्टची चौकशी केली. हा दावा चुकीचा असल्याचे समोर आले आहे. खरे तर, हा फोटो 2022 पासून सोशल मीडियावर आहे. हरियाणातील नूंह येथे झालेल्या हिंसाचाराशी संबंधित खोट्या दाव्यासह हा फोटो व्हायरल केला जात आहे.

काय होत आहे व्हायरल?

‘मोदी-योगी समर्थक मंच’ या फेसबुक पेजवर राकेश वर्मा नावाच्या युजरने (संग्रहित आवृत्ती) 6 ऑगस्टला एक फोटो पोस्ट करताना लिहिले होते, “पुढच्या मिरवणुकीसाठी दगडांची व्यवस्था करताना खट्टर साहेब … सर्वांच्या पाठिंब्याने सर्वांचा विकास. उशीरा का होईना, बाबाजींचा बुलडोझरच मदतीला आला.”

सोशल मीडियावर अनेक युजर्सनी या फोटोला याच दाव्यासह शेअर केले आहे.

तपास 

व्हायरल फोटोचा तपास करण्यासाठी सर्वप्रथम गुगल लेन्सचा वापर करण्यात आला. आम्हाला अनेक न्यूज वेबसाइटवर व्हायरल फोटो सापडला. तपासादरम्यान आम्हाला ‘दस्तक हिंदुस्तान’च्या वेबसाइटवर व्हायरल झालेल्या फोटोशी संबंधित प्रकाशित एक बातमी मिळाली. 17 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत तो फोटो लखनौचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

तपासादरम्यान आम्हाला अशा अनेक बातम्या सापडल्या, ज्यात हे अतिक्रमण कानपूरमधील असल्याचे सांगण्यात आले आहे.  4 जून 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘इकॉनॉमिक टाईम्स’मध्ये प्रकाशित बातमीमध्ये व्हायरल फोटोचा वापर करून तो कानपूरमधील असल्याचे सांगण्यात आले आहे. या फोटोसोबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, कानपूरमध्ये शुक्रवारी कथित बाजार बंदच्या संदर्भात वेगवेगळ्या समुदायाच्या दोन गटांमध्ये झटापट झाल्यानंतर तणाव निर्माण झाला होता.

तपासामध्ये आम्हाला 17 जून 2022 रोजी आनंदबाजार मासिकामध्ये देखील या फोटोशी संबंधित बातमी मिळाली. त्यात इतरही अनेक फोटो आहेत. इतर काही बातम्यांमध्येही फोटोशी संबंधित बातमी वाचता येईल.

बातम्यांच्या अनेक वेबसाइटवर व्हायरल झालेल्या फोटोशी संबंधित बातम्या, सन 2023 मध्ये उत्तर प्रदेशच्या नावाने प्रकाशित झालेल्या बातमीमध्ये वाचल्या जाऊ शकतात.

पुढे तपासात आम्ही हरियाणातील अतिक्रमणाबद्दल शोध घेतला. आम्हाला माहिती मिळाली की, यापूर्वी झालेल्या हिंसाचारामुळे हरियाणा सरकारने नूंहमधील अवैध बांधकामांवर कारवाई सुरू केली होती, ज्यावर हायकोर्टाने नूंहमधील अतिक्रमणे हटविण्याची आणि बांधकाम पाडण्याची दखल घेतली आणि हरियाणा सरकारकडून उत्तर मागितले. हायकोर्टाने सरकारला फटकारले आणि म्हटले की, “या प्रकरणात विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जात आहे, कोणतेही बांधकाम पाडण्यापूर्वी सरकारने नोटिसा बजावण्याच्या प्रक्रियेचे पालन केले का, असा प्रश्न हायकोर्टाने सरकारला विचारला आहे.”

दरम्यान, हा व्हायरल फोटो कधी आणि कुठे घेण्यात आला याची पुष्टी विश्वास न्यूजने स्वतंत्रपणे केलेली नाही. परंतु आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, हा फोटो जुना आहे आणि नूंहमधील अलीकडील हिंसाचाराशी त्याचा काहीही संबंध नाही. अधिक माहितीसाठी आम्ही दैनिक जागरण, नोएडाचे माहिती प्रभारी, मनु त्यागी यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यासोबत व्हायरल पोस्ट शेअर केली. ते म्हणाले की, “हरियाणातील नूंह येथे अतिक्रमणाच्या विरोधात बुलडोजर चालविण्यात आला होता, परंतु व्हायरल फोटो तेथील नाही.”

यापूर्वीही नूंहमधील हिंसेच्या संदर्भात अनेक बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या गेल्या आहेत. या प्रकरणी विश्वास न्यूजने चौकशी करून सत्य समोर आणले आहे. त्या सर्व फॅक्ट चेक कथा तुम्ही येथे वाचू शकता.

तपासाच्या शेवटी, व्हायरल फोटो चुकीच्या दाव्यासह सामायिक करणाऱ्या युजरची तपासणी केली गेली. फेसबुक युजर, राकेश वर्मा हा उत्तर प्रदेशातील कानपूर येथे राहतो. युजरला 212 लोक फॉलो करत आहेत.

निष्कर्षः विश्वास न्यूजच्या तपासणीत व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाले आहे. ज्या फोटोला अलीकडील नूंह हिंसाचाराशी संबधित असल्याचे सांगून व्हायरल केले जात आहे, तो फोटो एका वर्षापेक्षा जास्त काळ इंटरनेटवर आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट