X
X

Fact Check: अरविंद केजरीवालचा लहान मुलांना मास्क घालून देतानाचा छायाचित्र होत आहे व्हायरल, कोविड—19 सोबत संबंध नाही

अरविंद केजरीवाल चे मुलांना मास्क घालून देतानाचे व्हायरल होत असलेले छायाचित्र कॉरोन काळातील नाही, त्या आधीचे आहे, जेव्हा केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे शाळेत मुलांना पॉल्यूशन मास्क वाटण्यास गेले होते.

  • By: Amanpreet Kaur
  • Published: Apr 10, 2021 at 09:03 PM
  • Updated: Sep 28, 2023 at 02:36 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया एका लहान मुलाला मास्क घालून देताना दिसतात. दावा केला जात आहे कि या दोघांनी पण मास्क घातला नाही पण लहान मुलाला मास्क घालून देत आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये केजरीवाल यांनी मास्क न घालण्याचे दंड ५०० रुपयांवरून २००० रुपये केले. त्यानंतर सोशल मीडिया वर हे छायाचित्र व्हायरल झाले.

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल छायाचित्र २०१९ मध्ये काढले गेले होते, जेव्हा राज्य सरकार च्या एका पुढाकारात, केजरीवाल यांनी शाळेतील मुलांना मोफत पॉल्यूशन मास्क वितरित केले होते. हे लक्षात घेतले पाहिजे कि भारतात कोरोनाव्हायरस चा पहिला रुग्ण २७ जानेवारी २०२० रोजी समोर आला होता. म्हणजेच या छायाचित्राचा कोरोनाव्हायरस सोबत काहीच संबंध नाही.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर राष्ट्रहित सर्वोपरि ने हे छायाचित्र शेअर करून लिहले: यह मास्क खुद नहीं पहनते सिर्फ जनता को पहनाते हैं… इनके पास तो कोरोना से बचने के लिए भी z plus सिक्योरिटी है #टोपी_बाज
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास शेअर करत गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये सर्च च्या मदतीने छायाचित्र शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये व्हायरल छायाचित्र मिळाले. १ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रकाशित झालेल्या एका रिपोर्ट प्रमाणे, अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया राज्य सरकार च्या पुढाकारात मोफत मास्क वाटले.

आम्हाला केजरीवाल च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर देखील, १ नोव्हेंबर २०१९ रोजी केलेला एक ट्विट बघितला. त्यांनी यात सांगितले होते कि आजूबाजूच्या राज्यात पराली जालावण्यामुळे दिल्ली एका गॅस चेम्बर मध्ये बदलले आहे. स्वतःला या जेहरिली हवे मुळे स्वतःला वाचवणे गरजेचे आहे. प्रायव्हेट आणि सरकारी शाळेत जाऊन आम्ही आज ५० लाख मास्क वाटण्यास सुरुवात केली आहे. मी दिल्ली च्या रहिवाश्यांना विनंती करतो कि त्यांनी पण गरज पडल्यास मास्क चा वापर करावा.

कोरोनाव्हायरस चा पहिला रुग्ण २७ जानेवारी २०२० रोजी केरळ मध्ये आढळला होता, जेव्हाकी हे छायाचित्र दोन महिने आधी नोव्हेंबर मध्ये काढले गेले होते.

अधिक माहिती साठी आम्ही आम आदमी पार्टी चे प्रवक्ता राघव चड्ढा यांना संपर्क केला. त्यांनी पुष्टी केली कि व्हायरल छायाचित्र सध्याचे नाही जुने आहे, जे आता चुकीच्या दाव्यासह व्हायरल केले जात आहे. त्याचा कोरोनाव्हायरस सोबत संबंध नाही.

आता आम्ही ट्विटर वर हा पोस्ट शेअर शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला. राष्ट्रहित सर्वोपरि चे एक लाख अठरा हजार पेक्षा जास्ती फॉलोवर्स आहे.

निष्कर्ष: अरविंद केजरीवाल चे मुलांना मास्क घालून देतानाचे व्हायरल होत असलेले छायाचित्र कॉरोन काळातील नाही, त्या आधीचे आहे, जेव्हा केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे शाळेत मुलांना पॉल्यूशन मास्क वाटण्यास गेले होते.

  • Claim Review : अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया बिना मास्क चे मुलांना मास्क घालून देतात
  • Claimed By : राष्ट्रहित सर्वोपरि
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later