Fact Check: मेघन मार्कल चे तीन वर्ष जुने चित्र राणी एलिझाबेथ च्या अंत्यसंस्काराचे सांगून व्हायरल
विश्वास न्यूजने मेघन मार्कल आणि प्रिन्सेस डायना यांच्या चित्राबाबत केलेल्या दाव्याची चौकशी केली, ती दिशाभूल करणारी ठरली. मेघन मार्कलचा व्हायरल झालेला फोटो 2019 सालचा आहे. ज्याला लोक आता भ्रामक दावा करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
- By: Pragya Shukla
- Published: Sep 21, 2022 at 12:28 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): मेघन मार्कल आणि प्रिन्सेस डायना यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करताना असा दावा केला जात आहे की, मेघन मार्कल राजकुमारी डायनासारखी वेशभूषा करून राणी एलिझाबेथच्या अंत्यसंस्काराला पोहोचली होती.
विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हायरल दावा खोटा निघाला. मेघन मार्कलचा व्हायरल झालेला फोटो 2019 सालचा आहे. ज्याला लोक आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Ofentse Mwase ने व्हायरल चित्र शेअर केले आणि इंग्रजी मध्ये लिहले” मी मेघन मार्कल ची फॅन नाही, पण राणी एलिझाबेथ च्या अंत्य संस्काराला त्या प्रिन्सेस डायना सारख्या तयार हुन आल्या, ते मला खूप आवडले.”
ह्या पोस्ट ची आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेजद्वारे फोटो शोधला. यादरम्यान, आम्हाला हे चित्र 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या वोगच्या अहवालात आढळले.
तपास पुढे नेत, आम्ही संबंधित कीवर्डसह Google वर शोधण्यास सुरुवात केली. यावेळी आम्हाला हे चित्र ऑनलाइन फोटो कॅटलॉग अलामिच्या वेबसाइटवर आढळले. फोटो नोव्हेंबर 2019 मध्ये शेअर करण्यात आला होता. कॅप्शननुसार, मेघन मार्कल लंडनमध्ये शहीदांच्या स्मारकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचली.
शोध दरम्यान, आम्हाला हे चित्र 2019 मध्ये समान माहितीसह रॉयटर्स फोटो गॅलरीमध्ये सामायिक केलेले आढळले.
आम्हाला शटरस्टॉक वेबसाइटवर अपलोड केलेले प्रिन्सेस डायनाचे व्हायरल चित्र सापडले. कॅप्शननुसार, प्रिन्सेस डायनाचा हा फोटो नोव्हेंबर 1991 मध्ये घेण्यात आला होता. मेमोरियल डे निमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी ती आली तेव्हा.
अधिक माहितीसाठी आम्ही लंडनस्थित पत्रकार नाओमी कॅंटन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. हे चित्र अनेक वर्षे जुने आहे आणि नोव्हेंबर महिन्याचे आहे, कारण नोव्हेंबर महिन्यात मेमोरियल डेला आपण असे कपडे घालतो. स्मृतीदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते.
तपासाअंती, विश्वास न्यूजने बनावट पोस्ट करणाऱ्या Ofentse Mwase या यूजरचे सोशल स्कॅनिंग केले. प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, यूजर डिसेंबर 2009 पासून ट्विटरवर सक्रिय आहे. वापरकर्त्याला 111.4K लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने मेघन मार्कल आणि प्रिन्सेस डायना यांच्या चित्राबाबत केलेल्या दाव्याची चौकशी केली, ती दिशाभूल करणारी ठरली. मेघन मार्कलचा व्हायरल झालेला फोटो 2019 सालचा आहे. ज्याला लोक आता भ्रामक दावा करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
- Claim Review : मेघन मार्कल चे चित्र राणी एलिझाबेथ च्या अंत्यसंस्काराचे
- Claimed By : Ofentse Mwase
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.