विश्वास न्यूज तपासात व्हायरल पोस्ट जुने आणि दिशाभूल करणार असल्याचे लक्षात आले. केईएम हॉस्पिटल मध्ये अशी मशीन नाही आहे जी कुठल्याही पॅरालीसीस रुग्णाला बरे करेल. नुकताच स्ट्रोक आलेल्या रुग्णाला २४ तासाच्या आत उपचार उपलब्ध करण्यात येते पूर्वी हा कालावधी ६ तासांचा होता.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला मराठी मध्ये विविध सोशल मीडिया वेबसाईट्स वर एक मेसेज व्हायरल होताना आढळला. या मेसेज मध्ये सांगण्यात आले होते कि, के इ एम हॉस्पिटल, मुंबई मध्ये एक ऑटोमॅटिक मशीन आहे जी कोणत्याही पॅरालीसीस झालेल्या व्यक्तीला काही तासात अगदी आधी सारखे बरे करू शकते. संपूर्ण जगात अश्या काहीच मशीन आहेत आणि डॉ नितीन डांगे हि मशीन हाताळण्यात एक्स्पर्ट आहेत. तसेच बीएमसी नि या मशीन चे लोकार्पण केले.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा जुना आणि दिशाभूल करणारा असल्याचे लक्षात आले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज, ‘Iccha purti karnara varadvinayak’ ने मराठी मध्ये, डिसेंबर ३ रोजी एक मेसेज अपलोड केला, हा मेसेज खालील प्रमाणे आहे.
के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात (प्यारालेसीस /लकवा )या आजारावर अँटोमॅटिक या मशीन द्वारे काही तासातच रुग्ण पूर्ववत बरा होतो, मेंदूच्या गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात, तसेच भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
जगभरात काही ठराविक अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सदर मशीनीचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.
माहीती सर्वाना कळवा फायदा होईल FORWARDED AS RECEIVED..
या फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
विश्वास न्यूज च्या लक्षात आले कि हा मेसेज मागील दोन वर्षांपासून व्हायरल होत आहे. आम्हाला हाच मेसेज फेसबुक पेज, आरोग्यदूत वर १ नोव्हेंबर, २०१८ रोजी अपलोड केलेला मिळाला. या पोस्ट ला १८०० लाईक्स आहेत आणि या पोस्ट ला ३४०० वेळा शेअर केले गेले आहे.
तपास:
विश्वास न्यूज च्या लक्षात आले कि व्हायरल होत असलेला मेसेज विविध सोशल नेटवर्किंग वेबसाईट्स वर शेअर करण्यात येत आहे, आणि म्हणून आम्ही तपासाची सुरुवात साध्या कीवर्ड सर्च ने केली.
आम्हाला एक बातमी ‘द हिंदू’ च्या वेबसाईट वर, ऑक्टोबर ११, २०१८ रोजी अपलोड केलेली मिळाली. रिपोर्ट चे शीर्षक आहे: KEM Hospital gets advanced stroke centre
या बातमीत व्हायरल मेसेज मध्ये उल्लेख असलेल्या, डॉ नितीन डांगे चा देखील उल्लेख होता.
बातमीत दिल्या प्रमाणे, बरेच लोकं स्ट्रोक मधून जातात पण या रुग्णांना दवाखान्यात पोहोचलायला उशीर होतो, ज्यामुळे त्यांना उपचार मिळत नाही, पण ऍडव्हान्स मशीन मुले, काही निवडक रुग्णांना २४ तासांपर्यंत उपचार मिळू शकेल.
हि संपूर्ण बातमी इथे वाचा:
न्यूज सर्च च्या वेळी आम्हाला मुंबई मिरर वर नोव्हेंबर ३, २०१८ रोजी अपलोड केलेली एक बातमी मिळाली.
बातमीचे शीर्षक: “WhatsApp rumour of ‘paralysis cure’ sends patients haring to KEM“
रिपोर्ट मध्ये नमूद केल्या प्रमाणे, केईएम न्यूरोसर्जन नि स्पष्ट केले कि असे स्ट्रोक यायच्या २४ तासातच काही रुग्णांचा उपचार केला जाऊ शकतो, या मशीन ने जुने केसेस बरे केले जाऊ शकत नाही.
हि संपूर्ण रिपोर्ट इथे वाचा:
आता दोन्ही रिपोर्ट मधून हे स्पष्ट झाले कि सगळेच पॅरालीसीस च्या रुग्णांना केईएम हॉस्पिटल मध्ये लागलेल्या मशीन ने बरे केले जाऊ शकत नाही. फक्त असेच रुग्ण ज्यांना नुकताच स्ट्रोक आला असेल त्यांच्यावर २४ तासात उपचार केले जाऊ शकते.
विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्पयात, डॉ नितीन डांगे यांच्या सेक्रेटरी हिना शेख यांच्या सोबत संपर्क साधला, त्यांनी सांगितले कि हा मेसेज मागील २ वर्षांपासून व्हायरल होत आहे. पण या मशीन नि अगदी कुठला पण रुग्ण बारा हू शकत नाही. स्ट्रोक आल्याच्या २४ तासात या रुग्णावर उपचार केले जाऊ शकते. आधी हा कालावधी फक्त सहा तासांचा होता.
सगळ्यात शेवटी विश्वास न्यूज ने ज्या फेसबुक पेज ने व्हायरल मेसेज शेअर केला त्याचे बॅकग्राऊंड चेक केले. Iccha purti karnara varadvinayak या पेज ला ५३४ लोकांनी लाईक केले आहे तसेच ५३८ लोकं ह्या पेज ला फोल्लो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज तपासात व्हायरल पोस्ट जुने आणि दिशाभूल करणार असल्याचे लक्षात आले. केईएम हॉस्पिटल मध्ये अशी मशीन नाही आहे जी कुठल्याही पॅरालीसीस रुग्णाला बरे करेल. नुकताच स्ट्रोक आलेल्या रुग्णाला २४ तासाच्या आत उपचार उपलब्ध करण्यात येते पूर्वी हा कालावधी ६ तासांचा होता.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923